दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१५ वा.] चंचललक्षण. ३३७ पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें परब्रह्म जों कळेना । तों जन्ममृत्यु चुकेना । चार खाणी जीव नाना । होणें घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचल । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळास नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे झालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हैं प्रचीतीनें जाणावें । विचारें खुणेसि बाणावें । विचारेंविण शिणावें । तेंचि मूर्खपण ॥ २७ ॥ ज्ञानी भिडेनें दडपिला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करिती गलबला । मायेमध्यें ॥ २८ ॥ माया निःशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ विशेष मायेचें निर- सन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥ लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानानेंचि बुडाला । या कारणें प्रत्ययाला । पाहिलेंचि पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके शाश्वतब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. चंचललक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ दोघां ऐशीं तीनै चालती । अगुणीं अष्टधा प्रकृती । अधोध्वं सांडून वर्तती । इंद्रफणी ऐशी ॥ १ ॥ पर्णतोंडें भक्षितो पँण- जा । मूँल बापासैं मौरी वोर्जा । चुकाऱ्या गेला रोंजा । चौघांजणांचा १. अनुभवाचें ज्ञान. २. प्रकृति व पुरुष; म्हणज मुळमाया. ३. त्रिगुण; म्हणजे गुणमाया. ४. निर्गुणाचे ठिकाणीं. ५. खालीं नव्हे, वर नव्हे; इंद्रधनुष्याप्रमाणें अंत- रिक्षांत. ६. अग्नि, आप, पृथ्वी व वनस्पती असा उत्पत्तिक्रम आहे; तेव्हां वन- -स्पत्यादिकांस अग्नि भक्षण करितो असा अर्थ. (?) ७. पंचभूतांच्या उत्पत्तिक्रमानें पाहतां पृथ्वी उदकास शोषते, उदक तेजास विझावितें, इत्यादि. (?) ८. कुशलतेनें. ९. पृथ्वी, आप, तेज व वायु यांचें मुख्य तत्त्व आकाश; अंतरात्मा.
३३८ श्रीदासबोध. [ दशक ॥ २ ॥ देवे देवालयामध्यें लपला। देऊळ पूजितां पावे त्याला। सृष्टीमध्यें ज्याला त्याला। ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोन्ही नामें एकास पडिलीं। लोकीं नेमस्त कल्पिलीं। विवेकें प्रत्ययें पाहिलीं। तों एकचि नाम ॥ ४ ॥ नाहीं पुरुष ना वनिता। लोकीं कल्पिलें तत्त्वतां। याचा बरा शोध घेतां। कांहीं नाहीं ॥ ५ ॥ स्त्री नदी पुरुष खळाळ। ऐसें बोलती सकळ। विवरोन पहा- तां निवळ। देह नाहीं ॥ ६ ॥ आपण आपणास कळेना। पाहों जातां आ- कळेना। कशास कांहींच मिळेना। उदंडपणें ॥७॥ एकलाचि उदंड झाला। उदंडाचि एकला पडिला। आपणासि आपला गलबला। सोसवेना ॥ ८ ॥ एक असोन फुटी पडली। फुटी असोन स्थिति एकली। विचित्र कळा पै- सावली। प्राणिमात्रीं ॥ ९ ॥ वल्लीमध्यें जळ संचरे। कोरडेपणें हें वावरे। [L1
१५ वा. ] चातुर्यलक्षण. ३३९ समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहून येती निरंजन । चं- चळचक्रें² उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ एकदां जाऊन पाहून आले । मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षू लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना श- रीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठायीं ॥ २४।¹ चंचळ धांवे एकीकडे । वोस पडे दुसरीकडे । चंचळ पुरे सर्वांकडे । हैं तों घ- डेना ॥ २५ ॥ चंचळ चंचळास पुरेना । अवघें चंचळ विवरेना । निश्चळ अ- पार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥ गगनीं चालिली हवावी³ । कैसी पावेल पार पदवी । जातां मध्येंच विझावी । हा स्वभाव तिचा ॥ २७ ॥ मनो- धर्म एकदेशी । कैंची आकळील वस्तूसी । निगुर्ण सांडून अपैसीं⁴ । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥ नाहीं सारासार विचार । तेथें अवघा एककार । खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥ ब्रह्मांडाचें महाकारण । तेथूनि हें पंचीकरण । महावाक्याचें विवरण । वेगळेंच असे ॥ ३० ॥ महत्तत्व मह- द्भूत । तोचि जाणावा भगवंत । उपासना हे समाप्त । येथून झाली ॥ ३१ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड⁵ वेद हे प्रमाण । ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चंचल- लक्षणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. चातुर्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ पिल्यापासून⁶ कृष्णें⁷ झालें । भूमंडळीं विस्तारिलें । तेणेंविण उमजलें । हें तों घटेना ॥ १ ॥ आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण । अधम आणि उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥ महीसुत⁸ सर- साविला । सरसाऊन द्विधा केला । उभयतां मिळोन चालला । कार्यभाग ॥ ३ ॥ श्वेताश्वेतास⁹ गांठी पडतां । मध्यें कृष्णें¹⁰ मिश्रित होतां । इहलोक- सार्थकतैं¹¹ । होत आहे ॥ ४ ॥ विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होय चतुर । सद्यःप्रचीत साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ सकळांस जें मान्य ।
१. शुद्ध ब्रह्म. २. मायेचें चक्र. ३. बाण. ४. आपल्याशींच. ५. तीन भागांचा. ६. सर्वांचें मूळ ब्रह्म त्यापासून. ७. माया. ८. अहंकार. ९. सत्त्वगुणाची व रजो- गुणाची. १०. तमोगुण. ११. जगाची राइटी.
३४० श्रीदासबोध. [ दशक
तेंचि होतसे सामान्य । सामान्यास अनन्य । होइजेत नाहीं ॥ ६ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टींची गुप्त रेखा । तत्त्वाचा अनुभव सारिखा । होत नाहीं ॥ ७ ॥ चौदा पिढ्यांचे पवाडे¹ । सांगती ते शाहणे कीं वेडे । ऐ- क्यता घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥ रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येते । डोळेझांकणी करावी ते । काय निमित्त ॥ ९ ॥ बहु- तांचे बोलीं लागले । ते प्राणी अनुमानीं बुडाले । मुख्य निश्चय चुकले । प्रत्ययाचा ॥ १० ॥ उडंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावें । खरें खोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥ कोणासि नव्हे म्हणों नये । समजावे अपाय उपाय । प्रत्यय घ्यावा बहुत काय । बोलोनियां ॥ १२ ॥ माणूस हेकाड आणि कौंचें² । मान्य करावें तयाचें । येणेंप्रकारें बहुतांचें । अंतर रा- खावें ॥ १३ ॥ अंतरीं पीळ पेंच वळसा³ । तोचि वाढवी बहुवसा । तरी मग शाहणा कैसा । निवहूं जाणे ॥ १४ ॥ वेडे करावे शाहाणे । तरीच जिणें श्लाघ्यवाणें । उगेंच वादांगें⁴ वाढवणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥ मिळोन जाऊन मिळवावे । पडी घेऊन उलथावे । कांहींच कळों न द्यावें । विवेक- बळें ॥ १६ ॥ दुसऱ्याचे चालणीं चालावें । दुसऱ्याचे बोलणीं बोलावें । दु- सऱ्याच्या मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥ जो दुसऱ्याच्या हितावरी । तो विपटें⁵ कांहींच न करी । मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥ आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळूहळू उकलावें । नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥ हेकाडास हेकाड मिळाला । तेथें गलबलाचि झाला । कलह उठतां चातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥ उगीच करिती बडबड । परी करून दाखवणें हें अवघड । परस्थळ साधनें जड । कठिन आहे ॥ २१ ॥ धक्के चपेटा सोसावे । नीच शब्द सोशीत जावे । प्रस्ताबोन परावे । आपले होती ॥ २२ ॥ प्रसंग जाणोन बोलावें । जाणपण कांहींच न घ्यावें । लीनता धरून जावें । जेथें तेथें ॥ २३ ॥ कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें । भिक्षामिषें लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥ २४ ॥ भोंवर्तीं कांहीं तरी सांपडे । विचक्षण लोकीं मैत्री घडे । उगेंच बैसतां कांहीं न घडे । फिरणें⁶ विवरणें ॥ २५ ॥ सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें । जाऊं १. वर्णनें. २. कच्चें. ३. कपट. ४. वादाचा प्रसंग. ५. अनिष्ट. ६. फिरल्यानें.
१५ वा. ] अधोर्ध्वलक्षण. ३४१ नये तिकडे जावें । विवेकेंसहित ॥ २६ ॥ नाना जिन्नस पाठांतरें । नि- वती सकळांचीं अंतरें । लिहोन देतां परोपकारें । सीमा सांडिली ॥ २७ ॥ जैसें जयास पाहिजे । तैसें तयासि दीजे । तरी मग श्रेष्ठ होइजे । सकळां मान्य ॥ २८ ॥ भूमंडळीं सकळां मान्य । तो म्हणूं नये सामान्य । कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥ ऐशीं चातुर्याचीं लक्षणें । चातुर्यै दिग्विजय करणें । मग तयास काय उणें । जेथें तेथें ॥ ३० ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः स- मासः ॥ ६ ॥ ७. अधोर्ध्वलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ नाना विकारांचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । अचंचळीं जे चंचल । सूक्ष्मरूपें ॥ १ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळींच्या मूळसंकल्पाची । वोळखी षड्गुणेश्वराची । येणेंचि न्यायें ॥ २ ॥ प्रकृति- पुरुष शिवशक्ती । अर्धनारीनटेश्वर म्हणती । परी ते अवघी जगज्योती । मूळ त्यासी ॥ ३ ॥ संकल्पाचें लक्षण । तोचि मूळमाया जाण । वायु आणि त्रिगुण । पंचभूतें ॥ ४ ॥ पाहतां कोणी एक वेल । त्याच्या मुळ्या असती खोल । पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासीं ॥ ५ ॥ याहि वेगळे नाना रंग । आकार विकार तरंग । नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥ तेंचि मूळ फोडून पाहतां । कांहींच नाहीं वाटे आतां । पुढें वाढतां वाढतां । दिसों लागे ॥ ७ ॥ कड्यावरील वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला । फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥ तैशी मूळमाया जाण । पंचभूतें आणि त्रिगुण । मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥ अखंड वेल पुढें वाढला । नाना विकारीं शोभला । विकाराचा विकार झाला । असं- भाव्य ॥ १० ॥ नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडें वाढलीं । अनंत अग्रें चालिलीं । सृष्टीमध्यें ॥ ११ ॥ कित्येक फळें तीं पडती । सर्वेंचि आणिक निघती । ऐशीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥ एक वेलचि वा- ळले । पुनः तेथेंचि फुटले । ऐसे आले आणि गेले । कितीएक ॥१३॥ पानें झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रीती । मध्यें जीव हे जगती ।
असंभाव्य ॥ १४ ॥ अवघा वेलचि करपतां । मुळापासोन पुनः होतो । ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥ मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययज्ञानें निर्मूळ केलें । तरी मग वाढणोंचि राहिलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥ मुळीं बीज शेवटीं बीज । मध्यें जळरूप बोज । ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ।: १७ ॥ मुळामधील ज्या गोष्टी । सांगतां हे बीजसृष्टी । जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥ जातो येतो पुनः जातो । ऐशा प्रत्यावृत्ति करितो । परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥ न घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहीं तरी लागे जाणावें । अंतरींच पडे ठावें । सकळांस कैंचें ॥ २० ॥ तेणेंसीच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती । दिसेना ते काय करिती । बापुडे लोक ॥ २१ विषयभोग तेणेंचि घडे । तेणें- विण कांहींच न घडे । स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥ जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदंतर । शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥ अंगुळीची अंगुळीस वेदना । एकीची एकीस कळेना । हात पाय अवयव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥ अवयवाचें अवयव नेणे । मग तो पराचें काय जाणे । परांतर या कारणें । जाणवेना ॥ २५ ॥ एकेंचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रें भेद दिसती । खुडिलीं तितुकींच सुकती । येर तीं टवटवीत ॥ २६ ॥ येणेंचि न्यायें भेद झाला । कळेना एकाचें एकाला । जाणपणें आत्म्याला । भेद नाहीं ॥ २७ ॥ आत्मत्वीं भेद न दिसे । हें प्रकृ- त्तिकारितां भासे । तरि जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥ देखोन ऐकोन जाणती । शहाणे अंतरीं परीक्षिती । धूर्त ते अवघेचि समजती । गुप्तरूपें ॥ २९ ॥ जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी । धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥ आधीं मनोगत पाहती । मग विश्वास धरिती । प्राणिमात्र येणेंचि रीती । वर्तताहे ॥ ३१ ॥ स्मरणामागें विस्मरण । रोकडी प्रचीत प्रमाण । आपलें ठेवणें आपण । चुकताहे ॥ ३२ ॥ आपलेंच आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना । उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥ ऐसें हें चंचल चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र । झाला राव अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥ स्मरण म्हणिजे देव । विस्मरण १. फेरे. २. दृश्य आकार. ३. ब्रम्हाकडे. ४. मग.
१५ वा. ] सूक्ष्म जीव. ३४३ म्हणिजे दानव । स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥ म्हणोन दैवी आणि दानवी । संपत्ती द्विधा जाणावी । प्रचीत मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥ विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा ओळ- खावा । नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥ स्थूळें स्थूळ खाजवावें । सूक्ष्में सूक्ष्म समजावें । खुणेनें खुणेसि बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥ वि- चारें जाणावा विचार । अंतरें जाणावें अंतर । अंतरें जाणावें परांतर । होऊनियां ॥ ३९ ॥ स्मरणामाजी विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण । एक- देशी परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥ पुढें शिके मागें विसरे । पुढें उजेड मागें अंधारें । पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥ तुर्या जाणा- वी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण । उभयतां शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके अधोध्वं- निरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. सूक्ष्म जीव. श्रीगणेशाय नमः ॥ रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपट थोडें । युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयांमध्ये ॥ १ ॥ ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती । अंतःकरणपंचकाची स्थिती । तेथेंहि आहे ॥ २ ॥ त्या- पुरतें त्यांचें ज्ञान । विषय इंद्रियें समान । सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहतो कोण ॥ ३ ॥ त्यास मुंगी महाथोर । नेणों चालिला कुंजरें । मुंगीस सुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥ ते मुंगीसमान शरीरें । उदंड असती लहान थोरें । समस्तांमध्ये जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥ ऐशिया किडियांचा संभार । उदंड दाटला विस्तार । अत्यंत साक्षेपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥ नाना क्षेत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वताएवढे । आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥ पक्ष्यायेवढें लहान नाहीं । पक्ष्यायेवढें थोर नाहीं । सर्प आणि मत्स्य पाहीं । येणेंचि पाडें ॥ ८ ॥ मुंगीपासून थोर- थोरें । चढती वाढती शरीरें । त्यांचीं निर्धारीतां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥ १. आसुरी. २. सदगुणसंपत्ति. ३. समाधि. ४. झोंप. ५. हत्ती. ६. जीव तोच ईश्वर, त्यानें. ७. प्रयत्नशील. ८. प्रमाणानें.
३४४ श्रीदासबोध. [ दशक नाना वर्ण नाना रंग । नाना जीवांचे तरंग । एक सुरंग एक विरंग । किती म्हणोन सांगावें ॥ १० ॥ एक सुकुमारें एक कठोरें । निर्माण केलीं जगदी- श्वरें । सुवर्णासारिखीं शरीरें । देदीप्यमानें ॥ ११ ॥ शरीरभेद अहंकारभेद । वाचाभेद देहभेद । अंतरीं वसिजे अभेद । एकरूपें ॥ १२ ॥ एक त्रासकें एक मारकें । पाहों जातां नाना कौतुकें । कितीएक अमोलिकें । सृष्टीमध्यें ॥१३॥ ऐशीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । आपुल्यापुरतें जाणो- न राहे । किंचिन्मात्र ॥ १४ ॥ नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा । ब्रह्मांडाबाहेरील नीरें । कोण पाहे ॥ १५ ॥ त्या नीरामध्ये जीव असती । पाहों जातां असंख्याती । त्या विशाल जीवांची स्थिती । कोण जाणे ॥ १६ ॥ जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव । पाहतां याचा अभिप्राय । उदंड असे ॥ १७ ॥ भूगर्भी नाना नीरें । त्या नीरामध्ये शरीरें । नाना जिन्नस लहान थोरें । कोण जाणे ॥ १८ ॥ एक प्राणी अंतरिक्ष असती । तिहीं नाहीं देखिली क्षिती१ । वरिच्यावरी उडोन जाती । पक्ष फुट- ल्यानंतर ॥ १९ ॥ नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें । चौऱ्यायशीं लक्ष योनिप्रकार । कोण जाणे ॥ २० ॥ उष्ण तेज वेगळें करुनी । जेथें तेथें जीवयोनी । कल्पनेपासून होतो प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥ एक नाना सामर्थ्यें केले । एक इच्छेपासून झाले । एक शब्दासारि- खे पावले । शापदेह ॥ २२ ॥ एक देह बाजींगरीचे । एक देह वोडंबैरीचे । एक देह देवतांचे । नाना प्रकारें ॥ २३ ॥ एक क्रोधापासून झाले । एक तपापासून जन्मले । एक उःशापें पावले । पूर्व देह ॥ २४ ॥ ऐसें भगवं- ताचें करणें । किती म्हणोन सांगणें । विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥ नाना अवघड करणी केली । कोणी देखिली ना ऐकिली । विचित्र कळा समजली । पाहिजे सर्व ॥२६॥ थोडें बहुत समजलें । पोटापुरती विद्या शिकले । प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७ ॥ ज्ञानी एक अंतरात्मा । सर्वांमध्ये सर्वात्मा । त्याचा कळावया महिमा । बुद्धी कैंची ॥ ॥ २८ ॥ सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड । त्या पिंडामध्यें उदंड । १. पृथ्वी. २. पाण्यास. ३. पृथ्वांचे पोटीं. ४. पक्षी. ५. मनुष्यें,, पशु वगैरे. ६. जादूचे. ७. राक्षसी मायेचे. ८. सात कंचुक म्हणजे आवरणें ज्यास आहेत तें.
१५ वा. ] पिंडोत्पत्ति. ३४५ प्राणी असती ॥ २९ ॥ आपुल्या देहांतील न कळे । मग तें अवघें कैंचें कळे । लोक होती उताविळे । अल्प ज्ञानें ॥ ३० ॥ अणुरेणुऐसे जिन्नस । त्यांचे आम्ही विराटपुरुष । आमुचें उदंडाच आयुष्य । त्यांच्या हिशोबें ॥ ३१ ॥ त्यांच्या रीती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक । जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥ धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अं- तःकर्णीं । उगीच अहंता पापिणी । वोढा लावी ॥ ३३ ॥ अहंता सांडून विवरणें । कित्येक देवाचें करणें । पाहतां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥ थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिताती रडाया । शरीर अवघें पडा- वया । वेळ नाहीं ॥ ३५ ॥ कुश्चिळ ठायीं जन्मलें । आणि कुश्चिळ रसांचि वाढलें । यास म्हणती थोरलें । कोणत्या हिशोबें ॥ ३६ ॥ कुश्चिळ आणि क्षणभंगुर । अखंड व्यथा चिंतांतुर । लोक उगेच म्हणती थोर । वेडेपणें ॥ ३७ ॥ काया माँया दो दिवसांची । आदिअंतीं अवघें ची ची । झांकातापा करून उगेची । थोरीव दाविती ॥ ३८ ॥ झांकिलें तरी उपंदरें पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे । जो कोणी विवेकीं पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥ उगेंच कासया तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें । विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमो- त्तम ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके सूक्ष्मजीवनिरू- पणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. पिंडोत्पत्ति. श्रीगणेशाय नमः ॥ चौखाणीचे प्राणी होती । अवघे उदकेंचि वाढती । ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥ तत्त्वाचें शरीर झालें । अंतरा- त्म्यासगट वळलें । त्याचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥ शरत्काळींचीं शरीरें । पिळपिळीं झिरपती नीरें । उभय रेत एकत्रें । मिस- ळती रक्तीं ॥ ३ ॥ अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस । रसद्रव्यें सावकाश । वाढों लागे ॥ ४ ॥ वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठिण झालें । पुढें उ- दक पैसावलें । नाना अवयवीं ॥ ५ ॥ संपूर्ण होतां बाहेर पडे । भूमीस पडतां मग तें रडे । अवघ्यांचें अवघें घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥ कुंडी वाढे कुबुद्धि १. मग. २. क्षणभंगुर ३. संपत्ति. ४. जन्ममरणकाळीं. ५. उघडें. ६. शरीर-
३४६ श्रीदासबोध. [ दशक वाढे । मुळापासूनी अवघें घडें । अवघेंच वाढे आणि मोडे । देखतां देखतां मोड १ ॥ ७ ॥ पुढें अवघें शरीर । दिवसेंदिवस जाहलें थोर । सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥ फळामध्यें बीज आलें । तेणें न्यायें येथें जाहलें । ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥ बीजें उदकें अंकुरती । उदक नसतां उडोन जाती । एके ठायीं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥ दोहींमध्यें असतां बीज । भिजोन अंकुर सहज । वाढतां वाढतां पुढें रिझें । उदंड जाहे ॥ ११ ॥ जिकडे मुळ्या धांव घेती । तिकडे अग्रें हेलावती । मुळें अग्रें द्विधा होती । बीजापासुनी ॥ १२ ॥ मुळ्या चालिल्या पाताळीं । झाडें धांवती अंतराळीं । नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥ फळांवडील सुमनें २ । सुमनां वडील पानें । पानांवडील अनुसंधानें ३ । काष्ठें अवघीं ॥ १४ ॥ काष्ठांवडील मुळ्या बारीक । मुळ्यांवडील तें उदक । उदक आळोनि कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥ याची ऐशी आहे प्रचीती । तेव्हां सकळां वडील जगती । जगतीवरील मूर्ती । आपोनारा४यणाची ॥ १६ ॥ तया- वडील अग्निदेव । अग्निवडील वायुदेव । वायुदेवावडील स्वभाव । अंतरात्म्या- चा ॥ १७ ॥ सकळां वडील अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणिजे दूर आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥ जवळीं असोन चुकलें । प्रत्ययास नाहींसें केलें उगेंचि आलें आणि गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥ म्हणोन सकळां वडील देव । त्यासि होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥ करी आपुला ब्यासंग । कदापि नव्हे ध्यान- भंग । बोलणें चालणें व्यंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥ जें वडीलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें । काय काय वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥ तो वडील जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष झाला । अल्प चेतनेनें तयाला । अल्प भाग्य ॥ २३ ॥ तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं । मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोठें ॥ २४ ॥ नारायण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी । या कारणें तोषवावी । कोणी तरी काया ५ ॥ २५ ॥ उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपालिती झाली । न कळे लीला परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६
पाहे कोण । पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥ उपासना सकळां ठायीं । अंतरात्मा कोठें नाहीं । या कारणें ठायीं ठायीं । रामें आटोपिलें ॥ २८॥ ऐशी माझी उपासना । आणितां न ये अनुमाना । नेऊनि घाली निरंजना- पैलीकडे ॥ २९ ॥ देवाकरितां कर्में चालतीं । देवाकरितां उपासक होती । देवाकरितां ज्ञानी असती । कितीएक ॥ ३० ॥ नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें । नेमकानेमक व्यस्ताव्यस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥ देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितकें घ्यावें । अधिकारासारखें बोलावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥ औवाहन विसर्जनें । ऐसेंचि बोलिलें वि- धानें । पूर्वपक्ष झाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥ वेदांत सिद्धांत घों- टांत । प्रचीत प्रमाण नेमस्त । पंचीकरण सोडून हित । वाक्यार्थ पाहावा ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके पिंडोत्पत्तिनिरूपणं नाम नवम समासः ॥ ९ ॥
१०. सिद्धांत. श्रीगणेशाय नमः ॥ गगनीं अवघेंच होत जातें । गगनाऐसें तगेना तें । निश्चळीं चंचल तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥ आंधार दाटला बळें । वाटे गगन झालें काळें । रविकिरणें तें पिवळें । सर्वैचि वाटे ॥ २ ॥ उदंड हिंव जेव्हां पडलें । गमे गगन थंड झालें । उष्णझळेनें वाळलें । ऐसें वाटे ॥ ३ ॥ ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें झालें आणि गेलें । आकाशासारखें तगलें । हें तों घ- डेना ॥ ४ ॥ उत्तम जाणिणेचा जिन्नस । समजोन पाहे सावकाश । निरा- भास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥ उदक पसरे वायु पसरे । अंतरात्मा अत्यंतचि पसरे । तत्त्वें तत्व अवघेंच पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥ चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें । विवरणेंचि निवडतें । प्राणि- मात्रांसी ॥ ७ ॥ विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी । झा- लियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन । तत्वनिरसन अनन्व । विवेकें होतें ॥ ९ ॥ वडिलास शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ झालें । देवभक्तपण गेलें । तये ठायीं,
१. मायेची उभारणी-संहारणी. २. रीत. ३. शंकावचन. ४. स्वानुभव.
३५८ श्रीदासबोध. [ दशक ॥ १०॥ ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळींच नाहीं। जैसें तैसें बोलों कांहीं। कळावया ॥ ११॥ अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति माव- ळली। वृत्तिशून्य कैसी झाली। स्थिति पहा ॥ १२ ॥ मुख्य शक्तिपात तो ऐसा। नाहीं चंचळाचा वळसो¹। निवांतीं निवांत कैसा। निर्विकारी ॥ १३॥ चंचळाचा विचार पालटे। तें चंचलचि तेथें आटे। चंचल निश्चळ बनवटे। हें तों घडेना ॥ १४ ॥ महावाक्याचा विचार। तेथें संन्याशासि अधिकार। दैवी कृपेचा जो नर। तोहि विवरोन पाहे ॥ १५॥ संन्यासी म्हणजे षडंगन्यासी²। विचारवंत सर्व संन्यासी। आपली करणी आपणा- पासीं। निश्चयेंसी ॥ १६ ॥ जगदीश वोळख्यावरी । तेथें कोण अनुमान करी। आतां असो हें विचारी। विचार जाणती ॥ १७॥ जे जे विचारी स- मजले। ते ते निःसंग होऊन गेले। देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान लक्षिती ॥ १८ ॥ लक्षीं बैसलें अलक्ष। उडोनि गेला पूर्वपक्ष। हेतूरूपें अं- तरसाक्ष। तोहि मावळला ॥ १९ ॥ आकाश आणि पाताळ। दोन्ही नामें अंतराळ। काढितां दृश्याचें पडळ⁵। अखंड⁴ झालें ॥ २०॥ तें तों अखंडचि आहे। मन उपाधि लक्षून पाहे। उपाधिनिरासें राहे। शब्द कैसा ॥ २१॥ शब्देंपर⁶ कल्पने पैर⁷। मनबुद्धि अगोचर⁸। विचारें पहावा विचार। अंत- र्यामीं³ ॥ २२ ॥ पहातां पहातां कळों येतें। कळलें तितुकें व्यर्थ जातें। अव- घड कैसें बोलावें तें। कोण्या प्रकारें ॥ २३ ॥ वाच्यार्थ वाच्यांशीं शोधिला। अलक्षीं लक्ष्यांश बुडाला। पुढें समजोन बोला। कोणी करी ॥ २४ ॥ शा- स्त्रास शोधीत गेला। तेणें ज्ञानी साच झाला। विकार सांडून मिळाला। निर्विकारीं ॥२५॥ दुःस्वप्न उदंड देखिलें। जागें होतां लटिकें झालें। पुनः जरी तें आठवलें। तरी तें मिथ्या ॥ २६ ॥ प्रारब्धयोगें देह असे। असे अथवा नासे। विचार अंतरीं बैसे। चलेना ऐसा ॥ २७ ॥ बीज अग्नीनें भाजलें। त्याचें वाढणेंचि खुंटलें। ज्ञात्यास तैसें झालें। वासनाबीज ॥२८॥ विचारें निश्चळ झाली बुद्धि। बुद्धीपासीं कार्यसिद्धी। पाहतां वडिलांची बुद्धि। निश्चळीं गेली ॥ २९ ॥ निश्चळास ध्यातां निश्चळ। चंचळास ध्यातां १. वेष्टन. २. षड्विकारांचा त्याग करणारा. ३. चित्तांत. ४. ब्रह्म. ५. पडदा. ६. शब्दातीत. ७. पलीकडे. ८. अगम्य.
१६ वा. ] वाल्मीकिस्तवन. ३४९ चंचल । भूतांस ध्यातां केवळ । भूत होय ॥ ३० ॥ जो पावला शेवटवरी । तयास हें कांहींच न करी । अंतर्निष्ठा बाजिगिरी । तैसी माया ॥ ३१ ॥ मिथ्या ऐसें कळों आलें । विचारोन सदृढ झालें । अवघें भयचि उडालें । अकस्मात ॥३२॥ उपासनेचें उत्तीर्ण¹ व्हावें । भक्तें भजन वाढवावें । अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके सिद्धांतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३३७. दशक सोळावा. १. वाल्मीकिस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक । जयाचेनि हा त्रिलोक । पावन जाहला ॥ १ ॥ भविष्य आणि शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टी । धांडोळितां सकळ सृष्टी । श्रुत नव्हे ॥२॥ भवि- ष्याचें एक वचन । कदाचित झालें प्रमाण । तरी आश्चर्य मानिती जन । भूमंडळींचे ॥ ३ ॥ नसतां रघुनाथ अवतार । नाहीं पाहिला शास्त्राधार । रामकथेचा विस्तार । विस्तारला जेणें ॥ ४ ॥ ऐसा जयाचा वाग्विलास² । ऐकोनि संतोषला महेश । मग विभागिलें त्रैलोक्यास । शतकोटि रामायण ॥ ५ ॥ जयाचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें । राम- उपासकांस झालें । परम समाधान ॥ ६ ॥ ऋषि होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार । परी वाल्मीकासारिखा कवीश्वर । नै भूतो न भवि- ष्यति³ ॥ ७ ॥ पूर्वी केलीं दुष्ट कर्में । परी पावन झाला रामनामें । नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥ उफराटें नाम म्हणतां वाचे । पर्वत फुटले पापाचे । ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥९॥ वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन झालें । शुष्ककाष्ठीं अंकुर फुटले । तपो- बळें जयाच्या ॥ १० ॥ पूर्वी होता वाल्हा कोळी । जीवघातुक भूमंडळीं । तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषीश्वरीं ॥ ११ ॥ उपरति⁴ आणि १. उतराई. २. भाषाप्रावीण्य. ३. झालों नाहीं व होणारही नाहीं. ४. वैराग्य.
| ३५० | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देहांततपें१ पुण्यरूप । दुसरा जन्म जाहला ॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देहाचें वारुळ जाहलें । तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वल्मीक बोलिजे । म्हणोन वा- ल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसांचें ॥ १४ ॥ जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवीश्वरांमध्यें वरिष्ठ । जयाचें बोलणें स्पष्ट । निश्चयाचें ॥ १५॥ जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तीचें भूषण । ज्याची धारणा असाधारण । साधकांस दृढ करी ॥ १६ ॥ धन्य वाल्मीक ऋषी- श्वर । समर्थ जो कवीश्वर । तयासि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ १७॥ वाल्मीक ऋषि बोलिला नसता । तरी आम्हांस कैंची रामकथा । म्हणो- निया समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥ रघुनाथकीर्ति प्रगट केली । तेणें तयाची महिमा वाढली । भक्तमंडळी सुखी जाहली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥ आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमध्यें बुडाला । भूमं- डळीं उद्धरिला । बहुत लोक ॥ २० ॥ रघुनाथभक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार । त्या समस्तांचा किंकर२ । रामदास म्हणे ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वाल्मीकिस्तवननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. सूर्यस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा सूर्यवंश । सकळ वंशांमध्यें विशेष । मार्तंड-मंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥ सोमीं४ अंगीं असे लां- छन । एकापक्षीं ५ होय क्षीण । रविकिरण फांकतां आपण । कलाहीन होय ॥ २ ॥ या कारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे । ज्याच्या प्रकाशें उजेडे । प्राणिमात्रांसीं ॥३॥ नाना धर्म नाना कर्मे । उत्तम मध्यम अधमें । सुगमें दुर्गमें नित्यनेमें । सृष्टीमध्यें चालती ॥ ४ ॥ वेदशास्त्रे आणि पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें । संध्या स्नान पूजाविधानें । सूर्याविणें बापुडीं ॥५॥ नाना योग नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । जाती आपुलाल्या पंथें । सूर्य उदय झालिया ॥ ६ ॥ प्रापंचिक अथवा पारमार्थिक । कार्य करणें
• १. देहपात करणाऱ्या तपानें. २. सेवक. ३. सूर्य. ४. चंद्रावर. ५. कृष्णपक्षीं.
१६ वा. ] सूर्यस्तवन. ३५१ कोणी एक । दिवसैंविण निरर्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥ सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे । या कारणें कांहींच न चले । सूर्याविण ॥ ८ ॥ म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेही सूर्याचीच गती । थंड झालिया आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥ उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नसतां देहाचा । घात होतो ॥ १० ॥ या कारणें सूर्याविण । सहसा न चले कारण । श्रोते तुम्ही विच- क्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥ हरिहरांच्या अवतारमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती । यांपूर्वीं होता गभस्ती । आतांही आहे ॥ १२ ॥ जितुके सं- सारासी आले । तितुके सूर्याखालीं वर्तले । अंतीं देह त्यागून गेले । प्रभा- करो देखतां ॥ १३ ॥ चंद्र ऐलीकडे झाला । क्षीरसागर मंथूनि काढिला । चवदां रत्नांमध्ये आला । बंधु लक्ष्मीचा ॥ १४ ॥ विश्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लहान थोर । या कारणें दिवाकरें । श्रेष्ठाहून श्रेष्ठ ॥ १५ ॥ अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंच प्रत्यहीं येणें जाणें । या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥ दिवस नसतां अंधकार । सर्वांसि न कळे सारा- सार । दिवसैंविण तस्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥ सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें समोरें । तेजोराशि निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥ ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा । अगाध महिमा मानवी वाचा । काय म्हणोन वर्णावा ॥ १९ ॥ रघुनाथवंश पूर्वापार । एकाहून एक थोर । मज मतिमंदास हा विचार । काय कळे ॥२०॥ रघुनाथा- चा समुदाय । तेथें गुंतला अंतर्भाव । म्हणोनि वर्णितां महत्त्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥ सकळ दोषांचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार । स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके सूर्यस्तवननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
१. सूर्य. २. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, गाई, ऐरा- वत, रंभा, सात मुखांचा अश्व, विष, धनु, शंख, आणि अमृत हीं चौदा रत्नें. ३. घुबड. ४. मनोभाव. ५. वाणीनें दुर्बळ.
१५२ श्रीदासबोध. [ दशक ३. पृथ्विस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हे बसुमती । इचा महिमा वर्णावा किती । प्राणिमात्र तितुके राहती । तिच्या आधारें ॥ १ ॥ अंतरिक्ष राहती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव । देह जड नसतां जीव । कैसे लगती ॥२॥ ज्वालिती पोळिती कुदाळिती । नांगरती उकरिती खणिती । मळमूत्र तिज- वरी करिती । आणि वमनें ॥ ३ ॥ नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंचा थार । देहांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥ बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं । नाना धातु द्रव्य तेंही । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥ एकास एक संहारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमि सांडूनि जाती । कोणीकडे ॥ ६ ॥ गड कोट पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें¹ । देव दा- नव मानवां राहणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥ नाना रत्नें हिरे परिस । नाना धातु द्रव्यांस । गुप्त प्रगट करावयास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥ मेरु मंदर हिमाचल । नाना अष्ट² कुळाचॅल । नाना पक्षी मत्स्य व्याळ³ । भूमंडळीं ॥ ९ ॥ नाना समुद्रांपैलीकडे । भोवंतें आवरणोदकाचें कडें । असंभाव्य उठले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥ त्यामध्यें गुप्त विवरें । लहान थोरें अपारें । तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥ आवरणोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार । उदंड दाटले जलचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥ त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणि घन । फुटों शकेना जीवन । कोणीकडे ॥ १३ ॥ ह्या प्रभंजनास⁴ आधार । कठिणपणें अहंकार । ऐसा हा भूगोलाचा पार । कोण जाणे ॥ १४ ॥ नाना पदार्थांच्या खाणी । धातु- स्वांमंच्या वाटणी । कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥ नाना द्वीपें नाना खंडें । वसती उँद्रसें⁵ उदंडें । तेथें नाना जीवांचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥ मेरूर्भोवते कडे कापले । असंभाव्य कडोशे पडिले । निबिड तरु लागले । नानाजिनसी ॥ १७ ॥ त्यासन्निध लोकालोक⁶ । जेथें सूर्याचें फिरे चाकँ⁷ । चंद्राद्रि द्रोणाद्रि मैनाक । महागिरी ॥ १८ ॥ नाना देशीं पाषाण- १. फिरण्यानें. २. कुलाचल सात प्रसिद्ध आहेतः-महेंद्रो मलयः सह्यः शक्तिमान् मधमादनः ॥ विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ३. सर्प. ४. वायूंस. ५. ओसाड. ६. एक पर्वत. ७. रथ परत फिरतो.
भेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद । नाना विभूती छंदभेद । नाना खाणी ॥ १९ ॥ बहुरत्ना वसुंधरा । ऐसा पदार्थ कैंचा दुसरा । अफाट पडली सैरा- वैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥ अवघी पृथ्वि फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषयीं ॥ २१ ॥ नाना वल्ली नाना पिकें । देशोदेशीं अनेकें । पाहों जातां सारिख्यास सारिखें । एकहि नाहीं ॥ २२ ॥ स्वर्ग मृत्यु पाताळें । अपूर्व रचिलीं तिन्ही तोळें । पाताळ- लोकीं महान्योळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥ नाना वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाल धरणी । अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥ गड कोट नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें । सकळां ठायीं जगदीश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥ महा बळी होऊन गेले । पृथ्विवरी चौताळले । सामर्थ्यं राहिले । हें तो घडेना ॥ २६ ॥ असंभाव्य हे जगती । जीव किती येती जाती । नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥ सध्या रोकडें प्र- माण । कांहीं करावें नलगे अनुमान । नानाप्रकारें जीवन । पृथ्विचेनि आ- धारें ॥ २८ ॥ कित्येक भूमि माझी म्हणती । शेवटीं आपणचि मरोनि जाती । कित्येक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥ ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काय द्यावी उपमा । ब्रह्मादिकांपासोनी आम्हां । आश्रयचि ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके पृथ्वीस्तवननिरू- पणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. आपस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन । जयास आपोनारायण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥ पृथ्विस आधार आवरणो- दक । सप्तसिंधूंचें शुद्धोदक । नाना मेघांचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥ नाना नद्या नाना देशीं । वाहत मिळाल्या सागरासी । लहान थोर पुण्यराशी । अगाध महिमे ॥ ३ ॥ नद्या पर्वताहून कोसळल्या । नाना सांकडींमध्यें रिचवल्या । धबधबां खळखळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥ कूपें वाँपी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना १. स्थळें. २. महाभुजंगानें. ३. शिरल्या. ४. आड. ५. विहिरी.
३५४ श्रीदासबोध. [ दशक देशीं ॥ ५ ॥ गायमुखें पाट जाती । नाना कालवे वाहती । नाना झरे झि- रपती । झरती नीरें ॥ ६ ॥ ढुंइरे विहरे पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर । ऐसे उदकाचे प्रकार । भूमंडळीं ॥ ७ ॥ जितुके गिरी तितुक्या धारा । कोसळती भयंकरा । पाभळे वोहळ अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥ भूमंडळींचें जळ आघवें । किती म्हणोनि सांगावें । नाना कारंजी आणावें । बांधोनि पाणी ॥ ९ ॥ डोहो डबकें खबांडीं टाकीं । नाना गिरीकंदरीं अने- कीं । नाना जलें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥ तीर्थे एकाहून एक । म- हापवित्र पुण्यदायक । अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोन गेले ॥ ११ ॥ नाना तीर्थाचीं पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं शीतळोदकें । तैशींच नाना उष्णोदकें । ठायीं ठायीं ॥ १२ ॥ नाना वल्लीमध्ये जीवन । नाना फळीं फुलीं जीवन । नाना कंदीं जीवन । गुणकारक ॥ १३ ॥ क्षारोदकें शुद्धो- दकें । विषोदकें पीयूषोदकें । नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणांचीं ॥ १४ ॥ नाना इक्षुदंडांचे रस । नाना फळांचे नाना रस । नानाप्रकारींचे गोरस । मद पारा गूळ अन्न ॥ १५ ॥ नाना मुक्ताफळांचें पाणी । नाना रत्नीं तळपे पाणी । नाना शस्त्रांमध्यें पाणी । नाना गुणांचें ॥ १६ ॥ शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद । नाना उदकांचे नाना भेद । विवरोन पाहतां विशद । होत जातें ॥ १७ ॥ उदकाचे देह केवळ । उदकाचेंच भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥ क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्य- सिंधु । दधिसिंधु इक्षुरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचां ॥ १९॥ ऐसें उदक विस्ता- रलें । मुळापासूनी शेवटास आलें । मध्येंहि ठायीं ठायीं उमटलें । ठायीं ठायीं गुप्त ॥ २० ॥ जे जे बीजीं मिश्रित झालें । तो तो स्वाद घेउनि उठिलें । वंसामध्ये गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥ उदकाचा बांधा हें शरीर । उदकचि पाहिजे तदनंतर । उदकाचा उत्पत्ति विस्तार । किती म्हणोनि सां- गावा ॥ २२ ॥ उदक तारक उदक मारक । उदक नाना सुखदायक । उद- काचा विवेक । अलौकिक आहे ॥ २३ ॥ भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनि १. कुवँ. २. झरा. ३. लहान पाणटाकें. ४. अमृतोदकें. ५. उंसाचे. ६. दूध वगैरे. ७. रेत. ८. रक्त. ९. क्रमानें मिठाचा, दुधाचा, मद्याचा, तुपाचा, दह्याचा, उंसाच्या रसाचा व पाण्याचा असे हे सप्तसागर. १०. रुचि. ११. शरीर बनल्यावर.
१६ वा. ] अग्निस्तवन. ३५५ त्या सुंदर । धबावां धबावां थोर । रिचवती धारा ॥२४॥ ठायीं ठायीं डोह तुं- बती । विशाल तळीं डबाबिती । चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥२५॥ एकी पालथ्या गंगा वाहती । उदकें सन्निधाचि असती । खळाळां झरे वा- हती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥ भूमिगर्भी डोह भरले । कोणी देखिले ना ऐ- किले । ठायीं ठायीं झरे झाले । विद्युल्लतांचे ॥ २७ ॥ पृथ्वीतळीं पाणी भ- रलें । पृथ्वीमध्यें पाणी खेले । पृथ्वीवरी प्रगटलें । उदंड पाणी ॥२८॥ स्वर्ग मृत्यु पाताळीं । एक नदी तिन्हीं ताळीं । मेघोदक अंतराळीं । पृथ्वीवरी वृष्टि करी ॥ २९ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहनें । दहनाचें मूळ पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥ त्याहून थोर परमेश्वर । महद्भूतांचा विचार । त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशि- ष्यसंवादे षोडशदशके आपस्तवननिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. अग्निस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वैश्वानरँ । होय रघुनाथाचा श्वशुर । विश्वव्यापक विश्वंभर । पिता जानकीचा ॥ १ ॥ ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषींचा फलदाता । तमँ हिर्म रोगहर्ता । भर्ता विश्वजनांचा ॥ २ ॥ नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रांस अभेद । अभेद आणि परम शुद्ध । ब्रह्मादिकांसी ॥३॥ अग्नीकरितां सृष्टि चाले । अग्नीकरितां लोक धाले । अग्नीकरितां सकळ झाले । लहान थोर ॥ ४ ॥ अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहाया झालें स्थळ । दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥५॥ पोटामध्ये जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं । अग्नीकरितां भोजनीं । रुचि येते ॥ ६ ॥ अग्नि सर्वांगीं व्यापक । उष्में राहे कोणी एक । उष्ण नसतां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥ आधीं अग्नि मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो । ऐसा हा अनुभव येतो । प्राणिमात्रांसी ॥ ८ ॥ असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ । अग्नि आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥ नानारस निर्माण झाले । अग्नीकरितां निपजले । महारोगी आरोग्य झाले । निमिषमात्रें ॥ १० ॥ सूर्य सकळांहून विशेष । सूर्या उपरि अग्निप्रकाश । १. भूमीखालून. २. विजा पडून. ३. स्थळाँ. ४. भांग. ५. अंधकार. ६. थंडी.
३५६ श्रीदासबोध. [ दशक रात्रिभागीं लोक अभीस । साह्य करिती ॥ ११ ॥ अंत्यज-गृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला । सकळां गृहीं पवित्र झाला । वैश्वां- नरू ॥ १२ ॥ अग्निहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग । अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय ॥ १३ ॥ देव दानव मानव । अग्नीकरितां झाले सर्व । सकळ जनांस उपाव । अग्नि आहे ॥ १४ ॥ लग्नें करिती थोर थोर । नाना दारूंचा प्रकार । भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥ नाना लोक रोगी होती । उष्ण औषधें सेविती । तेणें लोक आरोग्य होती । व- न्हीकरितां ॥ १६ ॥ ब्राह्मणास तन मन । सूर्यदेव हुताशेन । एतद्विषयीं अनुमान । कांहींच नाहीं ॥ १७ ॥ लोकांमध्ये जठरानळ । सागरीं आहे व- डवानळ । भूगोलाबाहेर आवरणानळ । शिवनेत्रीं विद्युल्लता ॥ १८ ॥ कुपी- पासुनि अग्नि होतो । उंच दर्पणीं अग्नि निघतो । काष्ठमंथनीं