दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 336, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१३ वा. ] प्रत्यय. ३०१ भास तें अविनाश । तैसें गगन ॥ १९ ॥ आतां असो हे विवंचना । परंतु जें पाहतां नासेना । तगे तेंचि अनुमाना । विवेकें आणावें ॥ २० ॥ परमात्मा तो निराकार । जाणिजे हाचि विचारसार । आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे ॥ २१ ॥ देहास अंत येतां । वायु जातो तत्वतां । लटिकें म्हणाल तरी आतां । श्वासोच्छ्वास धरावा ॥ २२ ॥ श्वास कोंडतां देह पडे । देह पडतां म्हणती मडें । मड्यास कर्तव्य न घडे । कदाकाळीं ॥ २३ ॥ देहावेगळा वायु न करी । वायुवेगळा देह न धरी । विचार पाहतां कांहींच न करी । एका वेगळें एक ॥ २४ ॥ उगेंच पाहतां मनुष्य दिसे । विचार घेतां कांहींच नसे । अभेदभक्तीचें लक्षण ऐसें । ओळखावें ॥ २५ ॥ कर्ता आपण ऐसें म्हणावें । तरी आपले इच्छेसारिखें व्हावें । इच्छेसारिखें न होतां मानावें । अवघेंचि वाव ॥ २६ ॥ म्हणोन कर्ता नव्हे कीं आपण । तेथें भोक्ता कैंचा कोण । हेंचि विचाराचें लक्षण । अविचारें न घडे ॥ २७ ॥ अविचार आणि विचार । जैसा प्रकाश आणि अंधकार । विकार आणि निर्विकार । एक नव्हे कीं ॥ २८ ॥ जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना । खरें तेंचि अनुमाना । कदा न ये ॥ २९ ॥ प्रत्ययासि बोलिजे न्याय । अप्रत्यय तो अन्याय । जात्यंधास१ परीक्षा काय । नाना रत्नांची ॥ ३० ॥ म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणासि अनन्य । आत्मनिवेदनें मान्य । परम पुरुष ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे त्रयोदशदशके लघु- बोधनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. प्रत्यय. श्रीगणेशाय नमः ॥ निर्मळ निश्चळ निराभास । तयास दृष्टांत आकाश । आकाश म्हणिजे अवकाश । पसरला पैस ॥ १ ॥ आधीं पैस मग पदार्थ । प्रत्यक्ष पाहतां यथार्थ । प्रत्यक्षेविण पाहतां व्यर्थ । सकळ कांहीं ॥ २ ॥ ब्रह्म म्हणिजे तें निश्चळ । आत्मा म्हणिजे तो चंचल । तयास दृष्टांत के- वळ । वायु जाणावा ॥ ३ ॥ घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा । घटीं बिंब दृष्टांत आत्म्याचा । विवरितां अर्थ दोहींचा । भिन्न आहे ॥ ४ ॥ भूत म्हणिजे जि- १. जन्मांधास. २. देहसमर्पण केल्यानें.