भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 381, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 381

३४६ श्रीदासबोध. [ दशक वाढे । मुळापासूनी अवघें घडें । अवघेंच वाढे आणि मोडे । देखतां देखतां मोड १ ॥ ७ ॥ पुढें अवघें शरीर । दिवसेंदिवस जाहलें थोर । सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥ फळामध्यें बीज आलें । तेणें न्यायें येथें जाहलें । ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥ बीजें उदकें अंकुरती । उदक नसतां उडोन जाती । एके ठायीं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥ दोहींमध्यें असतां बीज । भिजोन अंकुर सहज । वाढतां वाढतां पुढें रिझें । उदंड जाहे ॥ ११ ॥ जिकडे मुळ्या धांव घेती । तिकडे अग्रें हेलावती । मुळें अग्रें द्विधा होती । बीजापासुनी ॥ १२ ॥ मुळ्या चालिल्या पाताळीं । झाडें धांवती अंतराळीं । नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥ फळांवडील सुमनें २ । सुमनां वडील पानें । पानांवडील अनुसंधानें ३ । काष्ठें अवघीं ॥ १४ ॥ काष्ठांवडील मुळ्या बारीक । मुळ्यांवडील तें उदक । उदक आळोनि कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥ याची ऐशी आहे प्रचीती । तेव्हां सकळां वडील जगती । जगतीवरील मूर्ती । आपोनारा४यणाची ॥ १६ ॥ तया- वडील अग्निदेव । अग्निवडील वायुदेव । वायुदेवावडील स्वभाव । अंतरात्म्या- चा ॥ १७ ॥ सकळां वडील अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणिजे दूर आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥ जवळीं असोन चुकलें । प्रत्ययास नाहींसें केलें उगेंचि आलें आणि गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥ म्हणोन सकळां वडील देव । त्यासि होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥ करी आपुला ब्यासंग । कदापि नव्हे ध्यान- भंग । बोलणें चालणें व्यंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥ जें वडीलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें । काय काय वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥ तो वडील जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष झाला । अल्प चेतनेनें तयाला । अल्प भाग्य ॥ २३ ॥ तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं । मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोठें ॥ २४ ॥ नारायण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी । या कारणें तोषवावी । कोणी तरी काया ५ ॥ २५ ॥ उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपालिती झाली । न कळे लीला परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६