दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 436, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१९ वा.] करंटलक्षण. ४०१ स्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥ कथा होती तेथें जावें । दूर दीनासारिखें बैसावें । तेथील सकळ होंदं घ्यावें । अंतर्यामीं ॥२०॥ तेथें भले आढळती । व्यापके तेहि कळों येती । हळू हळू मंदगती । रीघ करावी ॥ २१ ॥ सक- ळांमध्यें विशेष श्रवण । श्रवणाहून थोर मनन । मननें होय समाधान । बहुत जनांचें ॥ २२॥ धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें । समज- ल्याविण शिणावें । कासयासी ॥ २३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके विवरणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. करंटलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ सुचित्त करुनि अंतःकरण । ऐका करंटलक्षण । हें त्यागितां सदैव-लक्षण । अंगीं बाणे ॥ १ ॥ पापाकरितां दारिद्र प्राप्त । दरिद्रें होय पाप संचित । ऐसेंचि होत जात । क्षणक्षणां ॥२॥ या कारणें करंट- लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें । म्हणजे कांहींएक बाणे । सदैव लक्षण ॥३॥ क- रंटास आळस आवडे । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अ- धर्मी सदा ॥४॥ सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगौंचि बोले सैरावेरा । कोणी एका- च्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥ लिहों नेणे वाचूं नेणे । सवदासूत घेऊं नेणे । हिशेब कित्येक राखौं नेणे । धौरणा नाहीं ॥ ६ ॥ हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी । भल्याचे संगतीची आवडी । कदापि नाहीं ॥ ७ ॥ चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले । खटनट एकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥ ज्यासि त्यासि कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । पर- घातकी धीट मोठा । वाटा पाडी ॥ ९ ॥ दीर्घसूचना सुचेचि ना । न्याय नीति हे रुचेचि ना । पराभिलाषवासना । निरंतर ॥ १० ॥ आळसें शरीर पाळिल । परंतु पोटाविण गेलें । सुडकें मिलेनालें झालें । पांघरायासि ॥ ११॥ आळसें शरीर पिळी । अखंड कुशी कोंडोळी । निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥ जनासि मैत्री करीना । कठिण शब्द बोले नाना । मूर्ख- पणें आवरेना । कोणी एकासी ॥ १३ ॥ पवित्र लोकांमध्ये भिडावे । वोंग- ळांमध्यें निःशंक धावे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥
१. अभिप्राय. २. उद्योगी. ३. दैववान. ४. बुद्धि. ५. खाजवी. ६. आवडते.