दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 372, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५ वा.] चंचललक्षण. ३३७ पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें परब्रह्म जों कळेना । तों जन्ममृत्यु चुकेना । चार खाणी जीव नाना । होणें घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचल । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळास नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे झालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हैं प्रचीतीनें जाणावें । विचारें खुणेसि बाणावें । विचारेंविण शिणावें । तेंचि मूर्खपण ॥ २७ ॥ ज्ञानी भिडेनें दडपिला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करिती गलबला । मायेमध्यें ॥ २८ ॥ माया निःशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ विशेष मायेचें निर- सन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥ लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानानेंचि बुडाला । या कारणें प्रत्ययाला । पाहिलेंचि पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके शाश्वतब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. चंचललक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ दोघां ऐशीं तीनै चालती । अगुणीं अष्टधा प्रकृती । अधोध्वं सांडून वर्तती । इंद्रफणी ऐशी ॥ १ ॥ पर्णतोंडें भक्षितो पँण- जा । मूँल बापासैं मौरी वोर्जा । चुकाऱ्या गेला रोंजा । चौघांजणांचा १. अनुभवाचें ज्ञान. २. प्रकृति व पुरुष; म्हणज मुळमाया. ३. त्रिगुण; म्हणजे गुणमाया. ४. निर्गुणाचे ठिकाणीं. ५. खालीं नव्हे, वर नव्हे; इंद्रधनुष्याप्रमाणें अंत- रिक्षांत. ६. अग्नि, आप, पृथ्वी व वनस्पती असा उत्पत्तिक्रम आहे; तेव्हां वन- -स्पत्यादिकांस अग्नि भक्षण करितो असा अर्थ. (?) ७. पंचभूतांच्या उत्पत्तिक्रमानें पाहतां पृथ्वी उदकास शोषते, उदक तेजास विझावितें, इत्यादि. (?) ८. कुशलतेनें. ९. पृथ्वी, आप, तेज व वायु यांचें मुख्य तत्त्व आकाश; अंतरात्मा.