दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 4, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंउपोद्घात.
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र.
“ श्रीसमर्थांचें सारें चरित्र कोणासच ठाऊक नाहीं. अशा स्थितींत ज्याला जितकी माहिती आहे तितकीच त्याजपासून घेऊन श्रीसमर्थांचे स्वरूप ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ” —श्रीसमर्थप्रताप, प्रस्तावना (रा. देव). महाराष्ट्रांत, महाराष्ट्रधर्माचा उदय होऊन मोंगलांच्या जाचांतून त्याची सुटका होण्यापूर्वी जें संतमंडळ उद्भूत झालें व कै. न्या. रानडे यांच्या मताप्रमाणें ज्या संतमंडळीनें राष्ट्रीय स्वातंत्र्याचें बीजारोपण करण्याकरितां जमीन तयार केली, त्यांत श्रीसमर्थ रामदास हे अग्रेसर होत. सदर न्याय- मूर्तीनीं आपल्या 'मराठ्यांच्या इतिहासां'त वर्णिलेल्या संतमालिकेंत श्रीसमर्थां- चा उल्लेख जरी प्रमुखत्वानें करण्यांत आलेला आहे, तरी त्या वेळीं त्यांच्यासंबंधानें सध्यां उपलब्ध असलेली माहिती अप्रसिद्ध असल्यामुळे न्यायमूर्तीना समर्थां- च्या कृतींचें व योग्यतेचें यथास्थित शब्दचित्र रेखाटतां आलेलें नाहीं. तथापि महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून मराठ्यांना राष्ट्रीय वैभव प्राप्त करून देण्याचा उद्योग करणाऱ्यांत समर्थ रामदास हे प्रमुख होते, असें त्यांनीं नमूद करून ठेवलें आहे; मात्र त्यांनीं ह्या उद्योगाचें सर्वच श्रेय समर्थास न देतां त्याचा कांहीं वाटा इतर संतांच्या पदरींहि घातलेला आहे. न्यायमूर्तीचें हें मत प्रसिद्ध होऊन कांहीं काल लोटल्यानंतर महाराष्ट्र-इतिहासाचे संशोधक प्रख्यात रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनीं माजी 'ग्रंथमाला' मासिकांत रामदासांवर एक विस्तृत निबंध लिहिला व त्यांत त्यांनीं न्यायमूर्ति रानड्यांचें सदर मत खोडून काढून महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माची स्थापना करण्याचें सर्व श्रेय एकट्या रामदासांसच देणें योग्य आहे, असें प्रति- पादिलें. रा. राजवाडे यांचा हा गंभीर व विचारार्ह निबंध वाचून धुळ्याचे प्रसिद्ध वकील शंकरराव देव यांना रामदासांसंबंधीं खरी व विश्वसनीय माहिती