दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 380, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५ वा. ] पिंडोत्पत्ति. ३४५ प्राणी असती ॥ २९ ॥ आपुल्या देहांतील न कळे । मग तें अवघें कैंचें कळे । लोक होती उताविळे । अल्प ज्ञानें ॥ ३० ॥ अणुरेणुऐसे जिन्नस । त्यांचे आम्ही विराटपुरुष । आमुचें उदंडाच आयुष्य । त्यांच्या हिशोबें ॥ ३१ ॥ त्यांच्या रीती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक । जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥ धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अं- तःकर्णीं । उगीच अहंता पापिणी । वोढा लावी ॥ ३३ ॥ अहंता सांडून विवरणें । कित्येक देवाचें करणें । पाहतां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥ थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिताती रडाया । शरीर अवघें पडा- वया । वेळ नाहीं ॥ ३५ ॥ कुश्चिळ ठायीं जन्मलें । आणि कुश्चिळ रसांचि वाढलें । यास म्हणती थोरलें । कोणत्या हिशोबें ॥ ३६ ॥ कुश्चिळ आणि क्षणभंगुर । अखंड व्यथा चिंतांतुर । लोक उगेच म्हणती थोर । वेडेपणें ॥ ३७ ॥ काया माँया दो दिवसांची । आदिअंतीं अवघें ची ची । झांकातापा करून उगेची । थोरीव दाविती ॥ ३८ ॥ झांकिलें तरी उपंदरें पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे । जो कोणी विवेकीं पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥ उगेंच कासया तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें । विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमो- त्तम ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके सूक्ष्मजीवनिरू- पणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. पिंडोत्पत्ति. श्रीगणेशाय नमः ॥ चौखाणीचे प्राणी होती । अवघे उदकेंचि वाढती । ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥ तत्त्वाचें शरीर झालें । अंतरा- त्म्यासगट वळलें । त्याचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥ शरत्काळींचीं शरीरें । पिळपिळीं झिरपती नीरें । उभय रेत एकत्रें । मिस- ळती रक्तीं ॥ ३ ॥ अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस । रसद्रव्यें सावकाश । वाढों लागे ॥ ४ ॥ वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठिण झालें । पुढें उ- दक पैसावलें । नाना अवयवीं ॥ ५ ॥ संपूर्ण होतां बाहेर पडे । भूमीस पडतां मग तें रडे । अवघ्यांचें अवघें घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥ कुंडी वाढे कुबुद्धि १. मग. २. क्षणभंगुर ३. संपत्ति. ४. जन्ममरणकाळीं. ५. उघडें. ६. शरीर-