भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 338, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 338

१३ वा.] कर्तूलक्षण. ३०३ लांगलें । वेडे तयास चुकले । सुख सुख म्हणतांच मेले । दुःख भोगीत ॥ २५ ॥ शाहण्यानें ऐसें न करावें । सुख होय तेंचि करावें । देवास धुं- डीत जावें । ब्रह्मांडापरतें ॥ २६ ॥ मुख्य देवचि ठायीं पडला । मग काय उणें तयाला । लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥ २७॥ विवेकाचें फळ तें सुख । अविवेकाचें फळ तें दुःख । यांत मानेल तें अवश्य । केलें पा- हिजे ॥ २८ ॥ कत्यांसि ओळखावें । यासि विवेक म्हणावें । विवक सां- डितां व्हावें । परम दुःखी ॥ २९ ॥ आतां असो हें बोलणें । कत्यांस ओळ- खणें । आपलें हित विचक्षणें २ । चुकों नये ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरु- शिष्यसंवादे त्रयोदशदशके प्रत्ययनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. कर्तृलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । कोण कर्ता निश्चयेंसी । सकळ सृष्टि ब्रह्मांडासी । कोणें केलें ॥ १ ॥ तंव बोलिले सभानायक । जे बोलिके एकाहून एक । या बोलण्याचें कौतुक । श्रोतीं सादर परिसावें ॥ २॥ एक म्हणती कर्ता देव । एक म्हणती कोण देव । आपुलाला अभिप्राय । सृष्टीमध्यें बोलती ॥ ३ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । भावार्थे बोलती स्पष्ट । आपुलाली उपासना ३ श्रेष्ठ । मानिती जनीं ॥ ४॥ कोणी एक ऐसें म्हणती । कर्ता देव मंगळमूर्ती ४ । एक म्हणती सरस्वती । सर्व करी ॥ ५ ॥ एक म्ह- णती कर्ता भैरव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती बरिदेव । एक म्हणती भगवती ॥ ६ ॥ एक म्हणती नरहरी । एक म्हणती बनशंकरी । एक म्हणती सर्व करी । नारायण ॥ ७ ॥ एक म्हणती श्रीराम कर्ता । एक म्ह- णती श्रीकृष्ण कर्ता । एक म्हणती भगवंत कर्ता । केशवराज ॥ ८ ॥ एक म्हणती पांडुरंग । एक म्हणती श्रीरंग । एक म्हणती झोटिंग । सर्व करी ॥ ९ ॥ एक म्हणती मुंज्या कर्ता । एक म्हणती सूर्य कर्ता । एक म्हणती अग्नि कर्ता । सर्व कांहीं ॥ १० ॥ एक म्हणती लक्ष्मी करी । एक म्हणती मारुती करी । एक म्हणती धरित्री करी । सर्व कांहीं ॥ ११ ॥ एक म्हणती तुकाई । एक म्हणती यमाई । एक म्हणती सटवाई । सर्व करी ॥ १२ ॥ १. वृक्षाला फळें लागतात तसें. २. शहाण्यानें. ३. उपास्य दैवत. ४. गणपती.