दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 355, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२० श्रीदासबोध. [ दशक नामघोषें गर्जावीं ॥ १७ ॥ एकाची कीर्ति एकापुढें । वर्णितां साहित्यें न पडे । म्हणोनिया पवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ति नसतां सगुण । श्र- वणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं मूर्ति नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्यें ॥ २० ॥ शृंगारादि नवरसिक । त्यामध्यें सांडावें एक । स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूंच नये ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वतां । धारिष्टापासोन श्रोता । चले तात्काळ ॥ २२ ॥ म्हणोनि तें त्यागावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावे । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार झालें मन । कैंचें आठवेल भजन । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लाव- ण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासूनी ॥ २५ ॥ हरिकथेसि भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष एक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैंचें आठवेल जन । निः- शंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान तालज्ञान । स्वरज्ञानेंसि व्युत्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छप्पन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्तचि जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणती आन । कळावंताचें मन । कळाकार झालें ॥ ३० ॥ श्रीहरीवांचून जे कळा । ते जाणवी अवकळा । देव सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पी वेढिलें चंदनासी । निधानां आड विवेंसी । नाना कळा देवासी । आड तैशा ॥ ३२ ॥ सोडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । हेंच प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ एक मन तें गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी । बळेंच धरूनियां चोरीं । शुश्रूषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें लाविलें ॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । मध्येंच धरिला बेगारी । कळावंतां तैशी परी । कळेनें केली ॥ ३६॥ मन ठेवून ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी । १. भाषण लोकांस पटत नाहीं. २. वर्णन. ३. पश्चात्तापयुक्त. ४. कामेच्छेनें व्याप्त. ५. अवदशा. ६. भूमींतील ठेव्यास. ७. पिशाच्च. ८. सेवा.