भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 377, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 377

असंभाव्य ॥ १४ ॥ अवघा वेलचि करपतां । मुळापासोन पुनः होतो । ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥ मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययज्ञानें निर्मूळ केलें । तरी मग वाढणोंचि राहिलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥ मुळीं बीज शेवटीं बीज । मध्यें जळरूप बोज । ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ।: १७ ॥ मुळामधील ज्या गोष्टी । सांगतां हे बीजसृष्टी । जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥ जातो येतो पुनः जातो । ऐशा प्रत्यावृत्ति करितो । परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥ न घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहीं तरी लागे जाणावें । अंतरींच पडे ठावें । सकळांस कैंचें ॥ २० ॥ तेणेंसीच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती । दिसेना ते काय करिती । बापुडे लोक ॥ २१ विषयभोग तेणेंचि घडे । तेणें- विण कांहींच न घडे । स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥ जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदंतर । शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥ अंगुळीची अंगुळीस वेदना । एकीची एकीस कळेना । हात पाय अवयव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥ अवयवाचें अवयव नेणे । मग तो पराचें काय जाणे । परांतर या कारणें । जाणवेना ॥ २५ ॥ एकेंचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रें भेद दिसती । खुडिलीं तितुकींच सुकती । येर तीं टवटवीत ॥ २६ ॥ येणेंचि न्यायें भेद झाला । कळेना एकाचें एकाला । जाणपणें आत्म्याला । भेद नाहीं ॥ २७ ॥ आत्मत्वीं भेद न दिसे । हें प्रकृ- त्तिकारितां भासे । तरि जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥ देखोन ऐकोन जाणती । शहाणे अंतरीं परीक्षिती । धूर्त ते अवघेचि समजती । गुप्तरूपें ॥ २९ ॥ जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी । धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥ आधीं मनोगत पाहती । मग विश्वास धरिती । प्राणिमात्र येणेंचि रीती । वर्तताहे ॥ ३१ ॥ स्मरणामागें विस्मरण । रोकडी प्रचीत प्रमाण । आपलें ठेवणें आपण । चुकताहे ॥ ३२ ॥ आपलेंच आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना । उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥ ऐसें हें चंचल चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र । झाला राव अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥ स्मरण म्हणिजे देव । विस्मरण १. फेरे. २. दृश्य आकार. ३. ब्रम्हाकडे. ४. मग.