दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 350, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा. ] कवित्वलक्षण. ३१५ झालें कामाकार १ । तैसेचि निघती उद्गार । धीटपाठें परपार २ । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती । तेथें केली जे व्युत्पत्ती । या नांव धीटपाठ ॥ १३ ॥ कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट । कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत्त ॥ १४ ॥ कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥१५॥ कावित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटिल । लक्षूनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छंदभंग न करावें । मुद्राहनिं ३ ॥ १७ ॥ व्युत्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन । भक्ति ज्ञान वैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥ भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ढोंगमत । आवडीविण वक्तृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्ती- विण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद । प्रीतीविण संवाद । घडे केवीं ॥ २० ॥ असो धीटपाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेंचें पिसें । आतां प्रासादिकें ४ तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥ वैभव कांता कांचन । ज्यासि वाटे हें वमन । अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीनें घडी । भगवंतीं लागे आवडी । चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भग- वद्भजनांविण । जाऊं नेदी एक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगले ॥ २४ ॥ जया अंतरीं भगवंत । अचल राहिला निवांत । तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरीं बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणिक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली अंतरीं । तैशीच वदे वैखरी ५ । भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचत ॥२७॥ भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान । शंका लज्जा जाते पळून । दुरी ठेली ॥२८॥ तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला । तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥ गात नाचत निःशंक । तयास कैंचे दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायक । बसोनि ठेला ॥ ३० ॥ ऐसा भगवंतीं रंगला । आणिक कांहीं नलगे त्याला । स्वेच्छा वर्णू लागला । ध्यान कीर्ति प्रताप ॥३१॥ नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती । तयापुढें नरस्तुती । तृणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये १. विषयांत गुंग. २. पैल तीर. ३. लक्षणहीन. ४. ईश्वरप्रसादाचें. ५. वाणी.