दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 378, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५ वा. ] सूक्ष्म जीव. ३४३ म्हणिजे दानव । स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥ म्हणोन दैवी आणि दानवी । संपत्ती द्विधा जाणावी । प्रचीत मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥ विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा ओळ- खावा । नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥ स्थूळें स्थूळ खाजवावें । सूक्ष्में सूक्ष्म समजावें । खुणेनें खुणेसि बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥ वि- चारें जाणावा विचार । अंतरें जाणावें अंतर । अंतरें जाणावें परांतर । होऊनियां ॥ ३९ ॥ स्मरणामाजी विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण । एक- देशी परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥ पुढें शिके मागें विसरे । पुढें उजेड मागें अंधारें । पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥ तुर्या जाणा- वी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण । उभयतां शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके अधोध्वं- निरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. सूक्ष्म जीव. श्रीगणेशाय नमः ॥ रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपट थोडें । युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयांमध्ये ॥ १ ॥ ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती । अंतःकरणपंचकाची स्थिती । तेथेंहि आहे ॥ २ ॥ त्या- पुरतें त्यांचें ज्ञान । विषय इंद्रियें समान । सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहतो कोण ॥ ३ ॥ त्यास मुंगी महाथोर । नेणों चालिला कुंजरें । मुंगीस सुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥ ते मुंगीसमान शरीरें । उदंड असती लहान थोरें । समस्तांमध्ये जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥ ऐशिया किडियांचा संभार । उदंड दाटला विस्तार । अत्यंत साक्षेपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥ नाना क्षेत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वताएवढे । आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥ पक्ष्यायेवढें लहान नाहीं । पक्ष्यायेवढें थोर नाहीं । सर्प आणि मत्स्य पाहीं । येणेंचि पाडें ॥ ८ ॥ मुंगीपासून थोर- थोरें । चढती वाढती शरीरें । त्यांचीं निर्धारीतां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥ १. आसुरी. २. सदगुणसंपत्ति. ३. समाधि. ४. झोंप. ५. हत्ती. ६. जीव तोच ईश्वर, त्यानें. ७. प्रयत्नशील. ८. प्रमाणानें.