दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 356, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१४ वा. ] चातुर्यलक्षणं. ३२१ तोचि एक संसारीं । धन्य जाणावा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी । उठे नित्य नवी आवडी । तयास झाली जोडी । सर्वोत्तमाची ॥३८॥ हरि- कथा मांडली जेथें । सर्व सांडून धांवे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थे । हरिभक्तीसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी । साह्यभूत सर्वांपरी । साक्षेपें होय ॥ ४० ॥ तया नांव हरिदास । जयास नामीं विश्वास । येथूनि हा समास । संपूर्ण झाला ॥ ४१ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके हरिकथानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. चातुर्यलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाय । कांहीं तरी धरावी सोय । आगंतुक गुणाची ॥ १ ॥ काळें माणूस गोरें होयना । वोढाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहज गुण ॥२॥ आंधळें डोळस होईना । बधिर तें ऐकेना । पांगुळ पाय घेईना । कांहीं केल्या ॥३॥ कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोन सांगणें । रूप लावण्य या कारणें । पालटेना ॥ ४ ॥ अवगुण सोडिलीं जाती । उत्तम गुण अभ्यासि- तां येती । कुविद्या सांडूनि अभ्यासिती । शाहणे विद्या ॥ ५ ॥ मूर्खपण सांडितां जातें । शाहणपण शिकतां येतें । कारभार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥ ऐसी प्रचीति येते मना । तरी स्वहित कां कराना । सन्मागें चालतां जाणा । सज्जना माने ॥ ७ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी उपेक्षा कां करावी । चातुर्यैविण उंच पदवी । कदापि नाहीं ॥ ८ ॥ अंतर्कळा शृंगारावी । नाना परी उमजवावी । संपदा मेळवून भोगावी । साव- काश ॥ ९ ॥ देह नेटकें शृंगारिलें । परी तें चातुर्यैविण नासलें । गुणें- विण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ १० ॥ यत्न करीना ना शिकेना । शरीर तेंहि कष्टवीना । उत्तम गुण घेईना । सदा कोपी ॥ ११ ॥ आपण दुसऱ्यास करावें । तेणें सर्वैचि उसणें घ्यावें । जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहू ॥ १२ ॥ न्यायें वर्तेल तो शाहणा । अन्यायी तो दैन्यवाणा । नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुतांस मानलें । तें १. श्रम करून. २. अंतःकरण.