भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 411, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 411

३७६ श्रीदासबोध. [ दशक तें । आपद् आपदों¹ ॥ २९ ॥ अंतकाळीं दैन्य² दीन । सकळिकांस तत्समान । ऐसें चंचल अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥ भोगून अभोक्ता म्हणती । हें तों अवघीच फजिती । लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठिण । शरीर सोडीना प्राण । बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके देहा- त्मनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. जगज्जीवन. श्रीगणेशाय नमः ॥ मुळीं उदक निवळ असतें । नाना वल्लीमध्यें जातें । संगदोषें तैसें होतें । आम्लें³ तीक्ष्ण⁴ कडवट ॥ १ ॥ आत्मा आहमपणें असतो । देहासंगें विकारतो । साभिमानें भरीं भरतो । भलतीकडे ॥ २ ॥ बरी संगति सांपडली । जैसी उंसास गोडी आली । विषयवल्ली फोपावली । घातकी प्राणीं ॥ ३ ॥ अठरा भार वनस्पती । गुण सांगावे ते किती । नाना देहांचे संगती । आत्मयास होय ॥ ४ ॥ त्यामध्यें कोणी भले । ते संतसंगें निवाले । देहाभिमान सांडून गेले । विवेकबळें ॥ ५ ॥ उदकाचा नाशचि होतो । आत्मा विवेकें निघतो । ऐसा आहे प्रत्यय तो । विवेकें पाहावा ॥ ६ ॥ ज्यासी स्वहितचि करणें । त्यास किती म्हणोन सांगणें । हें ज्याचें त्याणें समजणें । सकळ कांहीं ॥ ७ ॥ आपला आपण करी कुडौवा⁵ । तो आपला मित्र जाणावा । आपला नाश करी तो समजावा । वैरी ऐसा ॥८॥ आपलें आपण अनहित करावें । त्यास आडवें कोणें रिघावें । एकांतीं जा- ऊन जीवें । मारी आपणासी ॥ ९ ॥ जो आपला आपण घातकी । तो आत्महत्यारा पातकी । या कारणें विवेकी । धन्य साधू ॥ १० ॥ पुण्यवंता सत्संगती । पापिष्ठास असत्सगंती । गति आणि अवगती । संगतियोंगें ॥ ११ ॥ उत्तम संगति धरावी । आपली आपण चिंता करावी । अंतरीं बरी विवरावी । बुद्धि जाणत्याची ॥ १२ ॥ इहलोक आणि परलोक । जाणता तो सुखदायक । नेणत्याकरितां अविवेक । प्राप्त होतो ॥ १३ ॥ जाणता देवाचा अंश । नेणता म्हणजे तो राक्षसांश । यामध्यें जें विशेषे । तें जाणो- १. डाळ होऊन. २. दीनवाणें. ३. आंबट. ४. तिखट. ५. रक्षण.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 411, कुल 467 में से · BharatKosha