दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 362, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा.] शाश्वत ब्रह्म. ३२७ याँमीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्षी आपुलें मन । मना- मध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटकें मन एकवटिलें । तेणें तुटकें ध्यान केलें । तेथें कोण सार्थक झालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित्त । बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें कोण । ध्यानीं आठवितें तें कोण । दोनीमध्यें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजाच आहे । साधक शोधून पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥ ऐसीं हीं प्रत्ययाचीं कार्में । प्रत्ययेंविण बोलिजे भ्रमें । लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥ दंडकध्यानाचें लक्षण । धरूनि बैसले अवलक्षण । प्रमाण आणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥ मिथ्या समाचार उठाविती । वाडग्याच बोंबा घालिती । मनास आणितां अंतीं । अवघेंच मिथ्या ॥ ४२ ॥ कोणी एक ध्यानस्थ बैसला । कोणी एक शिकवी त्याला । मुकुट काढून माळा घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥ मनाच्या येथें काय दुष्काळ । जे आंखूड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जा- णावे ॥ ४४ ॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती । दोरें फुलें गुंफावीं न लागती । कल्पनेची माळ थिटी करिती । काय निमित्त ॥ ४५ ॥ बुद्धीवि- ण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासि खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥ जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडैक चालिला । सातां पांचांचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥ प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून । तेथें अवधेंच अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश- दशके अखंडध्याननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. शाश्वत ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ पिंडांचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्म- विवेक । पिंड अनात्मा आत्मा एक । सकळ कर्ता ॥ १॥ आत्म्यास अन- १. लोकरीतीच्या मार्गानें. २. लोकाचाराचें ध्यान. ३. परिपाठ.