भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 351, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 351

३१६ श्रीदासबोध. [ दशक संसारीं विरक्त । तया मानिती मुक्त । साधु जन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचें कौतुक । त्या नांव प्रासादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥ ऐका कवित्वलक्षण । केलेंचि करूं निरूपण । जेणें निवे अंतःकरण । श्रोत- यांचें ॥ ३५ ॥ कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें रसाळ । कवित्व असावें प्रांजळें १ । अन्वयाचें ॥ ३६ ॥ कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थांगळें २ । कवित्व असावें वेगळें । अहंतेंसी ॥ ३७ ॥ कवित्व असावें कीर्तीवौड ३ । कवित्व असावें रम्य गोड । कवित्व असावें जाड । प्रतापविषयीं ॥ ३८ ॥ कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्पसूपें । कवित्व असावें प्रज्ञासंक्षेपें ४ । प्रबंधाचें ॥ ३९ ॥ मृदु मंजुळ कोमल । भव्य अद्भुत विशाल । गौढ्य माधुर्य ५ रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥ अक्षरबंध पद- बंध । नाना चातुर्य प्रबंध । नाना कौशल्यता छंदबंध । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥ नाना युक्ति नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी । नाना अर्थान्वयें साधीं । या नांव कवित्व ॥ ४२ ॥ नाना साहित्य ६ नाना दृष्टांत । नाना तर्क धातुमँत ७ । नाना संमति सिद्धांत । पूर्वपक्षेंसी ॥ ४३ ॥ नाना गति नाना व्युत्पत्ती । नाना मति नाना स्फूर्ती । नाना धारणा नाना धृती । या नांव कवित्व ॥ ४४ ॥ शंका आशंका प्रत्यंतरें ८ । नाना वाक्यें शास्त्राधारें । तुटे संशय निर्धारें । निर्धारितां ॥ ४५ ॥ नाना प्रसंग नाना विचार । नाना तत्त्वचर्चासार । नाना योग नाना विवरें ९ । या नांव कवित्व ॥४६॥ नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटनें । नाना संदेह फेडणें । या नांव कवित्व ॥४७॥ जेणें अनुताप उपजे । जेणें लौकिकें १० लाजे । जेणें ज्ञान उपजे । या नांव कवित्व ॥ ४८ ॥ जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ति हे मावळे । जेणें भक्तिमार्ग कळे । या नांव कवित्व ॥४९॥ जेणें देहबुद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे । जेणें भगवंत प्रगटे । या नांव कवित्व ॥ ५० ॥ जेणें सद्दस्तु भासे । जेणें भौस ११ हा निरसे । जेणें भिन्नत्वें १२ नासे । या नांव कवित्व ॥ ५१ ॥ जेणें सद्बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे । जेणें विवेक जागे । या १. स्पष्ट अर्थाचें. २. अर्थानें भरलेलें. ३. थोर कीर्तीचें. ४. बुद्धि खर्चून व प्रयत्न करून रचिलेलें. ५. गोडी. ६. अलंकार. ७. व्याकरणशुद्ध. ८. निरनिराळीं प्रमाणें. ९. स्पष्टीकरणें. १०. प्रापंचिक जन. ११. भासणारें जग. १२. भेदबुद्धि.