दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 445, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४१० श्रीदासबोध. [ दशक दा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेलिचिला ॥ ९ ॥ एकासि अभ्या- सितां न ये । एकासि स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काय । कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणीं वेढों¹ लागती । नाना चुकीची फजीती । चहूंकडे ॥ ११ ॥ या कारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाय । उपायांचा अपाय । चुकतां होय ॥ १२ ॥ काय चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहींकडे ॥ १३ ॥ अवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगिती । कोठें चुके ते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ ह्यापोविण² आटोप केला । तो अवघा सर- तचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दूरदृष्टीनें ॥ १५ ॥ एखादें मनुष्य तें शिळें । त्याचें करणेंचि बावळें । नाना विकल्पांचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥ तें आपणासि उकलेना । दुसऱ्यास कांहींच कळेना । नाचे विकल्पें कल्पना । ठायीं ठायीं ॥१७॥ ह्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्याणें कराव्या । बळकट बुद्धी ॥ १८ ॥ ज्यासि उपाधि आवरेना । तेणें उपाधि वाढवावी ना । सावचित्त करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधांवोनि उपाधि वेष्टी । आपण कष्टी लोक कष्टी । हे कामा न ये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत कष्टी झाला । आपणहि अत्यंत त्रासला । व्यर्थचि केला गलबला । कास- यासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहींएक नासे । सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपाशीं भावार्थ कैंचा । आपण जगवावा तयांचा । शेवट उपढरै³ कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लागे । नाना प्रकारीं दगे । चंचळामध्यें ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोन जाती । मनास वाटे विश्रांती । ऐशी दुर्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभा- ळावी ॥२६॥ आपणास मुळीं उपाधि नाहीं । ऋणानुबंधें मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिति⁴ नाहीं । ऐसें झालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊनि बैसला । आटोपेना तो गलबला । कासयासी १. अडचणींत पडतात. २. आटोक्यावांचून. ३. उणें, हानि. ४. पर्वा.