भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 382, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 382

पाहे कोण । पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥ उपासना सकळां ठायीं । अंतरात्मा कोठें नाहीं । या कारणें ठायीं ठायीं । रामें आटोपिलें ॥ २८॥ ऐशी माझी उपासना । आणितां न ये अनुमाना । नेऊनि घाली निरंजना- पैलीकडे ॥ २९ ॥ देवाकरितां कर्में चालतीं । देवाकरितां उपासक होती । देवाकरितां ज्ञानी असती । कितीएक ॥ ३० ॥ नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें । नेमकानेमक व्यस्ताव्यस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥ देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितकें घ्यावें । अधिकारासारखें बोलावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥ औवाहन विसर्जनें । ऐसेंचि बोलिलें वि- धानें । पूर्वपक्ष झाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥ वेदांत सिद्धांत घों- टांत । प्रचीत प्रमाण नेमस्त । पंचीकरण सोडून हित । वाक्यार्थ पाहावा ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके पिंडोत्पत्तिनिरूपणं नाम नवम समासः ॥ ९ ॥

१०. सिद्धांत. श्रीगणेशाय नमः ॥ गगनीं अवघेंच होत जातें । गगनाऐसें तगेना तें । निश्चळीं चंचल तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥ आंधार दाटला बळें । वाटे गगन झालें काळें । रविकिरणें तें पिवळें । सर्वैचि वाटे ॥ २ ॥ उदंड हिंव जेव्हां पडलें । गमे गगन थंड झालें । उष्णझळेनें वाळलें । ऐसें वाटे ॥ ३ ॥ ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें झालें आणि गेलें । आकाशासारखें तगलें । हें तों घ- डेना ॥ ४ ॥ उत्तम जाणिणेचा जिन्नस । समजोन पाहे सावकाश । निरा- भास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥ उदक पसरे वायु पसरे । अंतरात्मा अत्यंतचि पसरे । तत्त्वें तत्व अवघेंच पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥ चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें । विवरणेंचि निवडतें । प्राणि- मात्रांसी ॥ ७ ॥ विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी । झा- लियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन । तत्वनिरसन अनन्व । विवेकें होतें ॥ ९ ॥ वडिलास शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ झालें । देवभक्तपण गेलें । तये ठायीं,

१. मायेची उभारणी-संहारणी. २. रीत. ३. शंकावचन. ४. स्वानुभव.