दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 341, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३०६ श्रीदासबोध. [ दशक नाडीद्वारा धांवे जीवनै । जीवनामध्ये खेले पवनै । त्या पवनासरिसा जाण । आत्माहि विचैरै ॥ १३ ॥ तृषेनें शोषलें शरीर । आत्म्यास कळे हा वि- चार । मग उठोन धांवे शरीर । उदकाकडे ॥ १४ ॥ उदक मागे शब्द बो- लवी । मार्ग पाहाेन शरीर चालवी । शरीर अवघेंच हालवी । प्रसंगानुसार ॥ १५ ॥ क्षुधा लागते ऐसें जाणतो । मग देहाला उठवितो । अचावाचा बोलवितो । ज्यासी त्यासी ॥ १६ ॥ बायकोस म्हणे झालें झालें । देह साँ- वळें करुनि आणिलें । पायांत भरोनं चालविलें । तांतडी तांतडी ॥ १७ ॥ त्यास पात्रावरी बैसविलें । नेत्रीं भरौन पात्र पाहिलें । हातांकरवीं आरंभिलें । आपोशन ॥१८॥ हातांकरवीं ग्रास उचलवी । मुखीं जाऊनि मुख पसरवी। दांतांकरवीं चाववी । नेटें नेटें ॥१९॥ आपण जिव्हेमध्यें खेले। पाहतो परिमळ सोहळे । केश काडी खडा कळे । तत्काळ थुंकी ॥ २० ॥ अळणी कळतां मीठ मागे । बावलेस म्हणे अगे कांगे । डोळे तापून पाहों लागे । रागें रागें ॥२१॥ गोडी लागतांच आनंदे । गोडी नसतां परम खेदे । वांकडी गोष्टी अंतरीं भेदे । आत्मयासी ॥ २२॥ नाना अन्नांची गोडी । नाना रसस्वाद निवडी । तिखट लागतांच मस्तक झाडी । आणि खोंकी ॥ २३ ॥ मिरपुडी घातली फार । कायसें करितें खापर । जिव्हेकरवीं कठिणोत्तर । बोलवी रागें ॥ २४ ॥ आज उदंड जेविला । सर्वैच तांब्या उछलिला । घळघळां घेऊं लागला । सावकाश ॥ २५॥ देहीं सुखदुःख भोक्ता । तो एक आत्माचि पाहतां । आत्म्याविण देह वृथा । मडें होय ॥ २६ ॥ मनाच्या अनंत वृत्ती । जाणणें तेचि आत्मस्थिती । त्रैलोकीं जितुक्या व्यक्ती । तदंतरीं आत्मा ॥ २७ ॥ जगामध्यें जगदात्मा । विश्वामध्यें विश्वात्मा । सर्व चालवी सर्वा- त्मा । नाना रूपें ॥ २८ ॥ हुंगे चाखे देखे ऐके । मृदु कठिण वोळखे । शीत उष्ण ठाउकें । तात्काळ होय ॥ २९ ॥ सावधपणें लाघैवी । बहुत करी उ- ठाठेवी । या धूर्तांच्या उर्गवी । धूर्ताच करी ॥ ३० ॥ वायूसरिसा परिमळु येतो । परी तो परिमळ वितळोन जातो । वायु धुळी घेऊन येतो । परी तोहि जाय ॥३१॥ शीत उष्ण वायूसरिसें । सुवासें अथवा कुवासें । असिजे परी सावकाशें । तगणें न घडे ॥ ३२ ॥ वायूसरिसे रोग येती । वायूस-
१. पाणी. २. वायु. ३. वावरतो. ४. आत्मस्वरूप. ५. चतुर. ६. उलगडा.