दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 414, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा.] तनुचतुष्टय. ३७९ ऐसा हा सूक्ष्म देह । पाहतां होइजे निःसंदेह । येथें मन घालूनी पाहे । त्यासि हें उमजे ॥ २२ ॥ ऐसें सूक्ष्म देह बोलिलें । पुढें स्थूळ निरूपिलें । आकाश पंचगुणे वर्तलें । कैसें स्थूळीं ॥ २३ ॥ काम क्रोध शोक मोह भय । पंचविध आकाशाचा अन्वय १ । पुढें पंचविध वायु । निरूपिला ॥ २४ ॥ चळण वळण प्रसरण । निरोध आणि आकुंचन । हें पंचविध लक्षण । प्रभंज- नाचें २ ॥ २५ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण । आतां पुढें आपलक्षण । निरूपिलें पाहिजे ॥ २६ ॥ शुक्रं ३ शोणितं ४ लाळ मूत्र स्वेदें ५ । हा पंचविध आपाचा भेद । पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म । ऐसें स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । हे पाचांचे पंचवीस । ऐसे मिळोनि स्थूळदेहास । बोलिजेतें ॥ २९ ॥ ति- सरा देह कारण अज्ञान । चौथा देह महाकारण ज्ञान । हे चारी देह निर- सितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥ विचारें चौदेहां वेगळें केलें । मीपण तत्वासरीसें गेलें । अनन्य आत्मनिवेदन झालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥ विवेकें चुकला जन्ममृत्यु । नरदेहीं साधीलें महत्कृत्य । भक्तियोगें कृतकृत्य । सार्थक झालें ॥ ३२ ॥ इति श्रीपंचीकरणं ६ । केलेंचि करावें विवरण । लो- हाचें होतें सुवर्ण । परिसाचेनि योगें ॥ ३३ ॥ हा हि दृष्टांत घडेना । परिसा- चेनि परिस करवेना । शरण जातां साधुजना । साधुचि होइजे ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तत्त्वविवरणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ——— ९. तनुचतुष्टय. श्रीगणेशाय नमः ॥ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । ऐसे हे चार देह जाण । जागृति स्वप्न सुषुप्ति ७ पूर्ण । तुर्या ८ जाणावी ॥ १ ॥ विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान । नेत्रस्थान कंठस्थान । हृदयस्थान मूर्धा ९ तो ॥ २ ॥ स्थूळ भोग प्रविविक्तें १० भोग । आनंदभोग आनंदावभासें ११ भोग । ऐसे १. संबंध. २. वायूचें. ३. रेत. ४. रक्त. ५. घाम. ६. पंचभूतांचें मिश्रण. ७. झोंप. ८. समाधि. ९. मस्तक. १०. स्वप्नांतील भोग. ११. समाधींतील महानंद.