दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 415, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३८० श्रीदासबोध. [ दशक चारी भोग । चौदेहाचे ॥३॥ अकार उकार मकार । अर्ध मात्रा तो ईश्वर । ऐशा मात्रा चार । चौ देहांच्या ॥ ४ ॥ तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्ध सत्वगुण । ऐसे हे चार गुण । चौदेहांचे ॥ ५ ॥ क्रियाशक्ति द्रव्यशक्ति । इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । ऐशा ह्या चार शक्ती । चौदेहांच्या ॥ ६ ॥ ऐशीं हीं बत्तीस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें । अवघीं मिळोन ब्यायसीं तत्वें । अ- ज्ञान आणि ज्ञान ॥७॥ ऐशीं हीं तत्वें जाणावीं । जाणोन मायिक ओळखावीं । आपण साक्षी निरसावी । येणें रीतीं ॥ ८ ॥ साक्षी म्हणिजे तें ज्ञान । ज्ञानें ओळखावें अज्ञान । ज्ञानाज्ञानांचें निरसन । देहासरिसें ॥ ९ ॥ ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । ते हे विवेकें निरासिले । आत्म- ज्ञानें ॥ १० ॥ आत्मानात्मविवेक पाहतां । सारासारविचार करितां । पंच- भूतांची मायिक वार्ता । प्रतीत आली ॥ ११ ॥ अस्थि मांस त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म । प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥ शुक्र शोणित लाळ मूळ स्वेद । हे आपाचे पंच भेद । तत्वें सम- जोन विशद । करून घ्यावी ॥ १३ ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण । या तत्त्वांचें निरूपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥ चळण वळण प्रसरण । निरोधन आणि आकुंचन । हे पांचहि वायूचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥ काम क्रोध शोक मोह भय । हा आकाशांचा प- र्याय । हे विचारिल्याविणें काय । उमजों जाणे ॥ १६ ॥ असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचवीस तत्त्वांचा विस्तार । आतां सूक्ष्म देहाचा विचार । बोलि- जेल ॥ १७ ॥ अंतःकरण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाश पंचकाचा वि- चार । पुढें वायु निरुत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥ व्यान समान उदान । अपान आणि प्राण । ऐसे हे पांचहि गुण । वायुतत्त्वाचे ॥ १९ ॥ श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हे पांचहि तेजाचे गुण । आतां आप सावधान । होऊन ऐका ॥२०॥ वाचा पाणि पाद शिक्ष गुद । हे आपाचे गुण प्रसिद्ध । आतां पृथ्वी विशद । निरूपिली ॥ २१ ॥ शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद । ऐसे हे पंचवीस तत्त्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके तनुचतुष्टयनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥