दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
३२० श्रीदासबोध. [ दशक नामघोषें गर्जावीं ॥ १७ ॥ एकाची कीर्ति एकापुढें । वर्णितां साहित्यें न पडे । म्हणोनिया पवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ति नसतां सगुण । श्र- वणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं मूर्ति नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्यें ॥ २० ॥ शृंगारादि नवरसिक । त्यामध्यें सांडावें एक । स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूंच नये ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वतां । धारिष्टापासोन श्रोता । चले तात्काळ ॥ २२ ॥ म्हणोनि तें त्यागावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावे । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार झालें मन । कैंचें आठवेल भजन । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लाव- ण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासूनी ॥ २५ ॥ हरिकथेसि भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष एक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैंचें आठवेल जन । निः- शंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान तालज्ञान । स्वरज्ञानेंसि व्युत्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छप्पन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्तचि जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणती आन । कळावंताचें मन । कळाकार झालें ॥ ३० ॥ श्रीहरीवांचून जे कळा । ते जाणवी अवकळा । देव सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पी वेढिलें चंदनासी । निधानां आड विवेंसी । नाना कळा देवासी । आड तैशा ॥ ३२ ॥ सोडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । हेंच प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ एक मन तें गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी । बळेंच धरूनियां चोरीं । शुश्रूषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें लाविलें ॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । मध्येंच धरिला बेगारी । कळावंतां तैशी परी । कळेनें केली ॥ ३६॥ मन ठेवून ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी । १. भाषण लोकांस पटत नाहीं. २. वर्णन. ३. पश्चात्तापयुक्त. ४. कामेच्छेनें व्याप्त. ५. अवदशा. ६. भूमींतील ठेव्यास. ७. पिशाच्च. ८. सेवा.
१४ वा. ] चातुर्यलक्षणं. ३२१ तोचि एक संसारीं । धन्य जाणावा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी । उठे नित्य नवी आवडी । तयास झाली जोडी । सर्वोत्तमाची ॥३८॥ हरि- कथा मांडली जेथें । सर्व सांडून धांवे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थे । हरिभक्तीसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी । साह्यभूत सर्वांपरी । साक्षेपें होय ॥ ४० ॥ तया नांव हरिदास । जयास नामीं विश्वास । येथूनि हा समास । संपूर्ण झाला ॥ ४१ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके हरिकथानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. चातुर्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाय । कांहीं तरी धरावी सोय । आगंतुक गुणाची ॥ १ ॥ काळें माणूस गोरें होयना । वोढाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहज गुण ॥२॥ आंधळें डोळस होईना । बधिर तें ऐकेना । पांगुळ पाय घेईना । कांहीं केल्या ॥३॥ कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोन सांगणें । रूप लावण्य या कारणें । पालटेना ॥ ४ ॥ अवगुण सोडिलीं जाती । उत्तम गुण अभ्यासि- तां येती । कुविद्या सांडूनि अभ्यासिती । शाहणे विद्या ॥ ५ ॥ मूर्खपण सांडितां जातें । शाहणपण शिकतां येतें । कारभार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥ ऐसी प्रचीति येते मना । तरी स्वहित कां कराना । सन्मागें चालतां जाणा । सज्जना माने ॥ ७ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी उपेक्षा कां करावी । चातुर्यैविण उंच पदवी । कदापि नाहीं ॥ ८ ॥ अंतर्कळा शृंगारावी । नाना परी उमजवावी । संपदा मेळवून भोगावी । साव- काश ॥ ९ ॥ देह नेटकें शृंगारिलें । परी तें चातुर्यैविण नासलें । गुणें- विण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ १० ॥ यत्न करीना ना शिकेना । शरीर तेंहि कष्टवीना । उत्तम गुण घेईना । सदा कोपी ॥ ११ ॥ आपण दुसऱ्यास करावें । तेणें सर्वैचि उसणें घ्यावें । जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहू ॥ १२ ॥ न्यायें वर्तेल तो शाहणा । अन्यायी तो दैन्यवाणा । नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुतांस मानलें । तें १. श्रम करून. २. अंतःकरण.
३२२ श्रीदासबोध. [ दशक
बहुतीं मान्य केलें । येर तें व्यर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोकीं आप- णास बोलावें । किंवा अवघेंचि कोसळावें । आपणासि समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५॥ समाधानें समाधान वाढे । मैत्रीनें मैत्री जडे । मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥ अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजे कीं रे । कळत असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥ चातुर्यें शृंगारे अंतर । वस्त्रें शृंगारे शरीर । दोहोंमध्यें कोण सार । बरें पाहा ॥ १८ ॥ बाह्यात्कारें शृंगा- रिलें । तेणें लोकांच्या हातास काय आलें । चातुर्यें बहुतां संरक्षिलें । नाना परी ॥ १९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । समस्तांस बरें म्हणावें । ऐसें वाटे ॥ २० ॥ तनें मनें झिजावें । तेणें भलें म्हणोन न्यावें । उगेंचि कल्पितां सिणावें । वाउगें जनीं ॥ २१ ॥ लौकिकीं कार्यभाग भावडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥२२॥ म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसऱ्यास कष्ट- वितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥ हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा न ये । समजणें हाचि उपाय । सर्वत्रांसी ॥ २४ ॥ समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष झाले । या वेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥ जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव । समजला तरि उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥ आळसें कार्यभाग नासतो । साक्षेपें होत होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो । शाहणा कैसा ॥२७॥ मैत्री करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु । बोलिलें हें सत्य कीं असत्य । ओळखावें ॥ २८ ॥ आपणास शाहणें करूं नेणे । आपलें हित आपण नेणे । जनीं मैत्रिकी राखो नेणे । वैर करी ॥ २९ ॥ ऐसे प्रकारिचें जन । त्यास म्हणावें अज्ञान । तयापाशीं समाधान । कोण पावे ॥३०॥ आपण एकाकी एकला । सृष्टींत मांडत चालिला । बहुतांमध्ये एकल्याला । यश कैचें ॥ ३१ ॥ बहु- तांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणी- मात्रांसी ॥ ३२ ॥ शहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्यें भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश- दशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
१४ वा.] युगधर्म. ३२३ ७. युगधर्म. श्रीगणेशाय नमः ॥ नाना वेष नाना आश्रम १ । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम । जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥ देव ऋषि मुनि योगी । नाना तापसी वीतरागी । पितृ आदिकरूनि विभागी । अतीत अभ्यागत ॥ २॥ गृहस्थाश्रमीं निर्माण झाले । आपुला आश्रम टाकून गेले । परंतु गृहस्था- गृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥ या कारणें गृहस्थाश्रम । सकळांमध्यें उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ॥ ४ ॥ जेथें षट्कर्में २ चालती । विधियुक्त क्रिया आचरती । वाङ्मधुर्यै बोलती । प्राणिमात्रांसी ॥ ५ ॥ सर्व प्रकारें नेमका । शास्त्रोक्त करणें कांहीं एक । त्याहीमध्यें अलौ- किक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥ पुरश्चरणीं काया क्लेशी । दृढव्रती परम सायासी । जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥ काया वाचा जीवें प्राणें । कष्टे भगवंताकारणें । मनें घेतलें धरणें । भजनमार्गी ॥ ८ ॥ ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त । संसार सोडून झाला मुक्त । भ- गवंताकारणें ॥ ९ ॥ अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भाग । लोलं- गते ३ एवढें अभाग्य । आणिक नाहीं ॥ १० ॥ राजे राज्य सोडून गेले । भ- गवंताकारणें हिंडों लागले । कीर्तिरूपें पावन झाले । भूमंडळीं ॥ ११ ॥ ऐसा जो योगीश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणि- मात्रांचें ॥ १२ ॥ ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्श- नमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥ बहुतांसि करी उपाय । तो ज- नांच्या वाट्या न ये । अखंड जयाचें हृदय । भगवद्रूप ॥ १४ ॥ जनांस दिसे हा दुश्चित । परी तों असे सावचित । अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं ॥ १५ ॥ उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं । नाहीं तरी श्र- वणमननीं । निरंतर ॥ १६ ॥ पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रहीं असिल्या गांठी । तरीच ऐसियाची भेटी । होय जनांसी ॥ १७ ॥ प्रचीतीविण जें ज्ञान । तें अवघेंच अनुमान । तेथें कैंचें परत्र ४ साधन । प्राणियांसी ॥ १८ ॥ १. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम. २. यजन, याजन, दान, प्रतिग्रह, अध्ययन आणि अध्यापन हीं ब्राह्मणांचीं सहा कर्तव्यें. ३. भोगांची हांव असणें यासारखें. ४. परलोक ची प्राप्ति.
३२४ श्रीदासबोध. [ दशक या कारणें मुख्य प्रत्यय । प्रचीतीविण कामा नये । उपायासारिखा अपाय । शहाणे जाणती ॥ १९ ॥ वेडे संसार सांडून गेले । तरी ते कष्ट कष्टोंच मेले । दोहींकडे अंतरले । इहलोक परत्रीं १ ॥ २० ॥ रागेंरागें निघोन गेला । तरी तो भांडभांडोंच मेला । बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥ निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगतीस लागले जन । गुरुशिष्य दोघे समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥ आशाबद्ध अनाचारी । निघोन गेला देशां- तरीं । तरी तो अनाचारचि करी । जनांमध्यें ॥ २३ ॥ गृहीं पोटेंविण क- ष्टी । कष्टी होऊन निघोन जाती । त्यास ठायीं ठायीं मारिती । चोरीं भरतां ॥ २४ ॥ संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला । तेणें जन पावन केला । आपणा ऐसा ॥ २५ ॥ एके संगतीनें तरती । एके संग- तीनें बुडती । या कारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥ जेथें नाहीं वि- वेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा । घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि मिळेना ॥ २७ ॥ जो दुसऱ्याचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे । तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला । वेद शास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥ ब्रह्म- ज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । वर्णानां ब्राह्मणो गुरुः २ । ऐसें हें वचन ॥ ३० ॥ ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे ॥ ३१ ॥ कित्येक दावल३मलकास जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुंक ४ होती । आपुले इच्छेनें ॥ ३२ ॥ ऐसा कलियुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंकर । होणार आहे ॥ ३३ ॥ गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती । शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥ हें ब्राह्मणास कळेना । त्याची वृत्ति वळेना । मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥ राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं ५ । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ३६ ॥ ब्राह्मणास ग्रामण्यानें ६ बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरविलें । त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा ॥ ३७ ॥ आम्हीहि तेचि ब्राह्मण । दुःखें १. या लोकीं आणि परलोकीं. २. चारी वर्णांमध्यें ब्राह्मण श्रेष्ठ. ३. एक यव- नांचा देव आहे त्यास. ४. म्लेंच्छ ५. म्लेंच्छ राजपुरुषांनीं. ६. घरकलहामुळे.
बोलिलों हें वचन । वडील गेले ग्रामणी करून । आह्मां भोंवते ॥ ३८ ॥ आतांच्या ब्राह्मणीं काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्म- णांचें अदृष्ट¹ जाणावें । प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा कीजे ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके युगधर्मनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. अखंड ध्यान. श्रीगणेशाय नमः ॥ बरें ऐसा प्रसंग झाला । झाला तो होऊन गेला । आतां ब्राह्मणीं आपणाला । शहाणें करावें ॥१॥ देव पूजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं । मूर्ख अभक्त अव्यवस्थीं । दरिद्र भोगिजे ॥२॥ आधीं देवास ओळखावें । मग अनन्यभावें भजावें । अखंड ध्यान धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥ सर्वांमध्यें जो उत्तम । तया नांव सर्वोत्तम । आत्मा- नात्मविवेकवर्म । ठायीं पाडावें ॥ ४ ॥ जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी । पदार्थमात्रास परीक्षौ । जाणपणें ॥ ५ ॥ तो सकळ देहांमध्यें वर्ततो । इंद्रियेंग्राम² चेष्टवितो । प्रचीतीनें प्रत्यय येतो । प्राणिमात्रांसी ॥६॥ प्राणिमात्रीं³ जगदंतरें । म्हणोनि राखावीं अंतरें । दाता भोक्ता परस्परें । स- कळ कांहीं ॥ ७ ॥ देव वर्ततो जगदंतरीं । तोचि आपुले अंतरीं । त्रैलोक्यांचे प्राणिमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥ मुळीं पाहणार तो एकला । सकळां ठायीं विभागला । देहप्रकृतीनें झाला । भिन्न भिन्न ॥ ९॥ भिन्न भासे देहाकारें । प्रस्तुत एकचि अंतरें । बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥ आ- पुले पारखी सकळ लोक । पक्षी श्वापद पश्वादिक । किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥ खेचरें⁴ भूचर वनचर । नाना प्रकारांचे जळचर । चारी खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२ ॥ समस्त जाणिवेनें वर्तती । रोकडी पाहावी प्रचीती । त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३ ॥ जगदंतरें वोळला धणी । किती एकवटील प्राणी । परी तो ओ- १. दैव. २. सर्व इंद्रियें. ३. परमेश्वर जगदंतरीं आहे म्हणून प्राणिमात्रानें एक- मकांचीं मनें राखावीं असा भाव. ४. आकाशांत वावरणारे.
३२६ श्रीदासबोध. [ दशक ळखावयाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेच येतें । राजी राखावें समस्तांतें । देहासि बरें करावें तें । आत्मयासि पावे ॥ १५ ॥ दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव । तरी तंडों नये ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । वि- वेकें सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्त्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसंबंध । एका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥ गरल आणि अमृत झालें । परी आपण नाहीं गेलें । साक्षित्त्वें आत्मयासि पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥ अंतर्निष्ठ जो पुरुष । तो अंतर्निष्ठेनें विशेष । जगा- मध्यें जो जगदीश । तो तयास ओळखे ॥ २० ॥ नयनेंचि पाहावे नयन । मनें शोधावें मन । तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥ तेणेंविण कार्यभाग अडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे । प्राणी विवेकें पवाडे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥ जागृतीस व्यापार घडतो । संबंध तयासीच पडतो । स्वप्ना- मध्यें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥ अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण । याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥ सहज सां- डूनि सायास । हाचि कोणी एक दोष । आत्मा सांडून अनात्म्यांस । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥ परी तें धरितांहि धरवेना । ध्यानीं येती व्यक्ति नाना । उगेचि कष्टविती मना । कासावीस करूनि ॥ २६ ॥ मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें एकाचें एक दिसे । भासों नये तेंच भासे । विलक्षण ॥ २७ ॥ ध्यान देवाचें धरावें । किंवा देवालयाचें करावें । हेंचि बरवें विवरावें । आपुले ठायीं ॥ २८ ॥ देह देऊळ आत्मा देव । कोठें धरूं पाहतां भाव । देव ओळखून जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥ अंतर्निष्ठा ध्यान ऐसें । दंडेकध्यान अनारिसें । प्रयत्नेंविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥ अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां संवेंचि मोडे । उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥ देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती । भोगणें लागे विपत्ती । देहयोगें ॥ ३२ ॥ ऐसें मनीं आठवतें । विचारितां भलतेंच होतें । दिसों नये तेंच दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥ दिसतें तें सांगतां न ये । बळें भावार्थ धरितां न ये । साधक कासाविस होय । अंत- १. आत्मा नव्हे त्यास; अर्थात् स्वरूपाज्ञानावांचून. २. लोकरितीचें ध्यान.
१४ वा.] शाश्वत ब्रह्म. ३२७ याँमीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्षी आपुलें मन । मना- मध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटकें मन एकवटिलें । तेणें तुटकें ध्यान केलें । तेथें कोण सार्थक झालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित्त । बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें कोण । ध्यानीं आठवितें तें कोण । दोनीमध्यें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजाच आहे । साधक शोधून पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥ ऐसीं हीं प्रत्ययाचीं कार्में । प्रत्ययेंविण बोलिजे भ्रमें । लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥ दंडकध्यानाचें लक्षण । धरूनि बैसले अवलक्षण । प्रमाण आणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥ मिथ्या समाचार उठाविती । वाडग्याच बोंबा घालिती । मनास आणितां अंतीं । अवघेंच मिथ्या ॥ ४२ ॥ कोणी एक ध्यानस्थ बैसला । कोणी एक शिकवी त्याला । मुकुट काढून माळा घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥ मनाच्या येथें काय दुष्काळ । जे आंखूड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जा- णावे ॥ ४४ ॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती । दोरें फुलें गुंफावीं न लागती । कल्पनेची माळ थिटी करिती । काय निमित्त ॥ ४५ ॥ बुद्धीवि- ण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासि खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥ जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडैक चालिला । सातां पांचांचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥ प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून । तेथें अवधेंच अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश- दशके अखंडध्याननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. शाश्वत ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ पिंडांचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्म- विवेक । पिंड अनात्मा आत्मा एक । सकळ कर्ता ॥ १॥ आत्म्यास अन- १. लोकरीतीच्या मार्गानें. २. लोकाचाराचें ध्यान. ३. परिपाठ.
३२८ श्रीदासबोध. [ दशक न्यतां बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली । आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ आत्मानात्मविवेक पिंडीं । सारासारविचार ब्रह्मांडीं । विवरतां विवरतां हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥ पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण । हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥ असार म्हणजे नाशवंत । सार म्हणजे शाश्वत । जयास होईल कल्पांतें । तें सार नव्हे ॥ ५ ॥ पृथ्वी जळापासूनि झाली । पुढें ते जळीं मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥ तेज झालें वायू- पासुनी । वायु झडपी तयालागुनी । तेज जाऊन दाटणी । वायूचीच जाहली ॥ ७ ॥ तें जळ तेथें शोषिलें । महातेजें आटोनि गेलें । पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ८ ॥ वायु गगनापासुनि झाला । मागुता तेथेंचि विराला । ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ गुणमाया मू- ळमाया । परब्रह्मीं पावती लया । तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥१०॥ सर्व उपाधींचा शेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट । निर्गुण ब्रह्म घनदाट । सक- ळां ठायीं ॥ ११ ॥ उदंड कल्पांत जाहला । तरी नाश नाहीं त्याला । माया- त्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥ देव अंतरात्मा सगुण । सगुणें पा- विजे निर्गुण । सगुणज्ञानें निर्गुण । होत असे ॥ १३ ॥ कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ । मिथ्यात्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥ जें होतें आणि सर्वैचि जातें । तें तें प्रत्ययास येतें । जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें ओळखावें ॥ १५ ॥ एक ज्ञान एक अज्ञान । एक जाणावें विप- रीत ज्ञान । हे त्रिपुटी होय क्षीण । तेंचि ज्ञान ॥ १६ ॥ वेदांत सिद्धांत धादांत । तयाची पाहावी प्रचीत । निर्विकारी सदोदित । जेथें तेथें ॥ १७॥ तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें । मुख्य आत्मनिवेदन जा- णावें । याचें नांव ॥ १८ ॥ दृष्टीस दिसतें तें दृश्य । मनासि भासतें तो भास । दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥ पाहों जातां दुरि- च्या दुरी । परब्रह्म सबाह्य अंतरीं । अंतचि नाहीं अनंत सैरी । कोणासी द्यावी ॥ २० ॥ चंचल तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापि चलेना । आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥ जें विकारें वाढे मोडे । तेथें शा- १. अभिन्नता; त्याहून भिन्न कांहींच नाहीं अशी स्थिति. २. नाश. ३. बरोबरी.
१३ वा. ] माया. ३२९ श्वतता कैंची घडे । कल्पांत होतांचि बिघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥ जे अंतरींच भ्रमले । मायासंभ्रमें संभ्रमले । तयांस हैं कैसें उकले । अव्हांटें १ चक्र ॥ २३ ॥ भिडेनें व्यवहार निवडेना । भिडेनें सिद्धांत कळेना । भिडेनें देव आकळेना । अंतर्यामीं ॥ २४ ॥ वैद्याची प्रतीत येईना । आणि भी- डही उल्लंघेना । तरी रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ जेणें राजा वोळ- खिला । तो राजा म्हणेना भलत्याला । जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥ जयास मायिकांची २ भीड । तें काय बोलेल द्वाड । विचार पाहतां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥ भीड मायेयेलीकडे । परब्रह्म तें पैलीकडे । पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥ लटिक्याची भीड धरणें । अभ्रें भलतेंच करणें । ऐशीं नव्हेत कीं लक्षणें । विवेकाचीं
३३० श्रीदासबोध. [ दशक
तिचें नाम जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥ ९ ॥ दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्णवस्त्राची तृष्णा । कां नदी नामें पयो- ष्णा । तैसी माया ॥ १० ॥ बहुरूप्यांतील रामराव । ग्रामस्थांपुढें दाखवी हावभाव । कां महाराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ देव्हारीं असे अन्नपूर्णा । आणि गृहीं अन्नचि मिळेना । नामें सरस्वती शिकेना । सु- भाषित ॥ १२ ॥ सुंण्यासि व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रासि इंद्र नामें पाचारिलें । कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥ मूर्ख नामें सकळकळा । रा- सभी नामें कोकिळा । नातरी डोळसाचा डोळा । फुटका जैसा ॥ १४ ॥ मातंगीचें नाम तुळसी । चर्मिकेचें नाम काशी । बोलती अतिशूद्रीणिसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥ साउली आणि अंधकार । एक होतां तेथींचा वि- चार । उगाच दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥ श्रवणें बोटें संधीं क- रतळ । रविरश्मीं दिसती इंगळ । रम्य आरक्त रंगकल्लोळ । तैसी माया ॥ १७ ॥ भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्निच लागला । विवंचितां प्रत्यय आला । तैसी माया ॥ १८ ॥ जळीं चरणकरांगुलें । आखूड लांब किरकोळें । विपरीत काणे दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥ भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी झाली । सन्निपातें अवस्था अनुभविली । तैसी माया ॥ २० ॥ कोणी एक पदार्थविकार । उगाच दिसे भासमात्र । अन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके मायानिरूपणं नाम दशमः समासः ॥१०॥ ओवी ४०६.
दशक पंधरावा.
१. चातुर्य.
श्रीगणेशाय नमः ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें । नानाविंकारीं विकारीं । प्रवीण होईजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । वि-
तळटीपा (Footnotes): १. कुत्र्यास. २. गाढवी. ३. चांडाळणीचें. ४. चांभारणींचें. ५. कान. ६. सूर्यकिरणांतून पाहतां. ७. निखाऱ्यासारखे लाल. ८. तरंग. ९. काविळीनें. १०. कामक्रोधादि मनोविकारांनीं. ११. वृद्धिक्षयादि देहविकारांनीं.
वरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ एकीं मागमागोन घेणें । एकां न मागतांच देणें । प्रचीतीनें सुलक्षणें । वोळखावीं ॥ ३ ॥ जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहाराहोन शोध घ्यावा । परांतराचा ॥ ४ ॥ जाणीव नेणिवेस आलें । ढिलेपणें हेवांड झालें । नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ तैसेंचि हें मनासि मन । वि- वेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥ अनुमानें अनु- मान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो । याकारणें प्रत्यय तो । आधीं पा- हावा ॥७॥ दुसऱ्याचे जीर्वींचें कळेना । परांतर तें जाणवेना । वश्य होती लोक नाना । कोणत्या प्रकारें ॥ ८ ॥ अक्ल सांडून पैरती । लोक वशीकरणें करिती । अपूर्णपणें हळू पडती । ठायीं ठायीं ॥ ९ ॥ जगदीश आहे जगदं- तरीं । चेटकें करावी कोणावरी । जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ ॥ १० ॥ श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥ राजे जाती राजपंथें । चोर जाती चोर- पंथें । वेडा ठके अल्पस्वार्थे । मूर्खपणें ॥ १२ ॥ मूर्खास वाटे मी शाहणा । परी तो वेडा दैन्यवाणा । नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जो जगदंतरीं मिळाला । तो जंगदंतराचि झाला । अरैत्रीं परैत्रीं तयाला । काय उणें ॥ १४॥ बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धीविना माणूस काचें । राज्य सांडून फु- काचें । भीक मागे ॥ १५॥ जें जेथें निर्माण झालें । तें तें तयास मानलें । अ- भिमान देऊन गोविलें । ठायीं ठायीं ॥ १६॥ अवघेचि ह्मणती आम्हीं थोर । अवघेचि म्हणती आम्ही सुंदर । अवघेचि म्हणती चतुर । भूमंडळीं ॥ १७॥ ऐसा विचार आणितां मना । कोणीच लहान म्हणवीना । जाणते आणिती अनुमाना । सकळ कांहीं ॥१८॥ आपुलालया साभिमानें । लोक चालिले अ- नुमानें । परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥१९॥ लटिक्याचा साभिमान घेणें । सत्य अवघेंच सांडणें । मूर्खपणाचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं ॥ २०॥ स- त्याचा जो अभिमान । तो जाणावा निरभिमान । न्याय अन्याय समान । कदापि नव्हे ॥२१॥ न्याय म्हणिजे तो शाश्वत । अन्याय म्हणिजे तो अशा- श्वत । बाष्कळ आणि नेमस्त । एक कैसें ॥ २२ ॥ एक उघड भाग्य भो-
१. गुंतागुंत. २. दूर. ३. मंत्रानें लोक वश करणें. ४. इहपरलोकीं.
गिती । एक तस्कर पलोन जाती । एकाची प्रगट महंती । एकाची कान- कोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो शीण । धूर्त आणि विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि आकाळिले । धूर्तापासीं कांहीं न चले । बाजार्याचें ॥ २५॥ या कारणें मुख्य मुख्य । तयांसी करावें सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥ धूर्तांसि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तांच पवाडे । उगोचि हिंडती वेडे । कार्ये- विण ॥ २७ ॥ धूर्तांसि धूर्तपण कळलें । तेणें मनासी मन मिळालें । परी हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥ २८ ॥ समर्थांचे राखितां मन । तेथें येती उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥ वोळखीनें वो- ळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । नीतिन्यायें वाट रोधावी । पाखं- डाची ॥ ३० ॥ वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ निस्पृह आणि नित्य नूतन । प्र- त्ययाचें ब्रह्मज्ञान । प्रकट जाणता सज्जन । दुर्लभ जगीं ॥ ३२ ॥ नान जिन्नस पाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें । चंचळपणें तदनंतरें । सकळा ठायीं ॥ ३३ ॥ एकेठायीं बैसोनि राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावध- पणें ज्याला त्याला । भेटी द्यावी ॥ ३४ ॥ भेटभेटों उरी राखणें । हीं चातु- र्याचीं लक्षणें । मनुष्यमात्र उत्तमगुणें । सावधान पावें ॥ ३५ ॥ इति श्रीदास- बोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. निस्पृहलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ पृथवीमध्यें नानाशरीरें । उदंड दाटलीं लहान- थोरें । पालटती मनोविकारें । क्षणक्षणां ॥ १ ॥ जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती । सारिख्याच नसती आदिअंतीं । नेमाचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनी ॥ २ ॥ कितेक म्लेंच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांतें आटले । देशभाषेनें रोधिले । कितीएक ॥ ३ ॥ महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला । अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कार्मे ॥ ४ ॥ कित्येक युद्धप्रसंगीं गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले । रात्रंदिवस करूं लागले १. चोर. २. मिसळतो. ३. स्वभाव. ४. ख्रिस्ती जातींत. ५. मराठ्यांचा.
१५ वा. ] निस्पृहलक्षण. ३३३
युद्धचर्चा ॥ ५ ॥ उद्यम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला । अवघा पोटधंदा लागला । निरंतर ॥ ६ ॥ षट्दर्शनें¹ नाना मतें । पाषां- डें उठलीं बहुतें । पृथ्वीमध्यें जेथें तेथें । उपदेशिती ॥ ७ ॥ स्मार्ती आणि वैष्णवीं । उरलीं सुरलीं नेलीं आघवीं । ऐसी पाहतां गाथागोवी । उदंड जाहली ॥ ८ ॥ कित्येक कामनेचे भक्त । ठायीं ठायीं झाले आसक्त । युक्त अथवा अयुक्त । पाहतो कोण ॥ ९ ॥ या गलबल्यामध्यें गलबला । को- णीं कोणीं वाढविला । त्यास देखों शकेनासा झाला । वैदिक लोक ॥ १० ॥ त्यांहिमध्यें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥ या कारणें ज्ञान दुर्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ । वि- चारवंता सुलभ । सर्व कांहीं ॥ १२ ॥ विचार सकळांला सांगतां न ये । उदंड येती अंतरायें³ : उपाय योजितां अपाय । आडवे येती ॥ १३ ॥ त्यां- हिमध्यें जो तीक्ष्ण । रिकामा जाऊं नेदी क्षण । धूर्त तार्किक विचक्षण । सकळांस माने ॥ १४ ॥ नानाजिन्नस उदंड पाठ । वदों लागले गडगडाट । अव्हांटांची² केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें । जाणे सकळांचीं अंतरें । निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मतें मतांतरें सगट । प्रत्यय बोलून करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी जनां ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें⁴ । उदासवृत्तीच्या गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥ प्रत्यय बोलोन उठोन गेला । चटक ला- गली लोकांला । नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥ परी तो कोठें आढळेना । कोणे स्थळीं सांपडेना । वेष पाहतां हीनदीन । सा- रिखा दिसे ॥ २० ॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकाऱ्यासारिखा स्वरूपें । तेथें यश कीर्ति प्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठायीं ठायीं भजन लावी । आ- पण तेथून चुकवी । मत्सरमताची गोंवी⁵ । लागोंच नेदी ॥ २२ ॥ खना⁶- ळामध्यें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्व- काळ ॥ २३ ॥ अवघडस्थळीं कठिण लोक⁷ । तेथें राहणें नेमक । सृष्टीमध्यें सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथें कोणाचें चालेना । अणुमात्र अ-
१. सौर, शाक्त, गाणपत्य, शैव, वैष्णव आणि स्कांद हीं सहा मतें. २. आड- वाटांची. ३. अडथळे. ४. वळानें. ५. संबंध. ६. दरीखोऱ्यांत. ७. स्थान.
जुमानेना । कट घालून राजकारणा । लोकां लावी ॥ २५ ॥ लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद झाले । भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥ ठायींठांयीं उदंड थोंबे¹ । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहूकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळीं थोरथोर । प्रत्ययानें प्राणिमात्र । सोडविले ॥ २८ ॥ ऐसें कैवांड उदंड जाणे । तेणें लोक होती शहाणे । जेथें तेथें प्रत्यय बाणे । प्राणिमात्रांसीं ॥ २९ ॥ ऐशी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलों ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके निस्पृहलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. श्रेष्ठ अंतरात्मा. श्रीगणेशाय नमः ॥ मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकरण पसारा । त्यांत साक्षित्वाचाँ दोरा । तोहि तत्वरूपँ ॥ १ ॥ दुरस्तां दाटल्या फौजा । उंच सिंहासनीं राजा । याचा विचार समजीं । अंतर्यामीं ॥ २ ॥ देहमात्र अस्थिमांसाँचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें । मुळापासून सृष्टीचें । तत्वैरूप ॥ ३ ॥ रायाचे सत्तेनें चालतें । परंतु अवघीं पंचभूतें । मुळीं अधिक जा- णीवेचें तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥ विवेकें बहुत पैसावले । म्हणोन अ- वतारी बोलिले । मनु चक्रवर्ती झाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥ जेथें उदंड जाणीव । तेचि तितुके सदैवँ । थोडे जाणीवेनें निर्देवँ । होती लोक ॥ ६ ॥ व्याप आटोप करीती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी सदैव होती । देखतदेखतां ॥ ७ ॥ ऐसें हें आतां वर्ततें । मूर्ख लोकांस कळेना तें । वि- वेकी मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥ थोर लहान बुद्धीपाशीं । स- गट कळेना लोकांसी । आधीं उपजले तयांसी । थोर म्हणती ॥ ९ ॥ वयॆं धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती । विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ॥ १० ॥ सामान्य लोकांचें ज्ञान । तें अवघेंच अनुमान ।
तळटीपा (Footnotes): . १. समुदाय. २. कारस्थान. ३. मूळमायेपासून. ४. पंचभौतिक. ५. आणि- वेचा. ६. फौजेच्या मध्यभागीं राजा, त्याप्रमाणें जगताचे अंतरीं जाणीव म्हणजे साक्षित्व आहे. परंतु राजा व फौज हे जसे सर्व देहच, त्याप्रमाणें जगत् वँ साक्षित्व हें सर्व पंचभौतिकच होय. ७. भाग्यवान्. ८. भाग्यहीन.
१५ वा. ] श्रेष्ठ अंतरात्मा. ३३५ दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥११॥ नव्हे कोणास म्हणावें । सामा- न्यास काय ठावें । कोण कोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥१२॥ धाकुटा भाग्यास चढला । तरी तुच्छ करिती तयाला । या कारणें सलगीच्या लो- कांला । दुरी धरावें ॥१३॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण । उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानीना । आधीं उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥ वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्या धाकुटेपण नाहीं । ऐसें बोलती त्यांस नाहीं । शहाणपण ॥ १६ ॥ गुणांविण वडिलपण । हें तों अवघेंच अप्रमाण । त्याची प्रचीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥ तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें । नेणतां पुढें, कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥ तस्मात् वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा । हें प्रगटचि आहे आम्हां । शब्द नाहीं ॥१९॥ या कारणें कोणी एकें । शाहाणपण शिकावें विवेकें । विवेक न शिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥ तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मास येऊन काय केलें । बळेंच सांडीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥ सगट बायका शिव्या देती । सांडीस पडला ऐसें म्हणती । मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥ ऐसें कोणी एकें न करावें । सर्व सार्थकाचि करावें । कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ शाहण्यास कोणी तरी बाहती । मूर्खास लोक दवडून देती । जीवास आवडे संपत्ती । तरी शाहणें व्हावें ॥ २४ ॥ अहो या शहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें । परंतु शहाण- पण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५॥ जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा झाला । जनीं शाहण्या मनुष्याला । काय उणें ॥ २६ ॥ आपुलें हित न करी लौकिकीं । तो जाणावा आत्मघातकी । त्या मूर्खा एवढा पात- की । आणिक नाहीं ॥ २७ ॥ आपण संसारीं कष्टतो । लोकां करवीं रागे- जोन घेतो । जनांमध्यें शहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥ साधकां शिक- विलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें । मानेना तरी सांडावें । एकीकडे ॥ २९ ॥ तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्ष्यास लावितां लक्ष । हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसां ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके श्रेष्ठअंतरात्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
३३६ श्रीदासबोध. [ दशक ४. शाश्वत ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीपासून झालीं झाडें । झाडापासून होती लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होय ॥१॥ पृथ्वीपासून वेल होती । नाना जिन्नस फांपावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होय ॥ २ ॥ नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें कारिती भोजनें । नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होय ॥ ३ ॥ नाना पक्ष्यादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंच झालें । वाळोन भस्म होऊन गेलें । पुनः पृथ्वी ॥४॥ मनुष्यें मरतांच ऐका । कृमि भस्म मृत्तिका । ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥ नाना तृणें पदार्थ कुजती । पुढें त्यांची होय माती । नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥ पदार्थ दाटले अपार । किती सांगावा विस्तार । पृथ्वी- वांचून थार । कोणास नाहीं ॥ ७ ॥ झाडपाले आणि तृण । पशु भक्षितां होतें शेण । खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥ उत्पत्ति स्थिति संहारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें । जितुकें होतें आणि जातें । पुनः पृथ्वी ॥ ९ ॥ नाना बीजांचिया राशी । विरुढोन लागती गगनासी । पुढें शेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥१०॥ लोक नाना धातु¹ पुरिती । बहुतां दिवसां होय माती । सुवर्ण पाषाणांची गती । तैसीच आहे ॥११॥ मातीचें होतें सुवर्ण । आणि मृत्तिकेचे होती पाषाण । महा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होय ॥ १२ ॥ सुवर्णाचें रजें² होतें । रज शेवटीं कुजोन जातें । रस होऊन वितुळतें । पुनः पृथ्वी ॥ १३ ॥ पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें भस्म होती । तया रसाची होय जगती³ । कठीणरूपें ॥ १४ ॥ नाना जळासि गंधी उठे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे । दिवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥ पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती । ते जीव मरतां जगती । नेमस्त होय ॥ १६ ॥ जितुका कांहीं झाला आकार । तितुक्यास पृथ्वी आधार । होती जाती प्राणिमात्र । शेवटीं पृथ्वी ॥ १७ ॥ हें किती म्हणोन सांगावें । विवेकें अवघेंचि जाणावें । खाजणीभाजणीचें⁴ समजावें । मूळ तैसें ॥ १८ ॥ आप आळोन पृथ्वी झाली । पुनः आपींच विराली । अग्नियोगें भस्म झाली । म्हणोनियां ॥ १९ ॥ आप झालें तेजा- १. सोनें, रुपें इत्यादि. २. बारीक कण. ३. पृथ्वी. ४. उभारणी-संहारणीचें.
१५ वा.] चंचललक्षण. ३३७ पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें परब्रह्म जों कळेना । तों जन्ममृत्यु चुकेना । चार खाणी जीव नाना । होणें घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचल । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळास नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे झालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हैं प्रचीतीनें जाणावें । विचारें खुणेसि बाणावें । विचारेंविण शिणावें । तेंचि मूर्खपण ॥ २७ ॥ ज्ञानी भिडेनें दडपिला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करिती गलबला । मायेमध्यें ॥ २८ ॥ माया निःशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ विशेष मायेचें निर- सन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥ लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानानेंचि बुडाला । या कारणें प्रत्ययाला । पाहिलेंचि पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके शाश्वतब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. चंचललक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ दोघां ऐशीं तीनै चालती । अगुणीं अष्टधा प्रकृती । अधोध्वं सांडून वर्तती । इंद्रफणी ऐशी ॥ १ ॥ पर्णतोंडें भक्षितो पँण- जा । मूँल बापासैं मौरी वोर्जा । चुकाऱ्या गेला रोंजा । चौघांजणांचा १. अनुभवाचें ज्ञान. २. प्रकृति व पुरुष; म्हणज मुळमाया. ३. त्रिगुण; म्हणजे गुणमाया. ४. निर्गुणाचे ठिकाणीं. ५. खालीं नव्हे, वर नव्हे; इंद्रधनुष्याप्रमाणें अंत- रिक्षांत. ६. अग्नि, आप, पृथ्वी व वनस्पती असा उत्पत्तिक्रम आहे; तेव्हां वन- -स्पत्यादिकांस अग्नि भक्षण करितो असा अर्थ. (?) ७. पंचभूतांच्या उत्पत्तिक्रमानें पाहतां पृथ्वी उदकास शोषते, उदक तेजास विझावितें, इत्यादि. (?) ८. कुशलतेनें. ९. पृथ्वी, आप, तेज व वायु यांचें मुख्य तत्त्व आकाश; अंतरात्मा.
३३८ श्रीदासबोध. [ दशक ॥ २ ॥ देवे देवालयामध्यें लपला। देऊळ पूजितां पावे त्याला। सृष्टीमध्यें ज्याला त्याला। ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोन्ही नामें एकास पडिलीं। लोकीं नेमस्त कल्पिलीं। विवेकें प्रत्ययें पाहिलीं। तों एकचि नाम ॥ ४ ॥ नाहीं पुरुष ना वनिता। लोकीं कल्पिलें तत्त्वतां। याचा बरा शोध घेतां। कांहीं नाहीं ॥ ५ ॥ स्त्री नदी पुरुष खळाळ। ऐसें बोलती सकळ। विवरोन पहा- तां निवळ। देह नाहीं ॥ ६ ॥ आपण आपणास कळेना। पाहों जातां आ- कळेना। कशास कांहींच मिळेना। उदंडपणें ॥७॥ एकलाचि उदंड झाला। उदंडाचि एकला पडिला। आपणासि आपला गलबला। सोसवेना ॥ ८ ॥ एक असोन फुटी पडली। फुटी असोन स्थिति एकली। विचित्र कळा पै- सावली। प्राणिमात्रीं ॥ ९ ॥ वल्लीमध्यें जळ संचरे। कोरडेपणें हें वावरे। [L1
१५ वा. ] चातुर्यलक्षण. ३३९ समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहून येती निरंजन । चं- चळचक्रें² उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ एकदां जाऊन पाहून आले । मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षू लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना श- रीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठायीं ॥ २४।¹ चंचळ धांवे एकीकडे । वोस पडे दुसरीकडे । चंचळ पुरे सर्वांकडे । हैं तों घ- डेना ॥ २५ ॥ चंचळ चंचळास पुरेना । अवघें चंचळ विवरेना । निश्चळ अ- पार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥ गगनीं चालिली हवावी³ । कैसी पावेल पार पदवी । जातां मध्येंच विझावी । हा स्वभाव तिचा ॥ २७ ॥ मनो- धर्म एकदेशी । कैंची आकळील वस्तूसी । निगुर्ण सांडून अपैसीं⁴ । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥ नाहीं सारासार विचार । तेथें अवघा एककार । खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥ ब्रह्मांडाचें महाकारण । तेथूनि हें पंचीकरण । महावाक्याचें विवरण । वेगळेंच असे ॥ ३० ॥ महत्तत्व मह- द्भूत । तोचि जाणावा भगवंत । उपासना हे समाप्त । येथून झाली ॥ ३१ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड⁵ वेद हे प्रमाण । ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चंचल- लक्षणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. चातुर्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ पिल्यापासून⁶ कृष्णें⁷ झालें । भूमंडळीं विस्तारिलें । तेणेंविण उमजलें । हें तों घटेना ॥ १ ॥ आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण । अधम आणि उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥ महीसुत⁸ सर- साविला । सरसाऊन द्विधा केला । उभयतां मिळोन चालला । कार्यभाग ॥ ३ ॥ श्वेताश्वेतास⁹ गांठी पडतां । मध्यें कृष्णें¹⁰ मिश्रित होतां । इहलोक- सार्थकतैं¹¹ । होत आहे ॥ ४ ॥ विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होय चतुर । सद्यःप्रचीत साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ सकळांस जें मान्य ।
१. शुद्ध ब्रह्म. २. मायेचें चक्र. ३. बाण. ४. आपल्याशींच. ५. तीन भागांचा. ६. सर्वांचें मूळ ब्रह्म त्यापासून. ७. माया. ८. अहंकार. ९. सत्त्वगुणाची व रजो- गुणाची. १०. तमोगुण. ११. जगाची राइटी.