दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 417, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंकाँचया लोकांस । काय म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें स- कळ सृष्टि चाले । आंधळे परीक्षकवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥ जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाय । गुणचि नाहीं गौरवें¹ । येईल कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें एकचि झालें । तरी विवेकानें काय केलें । असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥ उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा² । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥ आपलेंन वोंग- ळपणें । दिशा³ करून शौच नेणे । वेदशास्त्रें पुराणें । त्यास काय करिती ॥ २४ ॥ आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार । आचार विचारें पैल- पार । पाविजेतो ॥ २५ ॥ जें नेमकास न कळे । तें बाष्कळास केव्हीं कळे । डोळस ठकती आंधळे । कोणत्या कामाचे ॥ २६ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक । अवघेंच मानिलें एक । विवेक आणि अविवेक । काय मानावे ॥ २७ ॥ अमृत विष एक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्मीं होते फ- जिती । सत्कर्मीं कीर्ति वाढे ॥ २८ ॥ इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्यविवेक । तेथें अवघें निरर्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥ म्हणोनि सत्संगति जावें । वेदशास्त्रांचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभ्यासावें । नाना प्रयत्नें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके सिद्ध- निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९७.
दशक अठरावा.
१. बहु देवस्थान⁴.
श्रीगणेशाय नमः ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमाहि कळेना । विद्या बुद्धि देसी जनां । लहान थोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती । चारी वाचा तुझेनि स्फूर्ती । तुझें निजस्वरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य धन्य चतुरानना⁵ । त्वां केली सृष्टिरचना । वेद शास्त्रं भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥ धन्य विष्णु पालन करिसी । एकांशें सकळ जीवांसी । वाढ- १. महत्त्व. २. भिकाऱ्यास. ३. शौचविधि. ४. पुष्कळ देवस्थानें. ५. ब्रह्मदेवा.