दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 371, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३३६ श्रीदासबोध. [ दशक ४. शाश्वत ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीपासून झालीं झाडें । झाडापासून होती लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होय ॥१॥ पृथ्वीपासून वेल होती । नाना जिन्नस फांपावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होय ॥ २ ॥ नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें कारिती भोजनें । नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होय ॥ ३ ॥ नाना पक्ष्यादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंच झालें । वाळोन भस्म होऊन गेलें । पुनः पृथ्वी ॥४॥ मनुष्यें मरतांच ऐका । कृमि भस्म मृत्तिका । ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥ नाना तृणें पदार्थ कुजती । पुढें त्यांची होय माती । नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥ पदार्थ दाटले अपार । किती सांगावा विस्तार । पृथ्वी- वांचून थार । कोणास नाहीं ॥ ७ ॥ झाडपाले आणि तृण । पशु भक्षितां होतें शेण । खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥ उत्पत्ति स्थिति संहारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें । जितुकें होतें आणि जातें । पुनः पृथ्वी ॥ ९ ॥ नाना बीजांचिया राशी । विरुढोन लागती गगनासी । पुढें शेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥१०॥ लोक नाना धातु¹ पुरिती । बहुतां दिवसां होय माती । सुवर्ण पाषाणांची गती । तैसीच आहे ॥११॥ मातीचें होतें सुवर्ण । आणि मृत्तिकेचे होती पाषाण । महा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होय ॥ १२ ॥ सुवर्णाचें रजें² होतें । रज शेवटीं कुजोन जातें । रस होऊन वितुळतें । पुनः पृथ्वी ॥ १३ ॥ पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें भस्म होती । तया रसाची होय जगती³ । कठीणरूपें ॥ १४ ॥ नाना जळासि गंधी उठे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे । दिवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥ पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती । ते जीव मरतां जगती । नेमस्त होय ॥ १६ ॥ जितुका कांहीं झाला आकार । तितुक्यास पृथ्वी आधार । होती जाती प्राणिमात्र । शेवटीं पृथ्वी ॥ १७ ॥ हें किती म्हणोन सांगावें । विवेकें अवघेंचि जाणावें । खाजणीभाजणीचें⁴ समजावें । मूळ तैसें ॥ १८ ॥ आप आळोन पृथ्वी झाली । पुनः आपींच विराली । अग्नियोगें भस्म झाली । म्हणोनियां ॥ १९ ॥ आप झालें तेजा- १. सोनें, रुपें इत्यादि. २. बारीक कण. ३. पृथ्वी. ४. उभारणी-संहारणीचें.