भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 343, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 343

३०८ श्रीदासबोध. [ दशक नव्हे काय । परी तें खोटें ॥ ११ ॥ पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहोंकडे अंतरात्मा । साधु भोंदू सीमा । सांडूंच नये ॥ १२ ॥ अंतर एक तों खरें । परी सांगातें घेऊं नयेती माहारें । पंडित आणि चाट पोरें । एक कैसीं ॥ १३ ॥ मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडें । राजे आणि माकडें । एक कैसीं ॥ १४ ॥ भागीरथीचें जळ आप । मोरी संवदेणी तेंहि आप । कुश्चिळ उदक अल्प । सेववेना ॥ १५ ॥ या कारणें आचारशुद्ध । त्याउपरी विचारशुद्ध । वीतरागी² आणि सुबुद्ध । ऐसा पाहिजे ॥ १६ ॥ शूराहूनि मानिले लंडी³ । तरी युद्धप्रसंगीं नेकोंडी⁴ । श्रीमंत सांडूनि बेरंडी¹ । सेवि- तां कैसें ॥ १७ ॥ एका उदकें सकळ झालें । परी पाहोनि पाहिजे सेविलें । सगट अवघेंच सेविलें । तरी तें मूर्खपण ॥ १८ ॥ जीवनाचें झालें अन्न । अन्नाचें झालें वमन । परी वमनाचें भोजन । करितां न ये ॥ १९ ॥ तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें । सत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २० ॥ उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने । म्हणोन करंटें देवानें । करून ठेविलें ॥ २१ ॥ सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरि- कथा पुराणश्रवण । नीतिन्यायें ॥ २२ ॥ वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक । हळूहळू पुण्यश्लोक⁶ । करीत जावें ॥ २३ ॥ मुलांचें चालीनें चालावें । मुलांच्या अनुमतें बोलावें । तैसें जनास शिकवावें । हळुहळू ॥ २४ ॥ मुख्य मनोगत राखणें । हीं चातुर्यांचीं लक्षणें । चतुर तो चतु- रांग⁷ जाणे । इतर ते वेडे ॥२५॥ वेड्यास वेडें म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं नये । तरीच घडे दिग्विजय । निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळीं उदंड प्रसंग । जाणोनि करणें यथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग⁸ । होऊन जावें ॥ २७ ॥ मनोगत राखोन जातां । परस्परें होय अवस्था⁵ । मनोगत तोडितां व्यवस्था⁹ । बरी नाहीं ॥ २८ ॥ या कारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोळोज येती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके बोधनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंबी ३००.


१. वस्त्र धुण्याचें धोब्याचें भांडें. २. वैराग्यशील. ३. भितरे. ४. घाण, फजिती. ५. आशामृत. ६. पवित्र कीर्तीचे. ७. सर्व अंगें. ८. जिवलग. ९. सोय.