दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 416, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१७ वा. ] सिद्ध. ३८१ १०. सिद्ध. श्रीगणेशाय नमः ॥ आवरणोदकीं हाटकेश्वर । त्यास न घडे नम- स्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेढे । उदंड भूमि पैलीकडे । शेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र बोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोनि विवेकीं असावें । साधुजनें ॥ ४ ॥ जें आपणास नव्हे ठावें । तें जाणत्यास पुसावें । मनोगतीनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥ जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥ मध्यें आहे भूमीचें पडळें । म्हणोन आकाश आणि पाताळ । तें पडळ न- सूतां अंतराळ । चहूंकडे ॥ ७ ॥ तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । शून्याकार ॥ ८ ॥ दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास । मनातीत निराभास । विवेकें जाणावा ॥ ९ ॥ दृश्य- भास अवघा बिघडे । विवेकी तेथें पहुंडे । भूमंडळीं ज्ञाते । थोडे सूक्ष्मदृष्टी- चे ॥ १० ॥ वाच्यांश वाचेनें बोलांवा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । नि- र्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनि योगें ॥ ११ ॥ नाना गुणांस आहे नाश । निर्गुण तें अविनाश । डोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥ जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥ अष्टधेचे जिन्नस नाना । उदंड पाहतां कळेना । अवघें सगत पिटावेना । कोणी एक ॥ १४ ॥ सगत सारिखी स्थिति झाली । तेथें परी- क्षाच बुडाली । चवी नेणतां कालविली । नाना अन्नें ॥ १५ ॥ टोणपा नव्हे गुणग्राहक । मूर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । एकचि म्हणती ॥ १६ ॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला । नाना अभ्यासेंविण प्राणियाला । सुटका कैची ॥ १७ ॥ वेड लागोन झाले ओं- गाळ । त्यांस सारिखेंच वाटे सकळ । ते जाणावे बाष्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥ ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहूर्च- १. पृथ्वीला उदकाचें जें आवरण आहे, त्यांत. २. पाताळांतील एक शिवाचें स्थान. ३. पडदा. ४. विसांवा घेतो. ५. अष्टधा प्रकृतीचे. ६. वाचाळ.