दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 347, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३१२ श्रीदासबोध. [ दशक ६० ॥ उपाधीमध्यें पडों नये । उपाधि अंगीं जडों नये । भजनमार्ग मोडूं नये । निःसंगपणें ॥ ६१ ॥ बहु उपाधि धरूं नये । उपाधीविण कामा न ये । सगुण भक्ति सोडूं नये । १विभक्ति खोटी ॥ ६२ ॥ बहुसाल धांवों नये । बहु- साल राहों नये । बहु कष्ट करूं नये । २औसुदें खोटें ॥ ६३ ॥ बहुसाल बोलूं नये । अबोलणें कामा न ये । बहु अन्न जेवूं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥ बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडों नये । बहु नेम धरूं नये । बाष्कळ खोटें ॥ ६५॥ बहु जनीं असों नये । बहु अरण्य सेवूं नये । बहु देह पाळूं नये। आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥ बहु संग धरूं नये । संतसंग सोडूं नये । कर्मठपण कामा न ये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥ बहु लौकिक सांडूं नये । लोकांआधीन होऊं नये । बहु प्रीति कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥ बहु संशय धरूं नये । मुक्तमार्ग कामा न ये । बहु साधनीं पडों नये । स्वा- धनेंविण खोटें ॥ ६९ ॥ बहु विषय भोगूं नये । विषयत्याग करितां न ये । देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥ वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंविण कामा न ये । आत्मस्थिति बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥ मन उरों देऊं नये । मनेंविण कामा न ये । अलक्ष वस्तु लक्षितां न ये । लक्षेंविण खोटें ॥ ७२ ॥ मन बुद्धि अगोचर । बुद्धीविण अंधकार । जाणि- वेचा घडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥ ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंविण कामा न ये । अतर्क्य वस्तु तर्कूं नये । तकेंविण खोटें ॥ ७४ ॥ दृश्यस्मरण कामा न ये । विस्मरण पडों देऊं नये । कांहीं चर्चा करूं नये । केल्याविण न चले ॥ ७५ ॥ जगीं भेद कामा न ये । वर्णसंकर करूं नये । आपुल्ला धर्म बुडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥ आशाबद्ध बोलों नये । विवेकें- विण चालों नये । समाधान हालों नये । कांहीं केल्या ॥ ७७ ॥ ३अबद्ध पोथी लिहों नये । पोथीविण कामा न ये । अबद्ध कदा वाचूं नये । वाचि- ल्याविण खोटें ॥ ७८ ॥ निस्पृहें वक्तृत्व सोडूं नये । आशंका घेतां भांडों नये । श्रोतयाचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥ हे शिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें ४वोळंगिती । अंगीं बाणे महंती । अकस्मात ॥ ८० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके निस्पृहनिरूपण नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ १. अभक्तपणा. २. आयतें. ३. अव्यवस्थित. ४. प्राप्त होतात.