भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१९ वा.] करंटलक्षण. ४०१ स्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥ कथा होती तेथें जावें । दूर दीनासारिखें बैसावें । तेथील सकळ होंदं घ्यावें । अंतर्यामीं ॥२०॥ तेथें भले आढळती । व्यापके तेहि कळों येती । हळू हळू मंदगती । रीघ करावी ॥ २१ ॥ सक- ळांमध्यें विशेष श्रवण । श्रवणाहून थोर मनन । मननें होय समाधान । बहुत जनांचें ॥ २२॥ धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें । समज- ल्याविण शिणावें । कासयासी ॥ २३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके विवरणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥

३. करंटलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ सुचित्त करुनि अंतःकरण । ऐका करंटलक्षण । हें त्यागितां सदैव-लक्षण । अंगीं बाणे ॥ १ ॥ पापाकरितां दारिद्र प्राप्त । दरिद्रें होय पाप संचित । ऐसेंचि होत जात । क्षणक्षणां ॥२॥ या कारणें करंट- लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें । म्हणजे कांहींएक बाणे । सदैव लक्षण ॥३॥ क- रंटास आळस आवडे । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अ- धर्मी सदा ॥४॥ सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगौंचि बोले सैरावेरा । कोणी एका- च्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥ लिहों नेणे वाचूं नेणे । सवदासूत घेऊं नेणे । हिशेब कित्येक राखौं नेणे । धौरणा नाहीं ॥ ६ ॥ हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी । भल्याचे संगतीची आवडी । कदापि नाहीं ॥ ७ ॥ चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले । खटनट एकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥ ज्यासि त्यासि कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । पर- घातकी धीट मोठा । वाटा पाडी ॥ ९ ॥ दीर्घसूचना सुचेचि ना । न्याय नीति हे रुचेचि ना । पराभिलाषवासना । निरंतर ॥ १० ॥ आळसें शरीर पाळिल । परंतु पोटाविण गेलें । सुडकें मिलेनालें झालें । पांघरायासि ॥ ११॥ आळसें शरीर पिळी । अखंड कुशी कोंडोळी । निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥ जनासि मैत्री करीना । कठिण शब्द बोले नाना । मूर्ख- पणें आवरेना । कोणी एकासी ॥ १३ ॥ पवित्र लोकांमध्ये भिडावे । वोंग- ळांमध्यें निःशंक धावे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥

१. अभिप्राय. २. उद्योगी. ३. दैववान. ४. बुद्धि. ५. खाजवी. ६. आवडते.

४०२ श्रीदासबोध. [ दशक तेथें कैंचा परोपकार । केला बहुतांचा संहार । पापी अनर्थी अपस्मार । सर्व अबुंद्धी ॥ १५ ॥ शब्द सांभाळून बोलेना । आवरितां आवरेना । कोणी एकासीं मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणी एकासी विश्वास नाहीं । कोणी एकासी सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥ राखावी बहुतांचीं अंतरें । भाग्य येतें तदनंतरें । ऐशीं विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना । तयास उपाय नाना । काय करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तें कांहींच नाहीं । अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥ पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें कशानें । निश्चय नाहीं अनुमानें । नाश केला ॥ २१ ॥ कांहीं एक पुरतें कळेना । सभेमध्यें बोलों राहेना । वा- ष्कळ लबाड ऐसें जनां । कळों आलें ॥ २२ ॥ कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनांसि कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य झालें । भूमंडळीं ॥ २३ ॥ झिजल्यावांचूनि कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे होते छी छी । अवलक्षणें ॥ २४ ॥ भल्यांची संगती धरीना । आपणास शा- हाणें करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥ लो- कांसि बरें करावें । तें उसणें सर्वैचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥ जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण । बहुतांसि न माने तें अवलक्षण । सहजाचि झालें ॥ २७ ॥ कार्याकारण सकळ कांहीं । कार्याविण तों कांहींच नाहीं । निकामीं तो दुःखप्रवाही । वाहतचि गेला ॥ २८ ॥ बहुतांसि मान्य थोडा । त्याच्या पापास नाहीं जोडा । निराश्रयीं पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥ या कारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावे । तेणें मनासारखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके करंटलक्षणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ———— ४. सदैवलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें सं- पूर्ण । आतां ऐका सदैवलक्षण । सौख्यदायक ॥ १ ॥ उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥ सुंदर

१९ वा.] सदैवलक्षण. ४०३ अक्षर लिहों जाणे । चपळ शुद्ध वाचों जाणे । अर्थांतर सांगों जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडीना । भल्याची संगति सोडीना । सदैवलक्षणें अनुमाना । आणूनि ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनांसि व्हावा । जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ नाना उत्तमगुण सत्पात्र । तोचि मनुष्य जगमित्र । प्रगटकीर्ति स्वतंत्र । पराधीन नाहीं ॥ ६ ॥ राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥ नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे । बोला ऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥ जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यराशी । महापुरुष ॥ ९ ॥ तो परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें त्याला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुत जन वासे पाहे । वेळेसि तात्काळ उभा राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्ट कळा । जाणे संगीत गायनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥ सकळांसि नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणी एकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ- सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणें शृंगारिला । तो बहुतांमध्ये शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥ जाणता पुरुष असेल जेथें । कलह कैंचा उठेल तेथें । उत्तम गुणा- विषयीं रिते । ते प्राणी करंटे ॥ १६ ॥ प्रपंचीं जाणे राजकारण । परमार्थीं साकल्यविवरण । सर्वांमध्ये उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें एक पुढें एक । ऐसा कदापि नाहीं दंफेक । सर्वत्रांसि अलोकिक । तया पुरु- षाची ॥ १८ ॥ अंतरासि लागेल ढका । ऐशी वर्तणुक करूं नका । जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥ कर्मविधि उपासनाविधी । ज्ञानविधि वै- राग्यविधी । विशालशवक्तृत्वाची बुद्धी । चलेल कैसी ॥ २० ॥ पाहतां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥ आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लहान थोर । तैसाचि करी परोपकार । मनापासूनी ॥ २२ ॥ दुसऱ्याच्या दुःखें दुखावे । दुस- १. वाट पाहे. २. सूर्य. ३. परब्रम्हाचा विचार ४. वागणूक.

४०४ श्रीदासबोध. [ दशक प्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उ- दंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैशी अवघ्यांची चिंता करी । महापुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निष्किंचन वासना । धिक्कारितां धिकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या श- रीर निंदिलें । तरी याचें काय गेलें । झाल्यास आणि जिंकिलेँ । देहबुद्धीनें ॥ २६ ॥ हैं तों अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तरी उ- त्तमगुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गु- णास प्राणी खेदे । तीक्ष्णबुद्धि लोक साधे । काय जाणती ॥ २८ ॥ लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलिया लोकांचे प्रचीती । मग ते लोक पाठी रा- खिती । नाना प्रकार्री ॥ २९॥ बहुतांसि वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । धीर उदार गंभीर । महापुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तैं समर्थांचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि झालें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके सदैवलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. देहमान्य. श्रीगणेशाय नमः ॥ मातीचा देव धोंड्याचा देव । सोन्याचा देव रु- प्याचा देव । कांस्याचा देव पितळेचा देव । तांब्याचा देव चित्रलेप ॥ १ ॥ रुईच्या लांकडाचे पाँवळाचे देव । बाण तांदळे नर्मदेचे देव । शालग्राम काश्मीरदेव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ ताम्रनाणीं हेमेंनाणीं । कोणी पू- जिती देवतार्चनीं । चक्रांकित चक्रतीर्थांहूनी । घेऊनि येती ॥ ३ ॥ उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचेंहि कारण । मुळीं पाहावें स्मरणं । तया स्मरणाचे अंश जाण । नाना दैवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो एक । त्याचे झाले अनेक । समजोन पाहतां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देहावेगळी भक्ति फावेना । देहावेगळा देव पावेना । या कारणें मूळ भजना । देहचि आहे ॥ ७ ॥ देह मुळींच केला वाव । तरी भजनास कैचा ठाव । म्हणोनि भजनाचा उपाव । देहात्मयोगें ॥ ८ ॥ देहाविण देव कैसा भजावा । देहा- १. दरिद्री. २. निराळा. ३. सोन्याचीं नाणीं. ४. स्फूर्ति.

१९ वा.] देहमान्य. ४०५ विण देव कैसा पूजावा । देहाविण महोत्सव कैसा करावा । कोणत्या प्रकारें ॥ ९ ॥ अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबूल धूप दीप । नाना भजनाचा सा- क्षेप । कोठें करावा ॥ १० ॥ देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासि गंध कोठें लावावें । मंत्रपुष्प तरी वाहावें । कोणे ठायीं ॥ ११ ॥ म्हणोनि देहाविण अडतें । अवघें सांकडेंचि पडतें । देहाकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥ देव देवता भूतें दैवतें । मुळींचें सामर्थ्य आहे तेथें । अधिकारें नाना दैवतें । भजत जावीं ॥ १३ ॥ नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषास पावलें । या कारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥ मायावल्ली फांपा- वली । नाना देहफळीं लगडली । मुळींची जाणीव कलों आली । फळामध्यें ॥ १५ ॥ म्हणोनि येकील न करावें । पाहावें तें येथेंचि पाहावें । ताळा प- डतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥ प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती । नाना अनुमानीं पडती । जेथें तेथें ॥ १७ ॥ लोकांची पाहतां रीती । लोक देवतार्चनें करिती । अथवा क्षेत्रदेव पाहती । ठायीं ठायीं ॥ १८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोनि धरिती निर्धार । परी तें अवघें स- विस्तर । होऊनि गेलें ॥ १९ ॥ एक ब्रह्मा विष्णु महेश । ऐकोनि म्हणती हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥ देवास नाहीं स्थान मान । कोठें करावें भजन । हा विचार पाहतां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥ नसतां देवाचें दर्शन । कैसेनि होइजे पावन । धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥ भूमंडळीं देव नाना । त्यांची भीड उल्लंघेना । मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्या ॥ २३ ॥ कर्तृत्व वेगळें करावें । मग त्या देवासि पाहावें । तरी कांहींएक पडे ठावें । गौप्य गुह्य ॥ २४ ॥ तें दिसेना ना भासेना । कल्पांतींहि नासेना । सुकृतावेगळें विश्वा- सेना । तेथें मन ॥ २५ ॥ उदंड कल्पिती कल्पना । उदंड इच्छिते वासना । अभ्यंतरींचे तरंग नाना । उदयार्ते पावती ॥ २६ ॥ म्हणोनि कल्पनार- हित । तेंचि वस्तु शाश्वत । अंत नाहीं म्हणोनि अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥ हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनि तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥ नाना लीला नाना लाघवें । तें काय जाणिजे बापुड्या जीवें । संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥ ऐसी सूक्ष्म

४०६ श्रीदासबोध. [ दशक स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुवचनें सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके देहमान्य- निरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥

६. बुद्धिवाद. श्रीगणेशाय नमः ॥ परमार्था आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं । कां जे विवराविवरों चुकी । पडोंच नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे मना । तो तो कदापि करीना । आदि अंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दनां १ । राजी राखणें ॥ ३ ॥ कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती । ते सहजचि हळु पडती । लालुचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तो जा- णावा प्रतिकुंचकें २ । पुढें पुढें नाशक । कारभार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळखीच्या लोकांत महंती । मां- डूंचि नये ॥ ६ ॥ पहिले दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे । अविवेकी ते जैसे तैसे । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हा हि फटकळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट विवेक बोलेना । झांका तापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आ- णूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसारिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दूर दृष्टीनें पुरे । साधु नव्हती ॥ १० ॥ कोणास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठिण विवेकवर्मे । स्वइच्छेनें स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥ आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला । नीच यातीनें नासला । समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । म- ळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥ अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।


१. सर्व जनांच्या अंतरात्म्यास. २. प्रतिकूळ,

१९ वा. ] यत्न. ४०७ आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ १७ ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध । सूर्य जैसा ॥ १८ ॥ दु- र्जनासि राखो जाणे । सज्जनासि निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ १९ ॥ संगतींचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तात्काळ उठे । अखंड अभ्यासीं लगते । समुदाय ॥ २० ॥ जेथें तेथें नित्य नवा । जनासि वाटे हा असावा । परंतु लालुचेचा गोवा । पडोंच नेदी ॥ २१ ॥ उत्कृष्ट भक्ति उत्कृष्ट ज्ञान । उत्कृष्ट चातुर्य उत्कृष्ट भजन । उत्कृष्ट योग अ- नुष्ठान । ठायीं ठायीं ॥ २२ ॥ उत्कृष्ट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगंतीं फांकली । उत्कृष्ट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥ कांहीं- एक उत्कृष्टेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काय होतें ॥ २४ ॥ नाहीं देहाचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा । प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ या कारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें । भगवत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आप- णास जें जें अनुकूल । तें तें करावें तात्काळ । होइना त्यांस निवळ । वि- वेक उमजवावा ॥ २७ ॥ विवेकामध्यें सांपडेना । ऐसें तों कांहींच असे- ना । एकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजविजा चाळणा जेथें । पाहतां काय उणें तेथें । एकांताविणें प्राणियांतें । बुद्धि कैंची ॥ २९ ॥ एकांतीं विवेक करावा । आत्माराम ओळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके बुद्धिवादनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. यत्न. श्रीगणेशाय नमः ॥ कथेंचें घमंडे भरून द्यावें । आपण निरूपणीं विव- रावें । उणें पडोंच न द्यावें । कोणीएक विषयीं ॥ १ ॥ भैंजणार खालीं प- डला । तो भजनारीं जाणिला । नेणतां लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥ उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे महत्व उडालें । वक्त्याचें ॥ ३ ॥ थोडें बोलोन समाधान करणें । रागेजोन १. गर्दी उसळून द्यावी. २. उपदेश करणारा.

४०८ श्रीदासबोध. [ दशक

तरी मन धरणें । मनुष्य वेधों लावणें । कोणी एक ॥ ४ ॥ सोसवेना चिण- चिण केली । तेथें तामस वृत्ति दिसोन आली । अवघी आवडीच उडाली । श्रोत्यांची ॥ ५ ॥ कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनीं भंगले । क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजेत लोक ॥ ६ ॥ शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु मागें मागें धांवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥ आशाबद्ध क्रियाहीन । नाहीं चातुर्यांचे लक्षण । ते महंतीची भणभण । बंदे नाहीं ॥ ८ ॥ ऐसे गोसांवी हळु पडती । ठायीं ठायीं कष्टी होती । तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैंचें ॥ ९ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे । सकळ लोकांस हव्यास उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥ परलोकीं वास करावा । समुदाय उगाच पहावा । मागण्याचा तगादा न लावावा । कांहींएक ॥ ११ ॥ जिकडे जग तिकडे जगन्नायक । कळला पाहिजे विवेक । रात्रंदिवस विवेकी लोक । संभाळीत जाती ॥ १२ ॥ जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघे नष्ट एकला भला । कशावरूनी ॥ १३ ॥ वोस मुलखीं काय पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें । तैंन्हे खोटी सोंडतें घ्यावें । कांहींएक ॥ १४ ॥ तस्मात लोकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्रसाधनाचा उ- पाय । श्रवण करून असावें ॥ १५ ॥ आपणांस बरें पाहतां न ये । लोक बुडवायाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाय । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥ अभ्यासेँ प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकौन असावें । प्रगट होऊन नासावें । हैं बरें नव्हे ॥ १७ ॥ मंद हळूहळु चालतो । चपळ कैसा आटो- पतो । आरबी फिरवणारे तो । कैसा असावा ॥ १८ ॥ हीं धकाधकीचीं कामें । तीक्ष्णबुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थे संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ शेत केलें परी वाहेनाँ । जवारें केलें परी फिरेना । जन मेळविले परी धरीना । अंतर्यामीं । २० ॥ जरी चढती वाढती आवडी उठे । तरीच परमार्थ प्र- गटे । घसवस करितां विटे । सगट लोक ॥ २१ ॥ आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणास मानेना । अवघा विकल्पचि मना । समाधान कैंचें


१. शिस्त. २. वरच्या स्थानी, एकांतीं. ३. दृष्टीषणा. ४. पड. ५. आरबी घोडा. ६. घोटाळ्यानें. ७. निगा करीना. ८. व्यापार.

॥ २२ ॥ नाशक दीक्षा सिंतेरू लोक । तेथें कैंचा असेल विवेक । जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला । शेवटीं अवघाचि वायां गेला । आपणास ठाकेना<sup></sup> गलवला । कोणें करावा ॥ २४ ॥ संगीते चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप । क्षणक्षणां विक्षेप कोप । किती म्हणोन सांगावा ॥ २५ ॥ मूर्खपणें भरंग- ळती । ज्ञातेपणें कलह करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमध्ये ॥ २६ ॥ कारभार आटोपेना करवेना । आणि उगेंहि रहेना<sup></sup> । या कारणें सकळ जनां । काय म्हणावें ॥ २७ ॥ नाशक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें । परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करवेना । दुसऱ्याचें कांहींच सोसेना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां हें आपणाचपाशीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैशी । वर्त- णूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशति- दशके यत्ननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. उपाधिलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टीमध्यें बहुत लोक । परिभ्रमणें कळे कौतुक । नाना प्रकारांचे विवेक । आढळों लागती ॥ १ ॥ किती प्रापंचिक जन । अखंड वृत्ती उदासीन । सुखदुःखें समाधान । डंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सक- ळांसि माने ॥ ३ ॥ सहजचि तालज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उम- टतें । सहजचि कळत जातें । न्यायनीतिलक्षण ॥ ४ ॥ एखादा आढळे गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणि- मात्रांची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महं- ताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसे आढळतां लोक । चमत्कारें गुणग्राहक । क्रिया बोलणें नेमक<sup></sup> । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणा- मध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुके- ना कीं ॥ ८ ॥ डौलेंचि<sup></sup> काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्व-


१. ठक. २. होईना. ३. सुरळीत. ४. सहजासहजीं.

४१० श्रीदासबोध. [ दशक दा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेलिचिला ॥ ९ ॥ एकासि अभ्या- सितां न ये । एकासि स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काय । कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणीं वेढों¹ लागती । नाना चुकीची फजीती । चहूंकडे ॥ ११ ॥ या कारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाय । उपायांचा अपाय । चुकतां होय ॥ १२ ॥ काय चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहींकडे ॥ १३ ॥ अवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगिती । कोठें चुके ते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ ह्यापोविण² आटोप केला । तो अवघा सर- तचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दूरदृष्टीनें ॥ १५ ॥ एखादें मनुष्य तें शिळें । त्याचें करणेंचि बावळें । नाना विकल्पांचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥ तें आपणासि उकलेना । दुसऱ्यास कांहींच कळेना । नाचे विकल्पें कल्पना । ठायीं ठायीं ॥१७॥ ह्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्याणें कराव्या । बळकट बुद्धी ॥ १८ ॥ ज्यासि उपाधि आवरेना । तेणें उपाधि वाढवावी ना । सावचित्त करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधांवोनि उपाधि वेष्टी । आपण कष्टी लोक कष्टी । हे कामा न ये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत कष्टी झाला । आपणहि अत्यंत त्रासला । व्यर्थचि केला गलबला । कास- यासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहींएक नासे । सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपाशीं भावार्थ कैंचा । आपण जगवावा तयांचा । शेवट उपढरै³ कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लागे । नाना प्रकारीं दगे । चंचळामध्यें ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोन जाती । मनास वाटे विश्रांती । ऐशी दुर्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभा- ळावी ॥२६॥ आपणास मुळीं उपाधि नाहीं । ऋणानुबंधें मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिति⁴ नाहीं । ऐसें झालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊनि बैसला । आटोपेना तो गलबला । कासयासी १. अडचणींत पडतात. २. आटोक्यावांचून. ३. उणें, हानि. ४. पर्वा.

१९ वा.] राजकारण. ४११ ॥ २८ ॥ कांहीं गलबला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ । तेणें- करितां विश्रांति वेळ । आपणासी फावे ॥२९॥ उपाधि कांहीं राहत नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं । नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणां ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके उपाधिलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. राजकारण. श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास । तेणें अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥ १ ॥ तेथें तजविजा कळती । अखंड चाळणा निघती । प्राणिमात्रांची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ जरी हा चाळणाच करीना । तरी कांहींच उमजेना । हिशेबझाडाच पाहेना । दिवाळखोर ॥३॥ एक मिराशी साधिती । एक सध्यां गमाविती । व्यापक- पणाची स्थिती । ऐशी आहे ॥४॥ जेणें जें जें मनीं धारिलें । तें तें आधींच समजलें । कृत्रिम अवघेंच खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥ अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । या कारणें विश्रांतीतें । घेतां न ये ॥ ६ ॥ आळसें आळस केला । तरी मग कारभारचि बुडाला । अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ उदंड उपासनेचीं कामें । लावित जावीं नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥८॥ चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । गोवा मूर्खपणाचा काढावा । हळू हळू ॥ ९ ॥ ह्या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी । राजकारणें मंडळ वेष्टी । चहूकडे ॥१०॥ नष्टासि नष्ट योजावे । वाचाळासि वाचाळ आणावे । आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंचि नेदी ॥११॥ कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों न द्यावी । कळकटपणाची पदवी । असों न द्यावी ॥१२॥ न कळतां करी कार्य जें तें । तें काम तात्काळाचि होतें । गिचड्यांत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ ऐकोनि आवडी लागावी । देखोनि बळकटांच व्हावी । सलगीनें आपली पदवी । सेवकांमध्यें ॥ १४ ॥ कोणी- एक काम करितां होतें । न करितां मार्गे पडतें । या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥१५॥ जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।

जो आपणाचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवघ्यांस अवघेंच कळलें । तेव्हां तें रितें पडलें । या कारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७॥ मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे । राजकारणामध्यें ॥ १८॥ बोलके पहिलवान कळकटे । तयांसीच घ्यावे झटे । दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९॥ ग्रामण्य वर्मीं सांप- डावें । रगडून पीठचि करावें । करून मागुती सांवरावें । बुडवूं नये ॥ २०॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें प्रगट झालें । बरें वाईट ॥ २१ ॥ समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असाव्या बळकटा । मठ करून ताठा । धरूं नये ॥ २२॥ दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥ जनांमध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । या कारणें ते वाट । बुझोनि टाकावी ॥ २४ ॥ गलिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे कीं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५॥ तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाँखे । सह- जाचि होती ॥ २६ ॥ हीं धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें । ढिले- पणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७॥ कोठेंच पडेना दृष्टी । ठायीं ठायीं त्याच्या गोष्टी । वाग्विलासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥ हुंब्यासि हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लोंदापुढें करावा । दुसरा लोंदें ॥ २९ ॥ घट्टाास आणावा घट्ट । उद्धटास पाहिजे उद्धट । खट- नटासि खटनट । अगत्यें करी ॥ ३० ॥ जैसास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मजार्संसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनाविंशतिदशके राजकारणनिरूपणं नाम- नवमः समासः ॥ ९ ॥ १०. विवेकलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धा- रणा । जेथें अखंड राजकारणा । मनासि आणिती ॥ १ ॥ सृष्टीमध्यें उत्तम १. कारस्थानी लोक. २. योजावे. ३. ताणदोर. ४. कैवारी. ५. प्राणांत अवस्था- ६. मार्गानें. ७. दांडगा. ८. दुष्ट. ९. स्नेहसंबंध. १०. समुदाय.

१९ वा. ] विवेकलक्षण. ४१३ गुण । तितुकें चाले निरूपण । निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥ चर्चा आशंका प्रत्युत्तरें । कोण खोटें कोण खरें । नाना वक्तृत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥ भक्तिमार्ग विशद कळे । उपासनमार्ग आकळे । ज्ञा- नविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥ वैराग्याची बहुत आवडी । उदास- वृत्तीची गोडी । उदंड उपाधि तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥ प्रबंधांचीं पाठांतरें । उत्तरास संगीतें उत्तरें । नेमक बोलतां अंतरें । निवती सक- ळांचीं ॥ ६ ॥ आवडी लागली बहुत जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना । दळवंट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥ उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहूंकडे । भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥ जाणती परी आठवेना । काय करितो तें कळेना । नाना देशींचे लोक नाना । येऊन जाती ॥ ९ ॥ तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं । कडोविकर्डीं³ विवरावीं । अंतःकरणें ॥ १० ॥ किती लोक तें क- ळेना । किती समुदाय आकळेना । सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥ फड समजावीस करणें । गद्य पद्य सांगणें । परांतरासि राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक⁴ । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें अविवेक । येईल कैंचा ॥ १३ ॥ जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें ह- ळूहळू शिकवावें । शाहणे करूनि सोडावे । बहुत जन ॥१४॥ परोपरी शि- कवणें । आडणुका सांगत जाणें । निवळ¹ करून सोडणें । निस्पृहासी ॥१५॥ होईल तें आपण करावें । न होतां जनांकरवीं करवावें । भगवद्भजनें- विण राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ आपण करावें करवावें । आपण वि- वरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला । जितुकें होईल तितुक्या।ला । आळस करूं नये ॥ १८ ॥ देहाचा अभ्यास बुडाला । आणिजे महंत बुडाला । लागवेगें² नूतन लोकांना । शाहाणें करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निःसंगपण कामा न ये । कोणी एका विषयीं ॥२०॥ काम नासणार नासतें । आपण वेडें उगेंच पाहतें । आळसी हृदयशून्य तें । काय करूं जाणे ॥ २१॥ धकाधकीचा मामला⁵ । कैसा घडे १. सरळ. २. पुष्कळांशीं संबंध. ३. युक्तिप्रयुक्तीनें. ४. रीत. ५. प्रसंग.

४१४ श्रीदासबोध. [ दशक

अशक्ताला । नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनि शिकवाव्या ॥२२॥ व्याप हो- ईल तों राहावें । व्याप राहतां उठोन जावें । आनंदरूप फिरावें । कोठें तरी ॥ २३॥ उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला । जिकडे अनुकूल तिकडे चालिला । सावकाश ॥२४॥ कीर्ति पाहतां सुख नाहीं । सुख पाह- तां कीर्ति नाहीं । केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तरी ॥ २५॥ येरवीं काय राहतें । होणार तितुकें होऊन जातें । प्राणिमात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥ आधींच तकवा सोडिला । मध्येंच धिंवेंसा सांडिला । तरी सं- सार हा शेवटाला । कैसा पावे ॥२७॥ संसार मुळींच नासका । विवेकें क- रावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ॥२८॥ ऐसा याचा जिन- साना । पाहतां काळों येतें मना । परंतु धीर सांडावा ना । कोणी एकें ॥२९॥ धीर सांडितां काय होतें । अवघें सोसावें लागतें । नाना बुद्धि नाना मतें । शाहणा जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिद- शके विवेकलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी २८५.


दशक विसावा. १. पूर्णापूर्ण. श्रीगणेशाय नमः ॥ प्राण व्यापक मन व्यापक । पृथ्वी आप तेज व्या- पक । वायु आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट कीं काय एक । भेद आहे ॥ २ ॥ आत्मा आणि निरंजन । येणें वाढतें अनुमान । आत्मा सगुण कीं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥ श्रोता संदेहीं पडला । तेणें संदेह वाढला । अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥ ऐका पाहि- ली आशंका । अवघा गलबला करूं नका । प्रगट करून विवेका । प्रत्यय पाहावा ॥ ५ ॥ शरीरेंपाडें सामर्थ्यंपाडें । प्राणी व्यापक तरी निवाडे । परी पाहतां मनाएवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥ चपळपण एकदेशी । पूर्ण व्या- पकता नव्हे त्यासी । पाहतां पृथ्विच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७॥ तै-


१. धैर्य. २. शरीराच्या व बळाच्या मानानें. ३. विस्तारास.

सैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायु चपळ समज । एक- देशीं ॥ ८ ॥ गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणी एक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥ त्रिगुण गुणक्षोभिणी माया । मायिक जाईल विलया । अपूर्ण एकदेशी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥ आत्मा आणि निरंजन । हें दोहींकडे नामाभिधान । अर्थान्वय समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥ आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेंचि केवळ । सुचित्त अंतःकरण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥ अंतराळीं पा- हतां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहतां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥ पुढें पाहतां मागें नाहीं । मागें पाहतां पुढें नाहीं । वाम सव्य व्यापक नाहीं । दश दिशा ॥ १४ ॥ चहूंकडे निशाणें मांडा- वीं । एकसरी कैसीं शिर्वावीं । या कारणें समजोन उगवी । प्रत्यय आप- णासी ॥ १५ ॥ सूर्य जळीं प्रतिबिंबितला । हाहि दृष्टांत न घडे वस्तूला । वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजत आहे ॥ १६ ॥ घटाकाश मठाकाश । हाहि दृष्टांत विशेष । तोलूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥ ब्रह्माचा अंश आकाश । आणि आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥ गगन आणि हें मन । कैसीं होती समान । मनन- शीळ महाजन । सकळही जाणती ॥ १९ ॥ मन हें पुढें वावडे । मागें अवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परब्रह्माहि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दोन्हीं एक केवळ । कैसें म्हणावें ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । तिन्ही कैसीं होती समान । याचा प्रत्यय मनन । करून पहावा ॥ २२ ॥ ज्ञान म्हणिजे जा- णणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरीत ज्ञान म्हणिजे देखणें । एकाचें एक ॥ २३ ॥ जाणणें नेणणें वेगळें केलें । डोबळें पांचभौतिक उरलें । विपरीत ज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥ द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवा- त्माचि होय शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि होय जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥ आत्मत्वीं जन्ममरण न लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे । संभवामि युगे युगे । ऐसें वचनं ॥ २६ ॥ जीव एकदेशी नर । विचारें १. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. २. गीता, अध्याय ४ था पहा.

दुसरें । कांहींच नाहीं खरें । निंदा आणि स्तुति उत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥ ऐसें पर- ब्रह्म एकजिनसी । कांहींच तुळेना तयासी । महानुभाव पुण्यराशी । तेथें पहुडती ॥ १२ ॥ चंचलें होते दुःखरासी । निश्चळायेवढी नाहीं विश्रांती । निश्चळ प्रत्ययें पाहाती । महानुभाव ॥ १३ ॥ मुळापासून शेवटवरी । विचा- १. मुंगीच्या चालीनें; म्हणजे प्रथम कर्म, नंतर उपासना व शेवटीं ज्ञान होणें. २. पक्ष्याच्या भरारीप्रमाणें; म्हणजे एकदम विचार सुचून ज्ञान होणें.

Wait, let's re-check line 15 (our L15):
Is it `अधोर्ध्व` or `अधोध्वं`?
Let's zoom into L15:
Word: `अधोर्ध्व` vs `अधोध्वं` vs `अधोर्ध्वे`
Characters:
`अ`
`धो`
third character: look at the top. There is a horizontal headline.
Below headline, there is `ध` connected to `व`? Wait, look at `

२० वा.] सूक्ष्म नामाभिधान. ४१७ रणा केलीच करी । प्रत्ययाचा निश्चय अंतरीं । तयासचि फावे ॥ १४ ॥ क- ल्पनेची सृष्टि जाहली । त्रिविध प्रकारें भासली । तीक्ष्ण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । अवघें एकदेशी लक्षण । पांचां भूतांचा ढोबळा गुण । दिसतचि आहे ॥ १६ ॥ पृथ्वीपासून चारी खाणी । चारी वेगळाली करणी । सकळ सृष्टीची चालणी येथूनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥ सृष्टीचें त्रिविध लक्षण । विशद करूं निरूपण । श्रोतीं सुचित्त अंतःकरण । केलें पाहिजे ॥ १८ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची । जैसी स्थिती परा वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥ अष्टधा प्रकृ- तीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥ जड पदार्थ चेतवितें । म्हणोनि चैतन्य बोलिजेतें । सूक्ष्मरूपें संकेतें । समजोन घ्यावें ॥ २१ ॥ प्रकृतिपुरुषांचा विचार । अर्धनारी नटेश्वर । अष्ट- धा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥ गुप्त त्रिगुणांचें गूढत्व । म्हणोन संकेत महत्तत्व । गुप्तरूपें शुद्ध सत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥ जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती । त्रिगुणांचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥ गुप्तरूपें गुण सौम्य । म्हणोन बोलिजे गुणसाम्य । सूक्ष्म- संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ एकदेशी लक्षण । प्रत्यय पाहतां खुण । अंतरीं येते ॥ २६ ॥ पुढें पंचभूतां- चीं बंडे । वाढलीं विशालें उदंडें । सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥ त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसऱ्या जिनसा अनेक परी । दोन्ही जिनसा या उपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥ पृथ्वी नाना जिनसांचें बीज । अंडज जारज स्वेदज उद्भिज । चारी खाणी चारी वाणी सहज । निर्माण जाहल्या ॥ २९ ॥ खाणी वाणी होती जाती । परंतु तैशीच आहे जगती । ऐसे होती आणि जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशति- दशके त्रिविधसृष्टिलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. सूक्ष्म नामाभिधान. श्रीगणेशाय नमः ॥ मुळींहूनि शेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी । पुन्हा विवरत विवरत माघारीं । वृत्ति न्यावी ॥ १ ॥ चारी खाणी चारी

४१८ श्रीदासबोध. [ दशक वाणी । चौऱ्याशीं लक्ष जीवयोनी । नाना प्रकारचे प्राणी । जन्मास येती ॥२॥ अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमध्यें जाती नासोनी । अनेक येती जाती परी अवनी¹ । तैशीच आहे ॥ ३ ॥ ऐसें हें शेंड्याकडील खंड । दुसरें भूतांचें बंड । तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥ स्थूल अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें । गुणांपासून पाहिलेंच पाहावें । सूक्ष्म- दृष्टी ॥ ५ ॥ गुणांचीं रूपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राय । सूक्ष्म दृष्टीच लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥ शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । जाणीव नेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥ त्रिगुणांचीं रूपें ऐशीं । कळों लागलीं आपैसीं । गुणांपुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । तेंचि जाणिजे महत्तत्व । कर्द²भरूप ॥९॥ प्रकृतिपुरुष शिवशक्ती । अर्धनारी- नटेश्वर म्हणती । परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूपें ॥ १० ॥ सूक्ष्मरूपें गुण सौम्य । त्यासीच म्हणिजे गुणसाम्य । तैसेंच चैतन्य अगम्य । सूक्ष्म- रूपी ॥ ११ ॥ बहुजिन्नसी मूळमाया । महाकारण ब्रह्मांडींची काया । ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥१२॥ चारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें । काय पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥ अहाचें⁴ पाहतां कळेना । गरज केल्यानें समजेना । नाना प्रकारें जनांच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥ चौदाँ³ पांच एकोणीस । एकोणीस चार तेवीस । यामध्यें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥ जो विवरोन समजला । तेथें संदेहचि नाहीं उरला । समजल्याविण जो गलबला । तो निरर्थक ॥ १६ ॥ सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां सज्जें⁵ । परमार्थ होतो ॥ १७ ॥ समजलें माणूस चावळेना । निश्चयी अनु- मान धरीना । सांवाळागोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥ शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश असें बोलिलें । शुद्ध लक्ष्यांशें लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाय विलया । माया नसतां मग तया । काय म्हणावें ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध एक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥ १. पृथ्वी. २. मिश्रिभाव, चेंदा. ३. मूळमायेचीं चौदा नांवें. ४. वरवर. ५. पूर्ण-

२० वा. ] शिवशक्ति. ४१९ अधोमुखें भेद वाढतो । ऊर्ध्वमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो । महायोगी ॥२२॥ माया मिथ्या ऐशी कळली । तरी मग भीड कां लागली । मायेचे भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥ लटकें मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥ पृथ्वी- मध्यें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण । साधूवेगळा ॥ २५ ॥ म्हणोन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा । फिरफिरों ठायीं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥ उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचीतीचा महंत । प्रचीतीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीविण अवघें व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥२८॥ रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । पर- लोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥ म्हणोनि पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्मनामाभिधाननिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. शिवशक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ सकळ जनांस प्रार्थना । उगेंच उदास करावें ना । निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आप- ण धांवतो भलतीकडे । तरी मग सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥ उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी । वेग- ळीच ॥ ३ ॥ पृथ्वीमध्यें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥ त्याचा महिमा कळेल कोणाला । माते- वांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥ सत्ता पृथ्वीमध्यें वाढली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टी चालली । भगवंता- ची ॥ ६ ॥ मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वतां । सक- ळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥ सकळ पुरुषांचा ईश । जगामध्यें जग- दीश । नाना शरीरीं सावकाश । करूं लागे ॥ ८ ॥ पाहतां सृष्टीची रचना । १. प्रपंचदृष्टीनें. २. परमार्थदृष्टीनें. ३. ईशसत्ता. ४. व्यवहार करूं लागे.

ते एकाचेन चालेना । एकलाचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥ नाहीं उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्य चालों ऐसें झालें । भगवंतासी ॥ १० ॥ किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें । हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥ जगदंतरीं अनुसंधान । बरें पाहणें हेंचि ध्यान । ध्यान आणि तें ज्ञान । एकरूप ॥ १२ ॥ प्राणी संसारासि आला । कांहीं एक शाहाणा झाला । मग तो विवरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥ प्रगट रामाचें निशान । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥ उपासना धुंडीन वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली । महिमा न कळे हे बोली । यथार्थचि आहे ॥ १५ ॥ द्रष्टा म्हणिजे पाहता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरूपी अनंता । वोळ- खावें ॥ १६ ॥ संगती असावी भल्याची । धाटी कथानिरूपणाची । कांहीं एक मनाची । विश्रांति आहे ॥ १७ ॥ त्याहिमध्यें प्रत्ययज्ञान । जाळून टाकिलें अनुमान । प्रचीतीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥ मूळ- संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदंतरीं तेंचि रूप । देखिजेलें ॥ १९ ॥ उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देहें आरोपें । या कारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥ पुढें परब्रह्म विशाल । गग- नासारिखें पांकळ । घन पातळ कोमळ । काय म्हणावें ॥ २१ ॥ उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रीती ॥ २२ ॥ विचारें नेहटूनसाँ पाहे । उपासना आपणचि आहे । एक जाय एक राहे । वासना धरूनी ॥ २३ ॥ अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत गेली । आतांहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥ बनावरी बर्ने- करांची सत्ता । जलावरी जलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळांची सत्ता । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥ सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठानें पाहिजे ॥ २६॥ कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथगाकारें । येथें अहंतेंचे कॉविरें । बाधिजेना ॥ २७ ॥ हरिदाँताँ हरिभोँक्ता । ऐसें चालतें तत्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पा-


तळटीपा : १. मूळमाया. २. कल्पना. ३. लक्ष देऊन. ४. वनरक्षकाची. ५. आश्रय. ६. भ्रम. ७. हरिच देतो व हरिच सेवन करितो; (मी तूं हा भेद व्यर्थ आहे.)