दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 450, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंसैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायु चपळ समज । एक- देशीं ॥ ८ ॥ गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणी एक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥ त्रिगुण गुणक्षोभिणी माया । मायिक जाईल विलया । अपूर्ण एकदेशी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥ आत्मा आणि निरंजन । हें दोहींकडे नामाभिधान । अर्थान्वय समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥ आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेंचि केवळ । सुचित्त अंतःकरण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥ अंतराळीं पा- हतां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहतां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥ पुढें पाहतां मागें नाहीं । मागें पाहतां पुढें नाहीं । वाम सव्य व्यापक नाहीं । दश दिशा ॥ १४ ॥ चहूंकडे निशाणें मांडा- वीं । एकसरी कैसीं शिर्वावीं । या कारणें समजोन उगवी । प्रत्यय आप- णासी ॥ १५ ॥ सूर्य जळीं प्रतिबिंबितला । हाहि दृष्टांत न घडे वस्तूला । वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजत आहे ॥ १६ ॥ घटाकाश मठाकाश । हाहि दृष्टांत विशेष । तोलूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥ ब्रह्माचा अंश आकाश । आणि आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥ गगन आणि हें मन । कैसीं होती समान । मनन- शीळ महाजन । सकळही जाणती ॥ १९ ॥ मन हें पुढें वावडे । मागें अवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परब्रह्माहि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दोन्हीं एक केवळ । कैसें म्हणावें ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । तिन्ही कैसीं होती समान । याचा प्रत्यय मनन । करून पहावा ॥ २२ ॥ ज्ञान म्हणिजे जा- णणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरीत ज्ञान म्हणिजे देखणें । एकाचें एक ॥ २३ ॥ जाणणें नेणणें वेगळें केलें । डोबळें पांचभौतिक उरलें । विपरीत ज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥ द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवा- त्माचि होय शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि होय जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥ आत्मत्वीं जन्ममरण न लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे । संभवामि युगे युगे । ऐसें वचनं ॥ २६ ॥ जीव एकदेशी नर । विचारें १. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. २. गीता, अध्याय ४ था पहा.