दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 433, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९८ श्रीदासबोध. [ दशक ला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याय पर्याय उपाय । मूर्खास हें कळे काय । मूर्खाकरितां चिवडा होय । मजालसींचा ॥ ४१ ॥ मग ते शाहणे नीट करिती । स्वयें साहोनि साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥ पृथ्वीमध्यें उदंड जन । जनांमध्येंचि असती सज्जन । जयांकरितां समाधान । प्राणिमात्रांसी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं अंगें जाणे । नाना प्रसंग समय जाणे । संतसालागीं निववूं जाणे । नानाप्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्याचें करणें कांहींएक । जनास कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनांस चाळवी । नाना मंडळी हालवी । ऐसी हे समर्थ पदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांतीं करावा । जगदीश- धारणेनें करावा । लोक आपला आणि परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥ एकांतीं विवेक ठायीं पडे । एकांतीं यत्न सांपडे । एकांतीं तर्क वावंडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ एकांतीं स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें । अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास एकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला । त्या वेगळा वडीलपणाला । ठावाचि नाहीं ॥५०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके श्रोता-अवलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २८८. दशक एकोणिसावा. १. लेखनक्रिया. श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसूनै करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळ मोकळें । वोतलें मषीचें काळें । कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें । मुक्तामाळा जैशा ॥२॥ अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याहि बीट । अर्कुलीं वेलांव्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपे तों पाहात गेलें । एक टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षरांचें काळेपण । १. समुदायाचा. २. चालतो. ३. वळवून. ४. शाईचें. ५. सहज. ६. रेफ.