दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 422, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८ वां. ] 'देहदुर्लभता. ३८७ देहाकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १/॥ देहाकरितां कवित्वें चालती । देहाकरितां अध्ययनें करिती । देहाकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥२॥ देहाकरितां ग्रंथलेखन । नाना लिपी वोळखण । नाना पदार्थ शोधन । देहाकरितां ॥ ३ ॥ देहाकरितां महाज्ञानी । सिद्ध साधु ऋषि मुनी । देहा- करितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥४॥ देहाकरितां श्रवण घडे । देहाकरितां मननीं पवाडे । देहाकरितां देहीं आतुडे । परमात्मा ॥५॥ देहाकरितां कर्ममार्ग । देहाकरितां उपासनामार्ग। देहाकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥६॥ योगी वीत- रागी तापसी । देहाकरितां नाना सायासी । देहाकरितां आत्मयासी । प्रग- टणें घडे ॥७॥ इह लोक आणि परलोक । देहाकरितां सकळ सार्थक । देहा- विण निरर्थक । सकळ कांहीं ॥८॥ पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें । शीतोष्ण पंचाग्निसाधनें । देहाकरितां ॥ ९ ॥ देहाकरितां पुण्यशीळ । देहा- करितां पापी केवळ । देहाकरितां अनर्गळ । ५शुचिष्मंत ॥ १०॥ देहाकरितां अवतारी । देहाकरितां वेषधारी । नाना बंडें पाषांडें करी । देहाकरितां ॥११॥ देहाकरितां विषयभोग । देहाकरितां सकळ त्याग । होती जाती नाना रोग । देहाकरितां ॥१२॥ देहाकरितां नवविधाभक्ती । देहाकरितां चतुर्विधामुक्ती । देहाकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥ देहाकरितां दान धर्म । देहाकरितां नाना वर्म । देहाकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥१४॥ देहा- करितां नाना स्वार्थे । देहाकरितां नाना अर्थ । देहाकरितां होइजे व्यर्थ । आणि धन्य ॥ १५ ॥ देहाकरितां नाना कळा । देहाकरितां उणा आगळा । देहाकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥ नाना सन्मार्ग साधनें । देहाकरितां तुटती बंधनें । देहाकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥ देह सकळांमध्यें उत्तम । देहीं राहिला आत्माराम । सकळां घटीं पुरुषोत्तम । विवेकी जाणती ॥१८॥ देहाकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती । देहाकरितां होती जाती । अवतारमालिका ॥ १९ ॥ देहाकरितां नाना श्रम । देहाकरितां नाना संभ्रम । देहाचेनि उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥२०॥ देहाकरितां सकळ कांहीं । देहाविण कांहीं नाहीं । आत्मा विरे ठायींचा १. प्राप्त होतो. २. वैराग्यशील. ३. भगवत्प्रीत्यर्थ आपणास जाळून घेणें. ४० आचारशून्य. ५. सदाचारी. ६. दशक ४ पहा. ७. समारंभ.