दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 434, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१९ वा.] लेखनक्रिया. ३९९ टांकाचें ठोंसरपण । तैसेंचि लवण वांकण । सारिखेंचि ॥ ५ ॥ ओळीस ओळी लागेना । अर्कुलीं मात्रा भेदीना । खालींचे ओळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥ ६ ॥ पान शिशानें रेखाटावें । त्यावरी नेमेंचि लिहावें । दूर जवळी न व्हावें । अंतर ओळींचें ॥ ७ ॥ कोठें शोधासि आठलेना । चुकी पाहतां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥ ८ ॥ ज्याचें वय आहे नूतन । त्यानें लिहावें जपून । जनासि पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥ बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातारपणीं । मध्यम लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥ भौवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंच चम- चमीत लिहावें । कागद झडतांहि झडावें । नलगोचि अक्षर ॥ ११ ॥ ऐसा ग्रंथ जपोन लिहावा । प्राणिमात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥ काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ १३ ॥ घट्ट कागद आणावे । जपोन नेमस्त खळौवे । लिहिण्याचे सांमे असावे । नानापरी ॥ १४ ॥ सुऱ्या १ कातऱ्या जागाईत । खळी घोटाळी तागाईत । नाना सुरंगमिश्रित । जाणोनि घ्यावे ॥ १५ ॥ नाना देशींचे बोरू आणावे । घट्ट बारीकसर घ्यावे । नाना रंगांचे आणावे । नानाजिनसी ॥ १६ ॥ नानाजिनसी टांक- तोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्र विचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥ हिंगूळ संग्रहीं असावे । वाळले आँलींतें पाहोनि घ्यावे । सोपे भिजवून वाळवावे । संग्रह मैषीचे ॥ १८ ॥ तगंटीं इतिश्रीयौ कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रे ॥१९॥ नानार गोफ नाना वासैनें । मेणकापडें सिंदूरवर्णं । पेट्या कुलपें जपणें । पुस्तका- कारणें ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके लेखन- क्रियानिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ १. तुरटीचे पाण्यांत भिजवून वाळवावे. २. सामान. ३. समास-फळी. ४. तुरटी. ५. घोटकवडा. ६. कागद चिकट करण्याचें सामान. ७. अलिता. ८. शाईचें. ९. शेवटीं. १०. 'इति श्री...' इत्यादि ग्रंथसमाप्तिसूचक शब्द. ११. वेष्टनें.