दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 346, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा. ] निस्पृहलक्षण. ३११ सावधपण सोडूं नये । व्यापकपण सांडूं नये । कदा सुख मानूं नये । नि- सुंकपणाचें ॥ ४१ ॥ विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थाआज्ञा करूं नये । केली तरी टाकूं नये । आपणांपुढें ॥ ४२ ॥ प्रसंगेंविण बोलूं नये । अन्वयॆं- विण गाऊं नये । विचारेंविण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३ ॥ परोप- कार सांडूं नये । परपीडा करूं नये । विकल्प पडों देऊं नये । कोणीएकासी ॥ ४४ ॥ संशयात्मक बोलूं नये । बहुत निश्चय करूं नये । निर्वाहेंविणें² धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४५ ॥ जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये । सांगेन ऐसें म्हणों नये । कोणी एकासी ॥ ४६ ॥ ज्ञानगर्व धरूं नये । स- हसा छळणा करूं नये । कोठें वाद घालूं नये । कोणीएकासी ॥ ४७ ॥ नेणपण सांडूं नये । महंतपण सोडूं नये । द्रव्यासाठीं हिंडूं नये । हरि- कीर्तन करीत ॥ ४८ ॥ स्वार्थबुद्धि जडों नये । कारभारीं पडों नये । कार्य- कर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥ कोणास भार घालूं नये । जड³ भिक्षा मागों नये । भिक्षेसाठीं सांगूं नये । परंपरा आपुली ॥ ५० ॥ सोयरिकींत पडों नये । मध्यवर्ती⁴ घडों नये । प्रपंचाची जडों नये । उपाधि अंगीं ॥ ५१ ॥ प्रपंच प्रैस्थीं⁵ जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये । पाहुण्यासारीसें घेऊं नये । आमंत्रण कदा ॥ ५२ ॥ श्राद्ध पक्ष सँटी⁶ सामासें⁷ । शांति फळ- शोभन बारसें । भोग राहणें बहुवसें⁸ । नवस व्रतें उद्यापनें ९ ॥ ५३ ॥ तेथें निस्पृहें जाऊं नये । त्यांचें अन्न खाऊं नये । येळिलवाणें १० करूं नये । स्वयें आपणां ॥ ५४ ॥ लग्नमुहूर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये । मोलें कीर्तन करूं नये । कोठें तरी ॥ ५५ ॥ आपली भिक्षा सांडूं नये । वांरें अन्न खाऊं नये । निस्पृहासि घडों नये । मोलें यात्रा ॥ ५६ ॥ मोलें सुकृत करूं नये । मोलें पुजारी होऊं नये । दिलें तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७॥ कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये । मठपति होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥ निस्पृहें अवघेंच करावें । परी आपण तेथें न सांप- डावें । परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥ प्रयत्नांविण राहों नये । आळस दृष्टीस आणूं नये । देह असतां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ १. आळसाचें. २. सोईवांचून. ३. फार. ४. मध्यस्थी. ५. बंडजावांत. ६. षष्ठी. ७. षाण्मासिक श्राद्ध. ८. भुतें अंगात खेळवणें. ९. व्रतसमाप्ति. १०. मिंधें.