भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 354, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 354

१४ वा. ] हरिकथा. ३१९ श्रज्ञ तो । सर्वां ठायीं ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश दशके कीर्तनलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥

५. हरिकथा. श्रीगणेशाय नमः ॥ मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रश्न । सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि परिमळें । इक्षुदंडा लागती फळें । गौळ्यै माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । व्युत्पन्न आणि वादरहित । तरी हेही अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी तालज्ञानी । सक- ळ कळा ब्रह्मज्ञानी । निरभिमानें वर्तें जनीं । तरी हेही अपूर्वता ॥ ५ ॥ मत्सर नाहीं जयासी । तो अत्यंत प्रिय सज्जनासी । चतुरंगे जाणे मानसीं । अंतर्निष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वैं । तीर्थे क्षेत्रे जीं अपूर्वे । जेथें वसि- जे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तीर्थांतें न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती । तयां पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहींकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥ पुढें असतां सगुण मूर्ती । निर्गुण कथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभयपंथा । परिक्षा लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणा- कीर्तन करावें । नाना ध्यानें वर्णावें । प्रताप कीर्तीतें ॥ १२ ॥ ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेह्लावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभव । नाना प्रकारें महत्व । सगुणीं ठेवू- निया भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनांची । आस्था सांडून धनाची । नित्य नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नग्न होऊनि राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं । करतालिकों नृत्यें वाणी । १. सुवासिक २. उंसास. ३. गोडी. ४. विद्वान् ५. सर्व अंगें. ६. उचंबळून येतें. ७. न आणावें. ८. दुसऱ्यांचे. ९. टाळ्या. १०. नाचणें.