दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 412, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा.] तत्त्वविवरण. ३७७ न घ्यावें ॥ १४ ॥ जाणता तो सकळां मान्य । नेणता होतो अमान्य । जेणें करितां होइजे धन्य । तेंचि घ्यावें ॥ १५ ॥ साक्षेपी शाहाण्याची संग- ती । तेणें साक्षेपी शाहाणे होती । आळसी मूर्खाची संगती । होती आळसी मूर्ख ॥ १६ ॥ उत्तमसंगतीचें फळ सुख । अधमसंगतीचें फळ दुःख । आंनंदू सांडूनियां शोक । कैसा घ्यावा ॥ १७ ॥ ऐसें हें प्रगट दिसे । जनामध्यें उदंड भासे । प्राणिमात्र वर्ततसे । उभययोगें ॥ १८ ॥ एका योगें सकळ योग । एका योगें सकळ वियोग । विवेकयोगें सकळ प्रयोग । करीत जावे ॥ १९ ॥ अवचितें सांकडींत पडिलें । तरी तेथून पाहिजे निघालें । निघोन जातां झालें । परम समाधान ॥ २० ॥ नाना दुर्जनांचा संग । क्षणक्षणा मनो- भंग । या कारणें कांहीं रंग । राखोन जावें ॥ २१ ॥ शाहाणा यत्नी त्याच्या गुणें । पाहों जातां काय उणें । सुख संतोष भोगणें । नाना श्लाघ्यता १ ॥ २२ ॥ आतां लोकीं ऐसें आहे । सृष्टीमध्यें वर्तताहे । जो कोणी समजोन पाहे । त्यास घडे ॥ २३ ॥ बहुरत्ना वसुंधरा । जाणजाणों विचार करा । सम- जतां प्रत्यय अंतरा-। माजी येतो ॥ २४ ॥ दुर्बळ आणि संपन्न । वेडें आणि व्युत्पन्न । हें अखंडदंडायमान । असतचि असे ॥ २५ ॥ एक भाग्यपुरुष मोडती । एक नवे भाग्यवंत होती । तैशीच विद्या व्युत्पत्ती । होत जाते ॥ २६ ॥ एक भरे एक रितें । रितें मागुतें भरतें । भरतें तेंहि रितें होतें । कालांतरीं ॥ २७ ॥ ऐशी हे सृष्टि चालिली । संपत्ति दुपारची साउली । वयसों तरी निघोन गेली । हळूहळू ॥ २८ ॥ बाळ तारुण्य आपलें । वृद्ध- पणीं प्रचीतीस आलें । ऐसें जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणीं ऐकें ॥ २९॥ देह जैसें केलें तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके जग- ज्जीवननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. तत्त्वविवरण. .श्रीगणेशाय नमः ॥ नाभीपासून उन्मेषवृत्ती ३ । तेचि परा जाणिजे श्रोतीं । ध्वनिरूप पश्यंती । हृदयीं वसे ॥ १ ॥ कंठापासून नाद झाला । १. कीर्ति. २. अखंड दंड (काठी) असावा तसें, अस्खलित. ३. अंतःस्फुरण.