दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 352, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा.] कीर्तनलक्षण. ३१७
नांव कवित्व ॥ ५२ ॥ जेणें घडे समाधान । जेणें तुटे संसारबंधन । जयास मानिती सज्जन । या नांव कवित्व ॥ ५३ ॥ ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण । परंतु कांहीं एक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके कवित्वलक्षणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. कीर्तनलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ कलियुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशल गावें । कठिण कर्कश कुंटें सांडावें । एकीकडे ॥१॥ खटखट खुंटून टाकावी । खळखळ खळासि न करावी । खरें खोटें खवळों न द्यावी । वृत्ति आपली ॥२॥ गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये । गोप्य गुज गजौं नये । गुण गावे ॥ ३ ॥ घष्टणीं घिसणीं घस्मरपणें । घसरघसरूं घसरवाणें । घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥ नाना नामें भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाचीं । नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुत करावी ॥ ५ ॥ चकचक चुकावेना । चाट चावट चाळवेना । चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥ छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नये । छळणें छळणा करूं नये । कोणी एकाची ॥ ७ ॥ जी जी जी जी म्हणावें ना । जो जो जागे तो तो पावेना । जप जपौं जनीं जनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥ झिरपे झरे पाझरे जल । झळके दुरून भळाळ । झडझड झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥ या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाय नलगे । या या या या कांहींच नलगे । सुबुद्धासी ॥१०॥ टक टक टक करूं नये । टाळाटाळी टिकों नये । मट मट मट लावूं नये । कंटाळवाणी ॥११॥ ठस ठोंबॅस टकावेना । ठक ठक ठक करवेना । ठाके ठमके ठसावेना । मूर्ति- ध्यान ॥ १२ ॥ डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा न ये । दळ दळ दळ चुकूं नये । हेकाडपणें ॥ १३ ॥ ढिसाळ ढाळा ढळती कुंचे । ठोंबला दुसगण डुले नाचे । ढळेचि ना ढिग ढिगाचे । कंटा- ळवाणें ॥ १४ ॥ नाना नेटक नागरें । नाना नम्र गुणागर । नाना
१. पुष्कळ. २. मनास लागे असें. ३. घांसाघीस. ४. अक्षरशत्रु. ५. सुंदर.