भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 345, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 345
३१०श्रीदासबोध.[ दशक

॥ १८ ॥ एक वेष धरूं नये । एक साज करूं नये । एक देशीं होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९॥ सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये । सभेमध्यें बैसूं नये । सर्वकाळ ॥२०॥ नेम भंगीं लावूं नये । भरंवसा कोणास देऊं नये । अंगीकार करूं नये । नेमेस्तपणाचा ॥ २१ ॥ १. नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये । परतंत्र होऊं नये । कांहीं केल्या ॥२२॥ स्वतंत्रता मोडूं नये । निरपेक्षा तोडूं नये । २ परापेक्ष होऊं नये । क्षणक्षणां ॥ २३ ॥ वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधिसुखें राहों नये । ३ ऐकांत मोडों देऊं नये । स्वरू- पस्थितीचा ॥ २४ ॥ ४ अनर्गळताँ धरूं नये । लोकनिंद्य तें करूं नये । कोठें तरी होऊं नये । आसक्त कदा ॥ २५ ॥ परंपरा तोडूं नये । उपासना मोडूं नये । ज्ञानमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥ कर्ममार्ग सांडूं नये । वै- राग्य मोडों देऊं नये । साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥ अति- वाद करूं नये । अनीति पोटीं धरूं नये । रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥ २८ ॥ न मानी त्यास सांगों नये । कंटाळवाणें बोलों नये । बहुसाल असों नये । एके स्थळीं ॥ २९ ॥ कांहीं उपाधि करूं नये । केली तरी धरूं नये । धरिली तरी सांपडूं नये । उपाधीमध्यें ॥ ३० ॥ थोरपणें असूं नये । महत्व धरून बैसूं नये । कांहीं मान इच्छूं नये । कोठें तरी ॥ ३१ ॥ साधे- पण सांडूं नये । सानपण मोडूं नये । बलात्कारें जोडूं नये । अभिमान अंगीं ॥ ३२ ॥ अधिकाराविण सांगूं नये । दाटून उपदेश देऊं नये । कानकोंडा करूं नये । परमार्थ आपला ॥ ३३ ॥ कठीण शब्द बोलूं नये । कठिन आज्ञा करूं नये । कठिनता धरूं नये । कोणे विषयीं ॥ ३४ ॥ कठिन वैराग्य सांडूं नये । कठिन अभ्यास मोडूं नये । कठिन धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ३५ ॥ आपण आसक्त होऊं नये । केल्याविण सांगूं नये । बहुसाल मागूं नये । शिष्यवर्गासी ॥३६॥ उद्धट शब्द बोलूं नये । इंद्रियस्मरण करूं नये । शाक्तमागें भरूं नये । मुक्तपणें कदा ॥ ३७ ॥ नीचकृत्यीं लाजों नये । वैभव होतां माजों नये । क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥ थोरपणें चुकों नये । न्याय नीती सांडूं नये । अप्रमाण वर्तू नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥ कळल्याविण बोलूं नये । अनुमानें निश्चय करूं नये । सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥ १. दुराग्रहाचा. २. परावलंबी. ३. एकाग्र चिंतन. ४. स्वैर वर्तन.