दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 400, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ वा. ] गुणभूत. ३६५ कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोनि गोठलें । तें रविकिरणें वाळोन गेलें । मग सहजचि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनि केला पर्जन्यकाळ । थंड झालें भूमंडळ । पुढें उष्णकाळीं शीतळ । शीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ शीत- काळें कष्टले लोक । कपोंनि गेले वृक्षादिक । म्हणोनि पुढें कौतुक । उष्ण- काळाचें ॥ १३ ॥ त्याहिमध्यें प्रातःकाळ । मध्यान्हकाळ सायंकाळ । शीत- काळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें एकामागें एक केलें । विल्हेनें¹ नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणिमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग कठिण । म्हणोनि औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टिरचनेचें विवरण । केलें पाहिजे ॥ १६ ॥ देहमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दांत । ऐशी भूमं- डळीं प्रचीत । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसि मूळ जीवन बांधों । जी- वनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरि गोविंदा । प्राणी कैंचे ॥ १८ ॥ जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिक इंद्रनीळ । तेजाळ झाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । तेजाळ कर्दै³मैचि आघवा । वे- गळा वेगळा निवडावा । कोणत्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहीं एक । मनास कळावया विवेक । जनामध्यें तार्किक लोक । समजती अवघें ॥ २१ ॥ अवघें समजलें हें घडेना । शाखाशाखांसि पडेना । अनुमानें निश्चय होईना । कांहीं एक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णू न शके वाचे । वेद विधि⁴ तेहि काँचे⁵ । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । अवघें त्रैलोक्य संभाळी । तया एकेंविण धुळी । होय सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आ- त्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रैलोक्यांचे प्राणी सर्वही । प्रेतरूपी ॥ २५ ॥ आत्मा नसतां येती मरणें । आत्म्याविण कैंचें जिणें । बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैंचें । कोणी एकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट झाली । तरी हे विचारणा कळली । या कारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥ उपासनेचा मोठा आश्रय । उपासनेविण निराश्रय । उदंड केलें तरी तो जय । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थांची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी । या कारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास । येणेंचि १. क्रमानें. २. कारण. ३. पंचभूतांचें मिश्रण. ४. ब्रह्मदेव. ५. अपुरे.