दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 357, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२२ श्रीदासबोध. [ दशक
बहुतीं मान्य केलें । येर तें व्यर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोकीं आप- णास बोलावें । किंवा अवघेंचि कोसळावें । आपणासि समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५॥ समाधानें समाधान वाढे । मैत्रीनें मैत्री जडे । मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥ अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजे कीं रे । कळत असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥ चातुर्यें शृंगारे अंतर । वस्त्रें शृंगारे शरीर । दोहोंमध्यें कोण सार । बरें पाहा ॥ १८ ॥ बाह्यात्कारें शृंगा- रिलें । तेणें लोकांच्या हातास काय आलें । चातुर्यें बहुतां संरक्षिलें । नाना परी ॥ १९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । समस्तांस बरें म्हणावें । ऐसें वाटे ॥ २० ॥ तनें मनें झिजावें । तेणें भलें म्हणोन न्यावें । उगेंचि कल्पितां सिणावें । वाउगें जनीं ॥ २१ ॥ लौकिकीं कार्यभाग भावडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥२२॥ म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसऱ्यास कष्ट- वितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥ हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा न ये । समजणें हाचि उपाय । सर्वत्रांसी ॥ २४ ॥ समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष झाले । या वेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥ जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव । समजला तरि उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥ आळसें कार्यभाग नासतो । साक्षेपें होत होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो । शाहणा कैसा ॥२७॥ मैत्री करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु । बोलिलें हें सत्य कीं असत्य । ओळखावें ॥ २८ ॥ आपणास शाहणें करूं नेणे । आपलें हित आपण नेणे । जनीं मैत्रिकी राखो नेणे । वैर करी ॥ २९ ॥ ऐसे प्रकारिचें जन । त्यास म्हणावें अज्ञान । तयापाशीं समाधान । कोण पावे ॥३०॥ आपण एकाकी एकला । सृष्टींत मांडत चालिला । बहुतांमध्ये एकल्याला । यश कैचें ॥ ३१ ॥ बहु- तांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणी- मात्रांसी ॥ ३२ ॥ शहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्यें भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश- दशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥