भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 361, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 361

३२६ श्रीदासबोध. [ दशक ळखावयाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेच येतें । राजी राखावें समस्तांतें । देहासि बरें करावें तें । आत्मयासि पावे ॥ १५ ॥ दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव । तरी तंडों नये ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । वि- वेकें सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्त्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसंबंध । एका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥ गरल आणि अमृत झालें । परी आपण नाहीं गेलें । साक्षित्त्वें आत्मयासि पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥ अंतर्निष्ठ जो पुरुष । तो अंतर्निष्ठेनें विशेष । जगा- मध्यें जो जगदीश । तो तयास ओळखे ॥ २० ॥ नयनेंचि पाहावे नयन । मनें शोधावें मन । तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥ तेणेंविण कार्यभाग अडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे । प्राणी विवेकें पवाडे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥ जागृतीस व्यापार घडतो । संबंध तयासीच पडतो । स्वप्ना- मध्यें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥ अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण । याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥ सहज सां- डूनि सायास । हाचि कोणी एक दोष । आत्मा सांडून अनात्म्यांस । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥ परी तें धरितांहि धरवेना । ध्यानीं येती व्यक्ति नाना । उगेचि कष्टविती मना । कासावीस करूनि ॥ २६ ॥ मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें एकाचें एक दिसे । भासों नये तेंच भासे । विलक्षण ॥ २७ ॥ ध्यान देवाचें धरावें । किंवा देवालयाचें करावें । हेंचि बरवें विवरावें । आपुले ठायीं ॥ २८ ॥ देह देऊळ आत्मा देव । कोठें धरूं पाहतां भाव । देव ओळखून जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥ अंतर्निष्ठा ध्यान ऐसें । दंडेकध्यान अनारिसें । प्रयत्नेंविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥ अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां संवेंचि मोडे । उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥ देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती । भोगणें लागे विपत्ती । देहयोगें ॥ ३२ ॥ ऐसें मनीं आठवतें । विचारितां भलतेंच होतें । दिसों नये तेंच दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥ दिसतें तें सांगतां न ये । बळें भावार्थ धरितां न ये । साधक कासाविस होय । अंत- १. आत्मा नव्हे त्यास; अर्थात् स्वरूपाज्ञानावांचून. २. लोकरितीचें ध्यान.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 361, कुल 467 में से · BharatKosha