दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 431, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९६ श्रीदासबोध. [ दशक काळसाह्य तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी सुखी झाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥ कोणी एक प्राणी जन्मास येतो । कांहीं तरी काळ साह्य होतो । दुःखा- उपरी सुख देतो । देव कृपाळूपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी साजे । तरी अवघेच होती राजे । कांहीं साजे कांहीं न साजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ इह- लोक आणि परलोक । साधतां कोणी एक विवेक । अद्भुत होय स्वाभा- विक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकिल्याविण कळलें । शिकविल्याविण शाहाण- पण आलें । हें देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मध्यें आकळे । सारासार ॥ ७ ॥ श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें । त्रैलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नानाजिन्नस सांगों किती । सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां एकाग्र झाले । त्या उपरी जे नूतन आले । ते एकाग्र न होती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडून आलें । नाना प्रकारांचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागलीसे काया । येती कडकडा जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥ बैसले सुचित्त करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरून बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामध्यें आणिक विचार । कल्पना कहिपते विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १५ ॥ जें जें कांहीं श्रवणीं पडलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक झालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मा धरावें । ज्याचें त्याणें आव- रावँ । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बै- सला । परी तो उदंड जेवून आला । बैसतांचि कासावीस झाला । तृषा- क्रांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणिविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळ- मळों लागलें । उठोनि गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती । क्षणक्षणां उठोन जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दि- सेनें कासावीस केला । अवघें सांडून धांवला । निरूपणप्रसंग निघोन गेला ।