दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 5, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ उपोद्घात. शोधून काढण्याची स्फूर्ति झाली व त्यांनीं गेल्या ७।८ वर्षांत एतद्विषयक जे शोध केले, व तदनुसार जे ग्रंथ प्रसिद्ध केले, त्यावरून रा. राजवाडे यांचे वरील प्रतिपादनासच विशेष पुष्टि मिळालेली आहे. इतकेंच नव्हे तर त्या प्रतिपादना- संबंधीं प्रचलित विद्वान लोकांत खूप जोराची चर्चा होऊन अखेर बहुतेक सर्व विचारी लोकांचें मत रा. राजवाडे यांच्या मताप्रमाणेंच बनलेलें आहे. न्याय- मूर्ति रानडे जर आज हयात असते तर त्यांना देखील राजवाड्यांचें मत मान्य करावें लागलें असतें व तसें त्यांनीं मोठ्या संतोषानें केलेंहि असतें. कारण ते दुराग्रही नसल्यामुळे उपलब्ध झालेल्या माहितीचा व साधनांचा धिक्कार अथवा विपर्यास करण्याच्या भानगडींत बिलकुल पडले नसते, अशी आमची खात्री आहे. समर्थांचें खरें स्वरूप जाणण्याचे कामीं त्यांच्या हातून ज्या कांहीं चुका झाल्या त्या त्यांनीं जाणून बुजून केलेल्या नसून योग्य माहितीच्या अभावीं झालेल्या आहेत. समर्थांच्या चरित्राचे सर्व धागे सुव्यवस्थित रीतीनें उकलणें अद्यापहि शक्य नाहीं. न्या. रानड्यांचा ‘The Rise of the Maratha Power’ हा आदरणीय ग्रंथ प्रसिद्ध होऊन गेल्यानंतर व विशेषेंकरून अलीकडील ७।८ वर्षांत समर्थांच्या चारित्र्यावर प्रकाश पाडणारी पुष्कळ नवी माहिती उपलब्ध झालेली आहे; परंतु अद्यापहि समर्थांचें सर्वांगपरिपूर्ण असें चरित्र लिहितां येण्या- इतकीं साधनें मिळालेलीं नाहींत असें रामदासी वाङ्मयसमुद्रांत नित्य पोहणारे रा. देव यांचें मत आहे. आजपर्यंत झालेल्या शोधांचा विचार करितां समर्थां- च्या चरित्राचीं कांहीं अंगें केवळ गुप्त असल्यामुळे तीं कधीं काळीं उघडकीस येतील कीं नाहीं याबद्दल शंका वाटते. असें जरी आहे, तरी स्थूल मानानें सम- र्थांच्या चरित्राची स्पष्ट रूपरेखा रेखाटण्याइतकी सामुग्री रा. देव यांच्या प्रयत्ना- मुळें सध्यां प्रसिद्ध झालेली आहे. तिचा सामग्र्यानें विचार केल्यास समर्थांचें एक सुसंबद्ध व बरेंच मोठें चरित्र लिहितां येईल. अर्थात् प्रस्तुतसारख्या उपो- द्घातलेखांत अवश्य असणारें अल्पसें चरित्र तर त्यावरून निःसंशय लिहितां येईल असें वाटतें. देवांचे ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी समर्थांचीं बखरीवजा अशीं ४।५ चरित्रें प्रसिद्ध झालेलीं आहेत. त्यांत हनुमंतस्वामींनीं लिहिलेली बखर विशेष प्रसिद्ध आहे. परंतु हीं सर्व चरित्रें इतिहासप्रिय चिकित्सकाच्या कसोटी- पुढें नम्र होणारीं आहेत ! गबाळपणा, अतिशयोक्ति व भ्रामक विधानें यांनीं तीं