भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 339, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 339

एक म्हणती भार्गव कर्ता । एक म्हणती वामन कर्ता । एक म्हणती पर- मात्मा कर्ता । एकाचि आहे ॥ १३ ॥ एक म्हणती विरंणी कर्ता । एक म्ह- णती बस्र्वणी कर्ता । एक म्हणती रेवंणी कर्ता । सर्व कांहीं ॥ १४ ॥ एक म्हणती रवळैया कर्ता । एक म्हणती स्वामी कार्तिक कर्ता । एक म्हणती व्यं- कटेश कर्ता । सर्व कांहीं ॥ १५ ॥ एक म्हणती गुरु कर्ता । एक म्हणती दत्त कर्ता । एक म्हणती मुख्य कर्ता । वोढैया जगन्नाथ ॥ १६ ॥ एक म्हणती ब्रह्मा कर्ता । एक म्हणती विष्णु कर्ता । एक म्हणती महेश कर्ता । निश्च- येंसी ॥ १७ ॥ एक म्हणती पर्जन्य कर्ता । एक म्हणती वायु कर्ता । एक म्हणती करून अकर्ता । निर्गुण देव ॥ १८ ॥ एक म्हणती माया करी । एक म्हणती जीव करी । एक म्हणती सर्व करी । प्रारब्धयोग ॥ १९ ॥ एक म्हणती प्रयत्न करी । एक म्हणती स्वभाव करी । एक म्हणती कोण करी । कोण जाणे ॥ २० ॥ ऐसा कत्यांचा विचार । पुसतां भरला बाजार । आतां कोणाचें उत्तर । खरें मानावें ॥ २१ ॥ जिहीं जो देव मानिला । कर्ता म्ह- णती तयाला । ऐसा लोकांचा गलबला । बोसरेना ॥ २२ ॥ आपुलाल्या साभिमानें । निश्चय केला मनें । याचा विचार पाहणें । घडेचिना ॥ २३ ॥ बहुत लोकांचा बहु विचार । अवघा राहों द्या बाजार । परंतु याचा विचार । ऐसा आहे ॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । निश्चयें तोडावें अनुमान । प्रत्ययें मानावें प्रमाण । जाणते पुरुषीं ॥ २५ ॥ जें जें कर्त्यानें केलें । तें तें त्या उपरी झालें । कर्त्या पूर्वी आढळलें । न पाहिजे कीं ॥ २६ ॥ केलें तें पांच- भौतिक । आणि पांचभौतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशीं पांचभौतिक । केलें तें घडेना ॥ २७ ॥ पंचभूतांस वेगळें करावें । मग कर्त्यास वोळखावें । पां- चभौतिक स्वभावें । कर्त्यांत आलें ॥ २८ ॥ पंचभूतांवेगळें निर्गुण । तेथें नाहीं कर्तेपण । निर्विकारासि विकार कोण । लावूं शके ॥ २९ ॥ निर्गुणास कर्तव्य न घडे । सगुण झाल्यांत सांपडे । आतां कर्तव्यता कोणीकडे । पडे पाहा ॥ ३० ॥ लटिक्याचा कर्ता कोण । हें पुसणेंचि अप्रमाण । म्हणोन हें प्रमाण । जें स्वभावेंचि जाहलें ॥ ३१ ॥ एक सगुण एक निर्गुण । कोठें लावूं कर्तेपण । या अर्थाचें विवरण । बरें पाहा ॥ ३२ ॥ सगुणें सगुण केलें । तरी


१. जैन लोकांचे देव. २. कोंकणांतील एक दैवत. ४. ओढ्या प्रांतांतील.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 339, कुल 467 में से · BharatKosha