दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
DevanagariHindipublished467 पृष्ठ
पृष्ठ 337, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपृष्ठ 337
३०२ श्रीदासबोध. [ दशक तुकें झालें । झालें तितुकें निमालें । चंचळ आलें आणि गेलें । ऐसें जाणावें ॥ ५ ॥ अविद्या जड आत्मा चंचळ । जड कर्पूर आत्मा अनळ । दोन्ही ज- ळोन तात्काळ । विझोन जाती ॥ ६ ॥ ब्रह्म आकाश निश्चळ जाती । आत्मा वायु चंचळ जाती । परीक्षवंत परीक्षिती । खरें कीं खोटें ॥ ७ ॥ जड अ- नेक आत्मा एक । ऐसा आत्मानात्मविवेक । जगा वर्तवी जगन्नायक । तयास म्हणावें ॥ ८ ॥ जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वी वर्ते सर्वात्मा । अवघा मिळोन चंचळ आत्मा । निश्चळ नव्हे ॥ ९ ॥ निश्चळ तें परब्रह्म । तेथें नाहीं दृश्यभान । विमळ ब्रह्म तें निर्भ्रम । जैसें तैसें ॥ १० ॥ आधीं आत्मानात्मविवेक थोर । मग सारासारविचार । सारासारविचारें संहार । प्रकृतीचा ॥ ११ ॥ विचारें प्रकृति संहारे । दृश्य असतांच वोसरे । अंत- रात्मा निर्गुणीं संचरे । अध्यात्मश्रवणें ॥ १२ ॥ चढता अर्थ लागला । तरी अंतरात्मा चढतचि गेला । उतरल्या अर्थे उतरला । भूमंडळीं ॥ १३ ॥ अर्थासारिखा आत्मा होतो । जिकडे नेला तिकडे जातो । अनुमानें संदेहीं पडतो । कांहीं एक ॥ १४ ॥ निःसंदेह अर्थ चालिला । तरी आत्मा निः- संदेहचि झाला । अनुमान अर्थे झाला । अनुमानरूपी ॥ १५ ॥ नवरसिकं अर्थ चाले । श्रोते तद्रूपचि झाले । चाटपणें होऊन गेले । चाटाचि अवघे ॥ १६ ॥ जैसा जैसा पडे प्रसंग । तैसे गुहिऱ्यांचे रंग । या कारणें उत्तम मार्ग पाहोन । धरावा ॥ १७ ॥ उत्तम अन्नें बोलत गेले । तरी मन अन्नाका- रचि झालें । लावण्य वनितेचें वर्णिलें । तरी मन तेथेंचि बैसे ॥ १८ ॥ पदार्थ- वर्णन आवघें । किती म्हणोन सांगावें । परंतु अंतरीं समजावें । होय कीं नव्हे ॥ १९ ॥ जें जें देखिलें आणि ऐकिलें । तें अंतरीं सदृढ बैसलें । हित अनहित परीक्षिलें । परीक्षवंतीं ॥ २० ॥ या कारणें सर्व सांडावें । एक दे- वास धुंडावें । तरी वर्म पडे ठावें । कांहीं एक ॥ २१ ॥ नाना सुखें देवें केलीं । लोकें तयास चुकलीं । ऐसीं चुकतांच मेलीं । जन्मवरी ॥ २२ ॥ सर्व सांडून शोधा मजला । ऐसा देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला । भगवंताचा ॥ २३ ॥ म्हणोनि नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती । मनीं सुखचि इच्छिती । परी तें कैंचें ॥ २४ ॥ उदंड सुख जया
१ . सरड्याचे. २. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज'-गीता, अ. १८.