भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 370, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 370

१५ वा. ] श्रेष्ठ अंतरात्मा. ३३५ दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥११॥ नव्हे कोणास म्हणावें । सामा- न्यास काय ठावें । कोण कोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥१२॥ धाकुटा भाग्यास चढला । तरी तुच्छ करिती तयाला । या कारणें सलगीच्या लो- कांला । दुरी धरावें ॥१३॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण । उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानीना । आधीं उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥ वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्या धाकुटेपण नाहीं । ऐसें बोलती त्यांस नाहीं । शहाणपण ॥ १६ ॥ गुणांविण वडिलपण । हें तों अवघेंच अप्रमाण । त्याची प्रचीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥ तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें । नेणतां पुढें, कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥ तस्मात् वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा । हें प्रगटचि आहे आम्हां । शब्द नाहीं ॥१९॥ या कारणें कोणी एकें । शाहाणपण शिकावें विवेकें । विवेक न शिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥ तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मास येऊन काय केलें । बळेंच सांडीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥ सगट बायका शिव्या देती । सांडीस पडला ऐसें म्हणती । मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥ ऐसें कोणी एकें न करावें । सर्व सार्थकाचि करावें । कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ शाहण्यास कोणी तरी बाहती । मूर्खास लोक दवडून देती । जीवास आवडे संपत्ती । तरी शाहणें व्हावें ॥ २४ ॥ अहो या शहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें । परंतु शहाण- पण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५॥ जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा झाला । जनीं शाहण्या मनुष्याला । काय उणें ॥ २६ ॥ आपुलें हित न करी लौकिकीं । तो जाणावा आत्मघातकी । त्या मूर्खा एवढा पात- की । आणिक नाहीं ॥ २७ ॥ आपण संसारीं कष्टतो । लोकां करवीं रागे- जोन घेतो । जनांमध्यें शहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥ साधकां शिक- विलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें । मानेना तरी सांडावें । एकीकडे ॥ २९ ॥ तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्ष्यास लावितां लक्ष । हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसां ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके श्रेष्ठअंतरात्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥