दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 344, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा.] निस्पृहलक्षण. ३०९ दशक चौदावा. १. निस्पृहलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका निस्पृह शिकवण । युक्ति बुद्धि शहाणपण । जनें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें औषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचीत । तैसें माझें ॥ २ ॥ तात्काळाचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होय प्राप्ती । शब्द औषध तीव्र श्रोतीं । साक्षेपें से- वावें ॥ ३ ॥ निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडूं नये । वोळखीमध्यें ॥ ४ ॥ कांता दृष्टीस राखूं नये । गोडी मनास चाखवूं नये । धारिष्ट चळतां दाखवूं नये । गुह्य आपुलें ॥ ५ ॥ एके स्थळीं राहूं नये । कोंनकोंडें साहूं नये । द्रव्य द्वारा पाहूं नये । आळकेंपणें ॥ ६ ॥ आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्या द्रव्य घेऊं नये । उणा शब्द घेऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥ भिक्षेविषयीं लाजू नये । बहुत भिक्षा घेऊं नये । पुसतांहि देऊं नये । ओळखी आपुली ॥ ८ ॥ धड मलिण नेसूं नये । गोड अन्न खाऊं नये । दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥ भोगीं मन असूं नये । देहदुःखें त्रासं नये । पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥ वि- रक्ति गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये । ज्ञान मळिण होऊं नये । वि- वेकबळें ॥ ११ ॥ करुणाकीर्तन सोडूं नये । अंतरध्यान मोडूं नये । प्रेम- तंतु तोडूं नये । सगुणमूर्तींचा ॥ १२ ॥ पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये । समयीं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥ अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये । धिकारितां झुरों नये । कदाकाळीं ॥ १४ ॥ लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजू नये । खिजवितां खिजूं नये । विर- क्तपुरुषें ॥ १५ ॥ शुद्धमार्ग सांडूं नये । दुर्जनासि तंडूं नये । संबंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥ तपिळेंपण धरूं नये । भांडवितां भांडूं नये । उडवितां उडों नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥ हांसवितां हांसूं नये । बोलवितां बोलूं नये । चालवितां चालूं नये । क्षणक्षणां १. अनुभवाचें. २. लाजीरवाणें. ३. आशाळभूत होऊन. ४. तापटपणा.