दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 421, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३८६ श्रीदासबोध. [ दशक विलें । देखत देखतां ॥ ३ ॥ मूर्खपणाचा अभ्यास केला । बाष्कळपणें घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥ मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषयीं दैन्यवाणा । कांहीं मिळेना कोणा । काय म्हणावें ॥ ५ ॥ जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्न वस्त्र तेंहि नाहीं । उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥ बोलतां येइना बैसतां येइना । प्रसंग कांहींच कळेना । शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥ लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं । नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥ आपणास कांहींच येईना । आणि शिकविलेंहि मानेना । आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥ अंतरीं एक बाहेरी एक । ऐसा जयाचा दंडक १ । परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥ आपला संसार नासला । मनामध्यें पस्तावला । तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवे- काचा ॥ ११ ॥ एकाग्र करूनियां मन । बळेंच धरावें साधन । यत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥ अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे । प्रबंध पाठ करीत जावे । जाड अर्थे ॥ १३ ॥ पदप्रबंध श्लोकप्रबंध । नाना घाटी मुद्रा छंद । प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥ कोणे प्रसंगीं काय म्हणावें । ऐसें समजोन जाणावें । उगेंच वाउगें शिणावें । कासयासी ॥ १५ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें । जें आठवेल तें गावें । तेंचि मूर्खपण ॥ १६ ॥ ज्याची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावें ना । रागज्ञान तालज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥ साहित्य संगीत प्रसंगमानें । करावी कथेचीं घमशानें २ । अर्थांतर श्रवण मननें । काढीत जावें ॥ १८ ॥ पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें । सांगीतले गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥ अखंड एकांत सेवावा । ग्रंथमात्र धांडो- ळावा । प्रतीत येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निस्पृहनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. देहदुर्लभता. श्रीगणेशाय नमः ॥ देहाकरितां ३ गणेशपूजन । देहाकरितां शारदा४-वंदन । १. वागणूक. २. लयलूट. ३. देहाच्या अस्तित्वावर. ४. सरस्वती.