भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

४१० श्रीदासबोध. [ दशक दा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेलिचिला ॥ ९ ॥ एकासि अभ्या- सितां न ये । एकासि स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काय । कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणीं वेढों¹ लागती । नाना चुकीची फजीती । चहूंकडे ॥ ११ ॥ या कारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाय । उपायांचा अपाय । चुकतां होय ॥ १२ ॥ काय चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहींकडे ॥ १३ ॥ अवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगिती । कोठें चुके ते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ ह्यापोविण² आटोप केला । तो अवघा सर- तचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दूरदृष्टीनें ॥ १५ ॥ एखादें मनुष्य तें शिळें । त्याचें करणेंचि बावळें । नाना विकल्पांचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥ तें आपणासि उकलेना । दुसऱ्यास कांहींच कळेना । नाचे विकल्पें कल्पना । ठायीं ठायीं ॥१७॥ ह्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्याणें कराव्या । बळकट बुद्धी ॥ १८ ॥ ज्यासि उपाधि आवरेना । तेणें उपाधि वाढवावी ना । सावचित्त करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधांवोनि उपाधि वेष्टी । आपण कष्टी लोक कष्टी । हे कामा न ये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत कष्टी झाला । आपणहि अत्यंत त्रासला । व्यर्थचि केला गलबला । कास- यासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहींएक नासे । सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपाशीं भावार्थ कैंचा । आपण जगवावा तयांचा । शेवट उपढरै³ कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लागे । नाना प्रकारीं दगे । चंचळामध्यें ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोन जाती । मनास वाटे विश्रांती । ऐशी दुर्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभा- ळावी ॥२६॥ आपणास मुळीं उपाधि नाहीं । ऋणानुबंधें मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिति⁴ नाहीं । ऐसें झालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊनि बैसला । आटोपेना तो गलबला । कासयासी १. अडचणींत पडतात. २. आटोक्यावांचून. ३. उणें, हानि. ४. पर्वा.

१९ वा.] राजकारण. ४११ ॥ २८ ॥ कांहीं गलबला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ । तेणें- करितां विश्रांति वेळ । आपणासी फावे ॥२९॥ उपाधि कांहीं राहत नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं । नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणां ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके उपाधिलक्षणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. राजकारण. श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास । तेणें अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥ १ ॥ तेथें तजविजा कळती । अखंड चाळणा निघती । प्राणिमात्रांची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ जरी हा चाळणाच करीना । तरी कांहींच उमजेना । हिशेबझाडाच पाहेना । दिवाळखोर ॥३॥ एक मिराशी साधिती । एक सध्यां गमाविती । व्यापक- पणाची स्थिती । ऐशी आहे ॥४॥ जेणें जें जें मनीं धारिलें । तें तें आधींच समजलें । कृत्रिम अवघेंच खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥ अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । या कारणें विश्रांतीतें । घेतां न ये ॥ ६ ॥ आळसें आळस केला । तरी मग कारभारचि बुडाला । अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ उदंड उपासनेचीं कामें । लावित जावीं नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥८॥ चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । गोवा मूर्खपणाचा काढावा । हळू हळू ॥ ९ ॥ ह्या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी । राजकारणें मंडळ वेष्टी । चहूकडे ॥१०॥ नष्टासि नष्ट योजावे । वाचाळासि वाचाळ आणावे । आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंचि नेदी ॥११॥ कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों न द्यावी । कळकटपणाची पदवी । असों न द्यावी ॥१२॥ न कळतां करी कार्य जें तें । तें काम तात्काळाचि होतें । गिचड्यांत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ ऐकोनि आवडी लागावी । देखोनि बळकटांच व्हावी । सलगीनें आपली पदवी । सेवकांमध्यें ॥ १४ ॥ कोणी- एक काम करितां होतें । न करितां मार्गे पडतें । या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥१५॥ जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।

जो आपणाचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवघ्यांस अवघेंच कळलें । तेव्हां तें रितें पडलें । या कारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७॥ मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे । राजकारणामध्यें ॥ १८॥ बोलके पहिलवान कळकटे । तयांसीच घ्यावे झटे । दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९॥ ग्रामण्य वर्मीं सांप- डावें । रगडून पीठचि करावें । करून मागुती सांवरावें । बुडवूं नये ॥ २०॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें प्रगट झालें । बरें वाईट ॥ २१ ॥ समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असाव्या बळकटा । मठ करून ताठा । धरूं नये ॥ २२॥ दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥ जनांमध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । या कारणें ते वाट । बुझोनि टाकावी ॥ २४ ॥ गलिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे कीं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५॥ तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाँखे । सह- जाचि होती ॥ २६ ॥ हीं धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें । ढिले- पणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७॥ कोठेंच पडेना दृष्टी । ठायीं ठायीं त्याच्या गोष्टी । वाग्विलासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥ हुंब्यासि हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लोंदापुढें करावा । दुसरा लोंदें ॥ २९ ॥ घट्टाास आणावा घट्ट । उद्धटास पाहिजे उद्धट । खट- नटासि खटनट । अगत्यें करी ॥ ३० ॥ जैसास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मजार्संसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनाविंशतिदशके राजकारणनिरूपणं नाम- नवमः समासः ॥ ९ ॥ १०. विवेकलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धा- रणा । जेथें अखंड राजकारणा । मनासि आणिती ॥ १ ॥ सृष्टीमध्यें उत्तम १. कारस्थानी लोक. २. योजावे. ३. ताणदोर. ४. कैवारी. ५. प्राणांत अवस्था- ६. मार्गानें. ७. दांडगा. ८. दुष्ट. ९. स्नेहसंबंध. १०. समुदाय.

१९ वा. ] विवेकलक्षण. ४१३ गुण । तितुकें चाले निरूपण । निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥ चर्चा आशंका प्रत्युत्तरें । कोण खोटें कोण खरें । नाना वक्तृत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥ भक्तिमार्ग विशद कळे । उपासनमार्ग आकळे । ज्ञा- नविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥ वैराग्याची बहुत आवडी । उदास- वृत्तीची गोडी । उदंड उपाधि तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥ प्रबंधांचीं पाठांतरें । उत्तरास संगीतें उत्तरें । नेमक बोलतां अंतरें । निवती सक- ळांचीं ॥ ६ ॥ आवडी लागली बहुत जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना । दळवंट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥ उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहूंकडे । भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥ जाणती परी आठवेना । काय करितो तें कळेना । नाना देशींचे लोक नाना । येऊन जाती ॥ ९ ॥ तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं । कडोविकर्डीं³ विवरावीं । अंतःकरणें ॥ १० ॥ किती लोक तें क- ळेना । किती समुदाय आकळेना । सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥ फड समजावीस करणें । गद्य पद्य सांगणें । परांतरासि राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक⁴ । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें अविवेक । येईल कैंचा ॥ १३ ॥ जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें ह- ळूहळू शिकवावें । शाहणे करूनि सोडावे । बहुत जन ॥१४॥ परोपरी शि- कवणें । आडणुका सांगत जाणें । निवळ¹ करून सोडणें । निस्पृहासी ॥१५॥ होईल तें आपण करावें । न होतां जनांकरवीं करवावें । भगवद्भजनें- विण राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ आपण करावें करवावें । आपण वि- वरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला । जितुकें होईल तितुक्या।ला । आळस करूं नये ॥ १८ ॥ देहाचा अभ्यास बुडाला । आणिजे महंत बुडाला । लागवेगें² नूतन लोकांना । शाहाणें करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निःसंगपण कामा न ये । कोणी एका विषयीं ॥२०॥ काम नासणार नासतें । आपण वेडें उगेंच पाहतें । आळसी हृदयशून्य तें । काय करूं जाणे ॥ २१॥ धकाधकीचा मामला⁵ । कैसा घडे १. सरळ. २. पुष्कळांशीं संबंध. ३. युक्तिप्रयुक्तीनें. ४. रीत. ५. प्रसंग.

४१४ श्रीदासबोध. [ दशक

अशक्ताला । नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनि शिकवाव्या ॥२२॥ व्याप हो- ईल तों राहावें । व्याप राहतां उठोन जावें । आनंदरूप फिरावें । कोठें तरी ॥ २३॥ उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला । जिकडे अनुकूल तिकडे चालिला । सावकाश ॥२४॥ कीर्ति पाहतां सुख नाहीं । सुख पाह- तां कीर्ति नाहीं । केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तरी ॥ २५॥ येरवीं काय राहतें । होणार तितुकें होऊन जातें । प्राणिमात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥ आधींच तकवा सोडिला । मध्येंच धिंवेंसा सांडिला । तरी सं- सार हा शेवटाला । कैसा पावे ॥२७॥ संसार मुळींच नासका । विवेकें क- रावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ॥२८॥ ऐसा याचा जिन- साना । पाहतां काळों येतें मना । परंतु धीर सांडावा ना । कोणी एकें ॥२९॥ धीर सांडितां काय होतें । अवघें सोसावें लागतें । नाना बुद्धि नाना मतें । शाहणा जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिद- शके विवेकलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी २८५.


दशक विसावा. १. पूर्णापूर्ण. श्रीगणेशाय नमः ॥ प्राण व्यापक मन व्यापक । पृथ्वी आप तेज व्या- पक । वायु आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट कीं काय एक । भेद आहे ॥ २ ॥ आत्मा आणि निरंजन । येणें वाढतें अनुमान । आत्मा सगुण कीं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥ श्रोता संदेहीं पडला । तेणें संदेह वाढला । अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥ ऐका पाहि- ली आशंका । अवघा गलबला करूं नका । प्रगट करून विवेका । प्रत्यय पाहावा ॥ ५ ॥ शरीरेंपाडें सामर्थ्यंपाडें । प्राणी व्यापक तरी निवाडे । परी पाहतां मनाएवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥ चपळपण एकदेशी । पूर्ण व्या- पकता नव्हे त्यासी । पाहतां पृथ्विच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७॥ तै-


१. धैर्य. २. शरीराच्या व बळाच्या मानानें. ३. विस्तारास.

सैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायु चपळ समज । एक- देशीं ॥ ८ ॥ गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणी एक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥ त्रिगुण गुणक्षोभिणी माया । मायिक जाईल विलया । अपूर्ण एकदेशी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥ आत्मा आणि निरंजन । हें दोहींकडे नामाभिधान । अर्थान्वय समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥ आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेंचि केवळ । सुचित्त अंतःकरण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥ अंतराळीं पा- हतां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहतां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥ पुढें पाहतां मागें नाहीं । मागें पाहतां पुढें नाहीं । वाम सव्य व्यापक नाहीं । दश दिशा ॥ १४ ॥ चहूंकडे निशाणें मांडा- वीं । एकसरी कैसीं शिर्वावीं । या कारणें समजोन उगवी । प्रत्यय आप- णासी ॥ १५ ॥ सूर्य जळीं प्रतिबिंबितला । हाहि दृष्टांत न घडे वस्तूला । वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजत आहे ॥ १६ ॥ घटाकाश मठाकाश । हाहि दृष्टांत विशेष । तोलूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥ ब्रह्माचा अंश आकाश । आणि आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥ गगन आणि हें मन । कैसीं होती समान । मनन- शीळ महाजन । सकळही जाणती ॥ १९ ॥ मन हें पुढें वावडे । मागें अवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परब्रह्माहि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दोन्हीं एक केवळ । कैसें म्हणावें ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । तिन्ही कैसीं होती समान । याचा प्रत्यय मनन । करून पहावा ॥ २२ ॥ ज्ञान म्हणिजे जा- णणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरीत ज्ञान म्हणिजे देखणें । एकाचें एक ॥ २३ ॥ जाणणें नेणणें वेगळें केलें । डोबळें पांचभौतिक उरलें । विपरीत ज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥ द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवा- त्माचि होय शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि होय जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥ आत्मत्वीं जन्ममरण न लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे । संभवामि युगे युगे । ऐसें वचनं ॥ २६ ॥ जीव एकदेशी नर । विचारें १. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. २. गीता, अध्याय ४ था पहा.

दुसरें । कांहींच नाहीं खरें । निंदा आणि स्तुति उत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥ ऐसें पर- ब्रह्म एकजिनसी । कांहींच तुळेना तयासी । महानुभाव पुण्यराशी । तेथें पहुडती ॥ १२ ॥ चंचलें होते दुःखरासी । निश्चळायेवढी नाहीं विश्रांती । निश्चळ प्रत्ययें पाहाती । महानुभाव ॥ १३ ॥ मुळापासून शेवटवरी । विचा- १. मुंगीच्या चालीनें; म्हणजे प्रथम कर्म, नंतर उपासना व शेवटीं ज्ञान होणें. २. पक्ष्याच्या भरारीप्रमाणें; म्हणजे एकदम विचार सुचून ज्ञान होणें.

Wait, let's re-check line 15 (our L15):
Is it `अधोर्ध्व` or `अधोध्वं`?
Let's zoom into L15:
Word: `अधोर्ध्व` vs `अधोध्वं` vs `अधोर्ध्वे`
Characters:
`अ`
`धो`
third character: look at the top. There is a horizontal headline.
Below headline, there is `ध` connected to `व`? Wait, look at `

२० वा.] सूक्ष्म नामाभिधान. ४१७ रणा केलीच करी । प्रत्ययाचा निश्चय अंतरीं । तयासचि फावे ॥ १४ ॥ क- ल्पनेची सृष्टि जाहली । त्रिविध प्रकारें भासली । तीक्ष्ण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । अवघें एकदेशी लक्षण । पांचां भूतांचा ढोबळा गुण । दिसतचि आहे ॥ १६ ॥ पृथ्वीपासून चारी खाणी । चारी वेगळाली करणी । सकळ सृष्टीची चालणी येथूनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥ सृष्टीचें त्रिविध लक्षण । विशद करूं निरूपण । श्रोतीं सुचित्त अंतःकरण । केलें पाहिजे ॥ १८ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची । जैसी स्थिती परा वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥ अष्टधा प्रकृ- तीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥ जड पदार्थ चेतवितें । म्हणोनि चैतन्य बोलिजेतें । सूक्ष्मरूपें संकेतें । समजोन घ्यावें ॥ २१ ॥ प्रकृतिपुरुषांचा विचार । अर्धनारी नटेश्वर । अष्ट- धा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥ गुप्त त्रिगुणांचें गूढत्व । म्हणोन संकेत महत्तत्व । गुप्तरूपें शुद्ध सत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥ जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती । त्रिगुणांचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥ गुप्तरूपें गुण सौम्य । म्हणोन बोलिजे गुणसाम्य । सूक्ष्म- संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ एकदेशी लक्षण । प्रत्यय पाहतां खुण । अंतरीं येते ॥ २६ ॥ पुढें पंचभूतां- चीं बंडे । वाढलीं विशालें उदंडें । सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥ त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसऱ्या जिनसा अनेक परी । दोन्ही जिनसा या उपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥ पृथ्वी नाना जिनसांचें बीज । अंडज जारज स्वेदज उद्भिज । चारी खाणी चारी वाणी सहज । निर्माण जाहल्या ॥ २९ ॥ खाणी वाणी होती जाती । परंतु तैशीच आहे जगती । ऐसे होती आणि जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशति- दशके त्रिविधसृष्टिलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. सूक्ष्म नामाभिधान. श्रीगणेशाय नमः ॥ मुळींहूनि शेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी । पुन्हा विवरत विवरत माघारीं । वृत्ति न्यावी ॥ १ ॥ चारी खाणी चारी

४१८ श्रीदासबोध. [ दशक वाणी । चौऱ्याशीं लक्ष जीवयोनी । नाना प्रकारचे प्राणी । जन्मास येती ॥२॥ अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमध्यें जाती नासोनी । अनेक येती जाती परी अवनी¹ । तैशीच आहे ॥ ३ ॥ ऐसें हें शेंड्याकडील खंड । दुसरें भूतांचें बंड । तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥ स्थूल अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें । गुणांपासून पाहिलेंच पाहावें । सूक्ष्म- दृष्टी ॥ ५ ॥ गुणांचीं रूपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राय । सूक्ष्म दृष्टीच लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥ शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । जाणीव नेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥ त्रिगुणांचीं रूपें ऐशीं । कळों लागलीं आपैसीं । गुणांपुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । तेंचि जाणिजे महत्तत्व । कर्द²भरूप ॥९॥ प्रकृतिपुरुष शिवशक्ती । अर्धनारी- नटेश्वर म्हणती । परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूपें ॥ १० ॥ सूक्ष्मरूपें गुण सौम्य । त्यासीच म्हणिजे गुणसाम्य । तैसेंच चैतन्य अगम्य । सूक्ष्म- रूपी ॥ ११ ॥ बहुजिन्नसी मूळमाया । महाकारण ब्रह्मांडींची काया । ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥१२॥ चारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें । काय पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥ अहाचें⁴ पाहतां कळेना । गरज केल्यानें समजेना । नाना प्रकारें जनांच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥ चौदाँ³ पांच एकोणीस । एकोणीस चार तेवीस । यामध्यें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥ जो विवरोन समजला । तेथें संदेहचि नाहीं उरला । समजल्याविण जो गलबला । तो निरर्थक ॥ १६ ॥ सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां सज्जें⁵ । परमार्थ होतो ॥ १७ ॥ समजलें माणूस चावळेना । निश्चयी अनु- मान धरीना । सांवाळागोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥ शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश असें बोलिलें । शुद्ध लक्ष्यांशें लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाय विलया । माया नसतां मग तया । काय म्हणावें ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध एक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥ १. पृथ्वी. २. मिश्रिभाव, चेंदा. ३. मूळमायेचीं चौदा नांवें. ४. वरवर. ५. पूर्ण-

२० वा. ] शिवशक्ति. ४१९ अधोमुखें भेद वाढतो । ऊर्ध्वमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो । महायोगी ॥२२॥ माया मिथ्या ऐशी कळली । तरी मग भीड कां लागली । मायेचे भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥ लटकें मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥ पृथ्वी- मध्यें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण । साधूवेगळा ॥ २५ ॥ म्हणोन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा । फिरफिरों ठायीं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥ उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचीतीचा महंत । प्रचीतीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीविण अवघें व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥२८॥ रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । पर- लोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥ म्हणोनि पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्मनामाभिधाननिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ४. शिवशक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ सकळ जनांस प्रार्थना । उगेंच उदास करावें ना । निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आप- ण धांवतो भलतीकडे । तरी मग सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥ उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी । वेग- ळीच ॥ ३ ॥ पृथ्वीमध्यें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥ त्याचा महिमा कळेल कोणाला । माते- वांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥ सत्ता पृथ्वीमध्यें वाढली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टी चालली । भगवंता- ची ॥ ६ ॥ मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वतां । सक- ळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥ सकळ पुरुषांचा ईश । जगामध्यें जग- दीश । नाना शरीरीं सावकाश । करूं लागे ॥ ८ ॥ पाहतां सृष्टीची रचना । १. प्रपंचदृष्टीनें. २. परमार्थदृष्टीनें. ३. ईशसत्ता. ४. व्यवहार करूं लागे.

ते एकाचेन चालेना । एकलाचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥ नाहीं उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्य चालों ऐसें झालें । भगवंतासी ॥ १० ॥ किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें । हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥ जगदंतरीं अनुसंधान । बरें पाहणें हेंचि ध्यान । ध्यान आणि तें ज्ञान । एकरूप ॥ १२ ॥ प्राणी संसारासि आला । कांहीं एक शाहाणा झाला । मग तो विवरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥ प्रगट रामाचें निशान । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥ उपासना धुंडीन वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली । महिमा न कळे हे बोली । यथार्थचि आहे ॥ १५ ॥ द्रष्टा म्हणिजे पाहता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरूपी अनंता । वोळ- खावें ॥ १६ ॥ संगती असावी भल्याची । धाटी कथानिरूपणाची । कांहीं एक मनाची । विश्रांति आहे ॥ १७ ॥ त्याहिमध्यें प्रत्ययज्ञान । जाळून टाकिलें अनुमान । प्रचीतीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥ मूळ- संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदंतरीं तेंचि रूप । देखिजेलें ॥ १९ ॥ उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देहें आरोपें । या कारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥ पुढें परब्रह्म विशाल । गग- नासारिखें पांकळ । घन पातळ कोमळ । काय म्हणावें ॥ २१ ॥ उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रीती ॥ २२ ॥ विचारें नेहटूनसाँ पाहे । उपासना आपणचि आहे । एक जाय एक राहे । वासना धरूनी ॥ २३ ॥ अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत गेली । आतांहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥ बनावरी बर्ने- करांची सत्ता । जलावरी जलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळांची सत्ता । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥ सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठानें पाहिजे ॥ २६॥ कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथगाकारें । येथें अहंतेंचे कॉविरें । बाधिजेना ॥ २७ ॥ हरिदाँताँ हरिभोँक्ता । ऐसें चालतें तत्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पा-


तळटीपा : १. मूळमाया. २. कल्पना. ३. लक्ष देऊन. ४. वनरक्षकाची. ५. आश्रय. ६. भ्रम. ७. हरिच देतो व हरिच सेवन करितो; (मी तूं हा भेद व्यर्थ आहे.)

२० वा.] चत्वार जिन्नस. ४२१ व्हावा ॥ २८ ॥ सकळ कर्ता परमेश्वरु । आपला मायिक विचारु । जैसें कळेल तैसें करु । जगदंतरीं ॥ २९ ॥ देवायेंवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ नाहीं । पायरीनें पायरी चढोनि पाहीं । मूळपर्यंत ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके शिवशक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥४॥ ५. चत्वार जिन्नस. श्रीगणेशाय नमः ॥ येथून पाहतां तेथवरी । चारी जिन्नस अवधारी । एक चौदा पांच चारी । ऐसें आहे ॥ १ ॥ ब्रह्म सकळांहून वेगळें । ब्रह्म सकळां- हून आगळें । नाना कल्पने निराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥ परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥ परब्रह्मास कांहींच तुलेना । हा एक मुख्य जिन्नसाना । दुसरा जि- न्नस नाना । कल्पना मूळमाया ॥ ४ ॥ नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्मरूप आणि कर्दंमरूप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥ हरिसंकल्प मु- ळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । ऐसा आहे ॥ ६ ॥ निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणोनि चैतन्य बोलिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । तोचि षड्गुणेश्वर । प्रकृति पुरु- षाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥ शुद्ध सत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट झाली ॥ ९ ॥ मन माया अंतरात्मा । चौदा जिन्नसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतके ठायीं ॥ १० ॥ ऐसा हा दुसरा जिन्नस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिन्न- स । पंचमहाभूतें ॥ ११ ॥ येथें पाहतां जाणीव थोडी । आदि अंत रोकडी । खाणी निरूपिल्या तांतडी । तो चौथा जिन्नस ॥ १२ ॥ चारी खाणी अनंत प्राणी । जणिवेची झाली दाटणी । चारी जिन्नस येथुनी । संपूर्ण झाले ॥ १३ ॥ बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें झालें आत्मया- तें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥ ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची उदंड झाली । मनुष्यवेषें सृष्टि भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥ प्राणी मा- १. एक ब्रह्म, चौदा नांवें असलेली मूळमाया, पंचमहाभूतें, व चारी खाणी असे हे चार जिन्नस सर्व ब्रम्हांडांत आहेत.

४२२ | श्रीदासबोध. | [दशक

रून श्वापद पळे । वरकड यास काय कळे । नाना भोग तो निबेळे¹ । मनुष्यदे- हीं ॥ १६ ॥ नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस । नाना गंध ते विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥ अमूल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें² नाना शस्त्रें । नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥ पृथ्वी सत्तेनें व्यापली । स्थूलास्थूळीं आटोपली । नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥ दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें । सारासार विचारावें । नर- देह जाहलिया ॥ २० ॥ इहलोक आणि परलोक । नाना प्रकारचा विवेक । विवेक आणि अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥ नाना पिंडब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना । नाना प्रकारची धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥ अष्ट भोग³ नव रस । नाना प्रकारचा विलास । वाच्यांश लक्ष्यांश सारांश । म- नुष्य जाणे ॥ २३ ॥ मनुष्यें सकळांसि आकळिलें⁴ । त्या मनुष्यास देवें पाळिलें । ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥ नरदेह परम दुर्लभ । येणें घडे अ- लभ्य लाभ । दुर्लभ तें सुलभ । होत जातें ॥ २५ ॥ वरकड देह काबाड । नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥ येथें ज्यानें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं ओळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥ नर तोचि नारायण । जरी प्रत्ययें करी श्रवण । मननशील अंतःक- रण । सर्वकाळ ॥ २८ ॥ जेणें स्वयेंचि पोहावें । त्यासि कासेस नलगे लागावें । स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥ सकळ शोधून राहिला । संदेह कैंचा तयाला । पुढें विचार कैसा झाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके चत्वारजिन्नसनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥


६. आत्मगुण. श्रीगणेशाय नमः ॥ पाहों जातां भूमंडळ । ठायीं ठायीं असे जळ । कि- त्येक ते निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥ तैसें दृश्य विस्तारलें । कांहीं एक जाणीवेनें शोभलें । जाणीवरहित उरलें । कितीएक दृश्य ॥ २ ॥ चारी


१. प्रकटतो. २. वाहनें. ३. अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या आणि अलंकार हे आठ भोग. ४. आकलन केलें.

२० वा. ] आत्मगुण. ४२३ खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । शास्त्रीं अवघें नेमूनी । बोलिलें असे ॥ ३ ॥ श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृ- मयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥ स्थावरास्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिपु जायते ॥ १ ॥ टीका ॥ मनुष्यें चारी लक्ष । पशु तीस लक्ष । कृमि अक्रा लक्ष । बोलिले शास्त्रीं ॥ ४ ॥ दहा लक्ष ते खेंचर¹ । नव लक्ष जळचर । वीस लक्ष स्थावरें² । बोलिले शास्त्रीं ॥ ५ ॥ ऐसी चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जितुका तितुका प्राणी । अनंत देहांची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥ अनंत प्राणी होती जाती । त्यांचें अधिष्ठान जगती । जगतीवेगळी स्थिती । त्यांसि कैंची ॥ ७ ॥ पुढें पाहतां पंचभूतें । पावलीं स्पष्ट दशेतें³ । कोणी विद्यमान कोणी ते । उगींच⁴ असती ॥ ८ ॥ अंतरात्म्याची ओळखण । तेचि जेथ च- पळपण । जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥ सुख दुःख जाणता जीव । तैसाच जाणावा सदाशिव । अंतःकरणपंचक अपूर्व । अंश आत्म- याचा ॥ १० ॥ स्थूळीं आकाशाचे गुण । अंश आत्म्याचे जान । सत्व रज तमोगुण । अंश आत्म्याचे ॥ ११ ॥ नाना चाळणा नाना धृती⁵ । नव- विधा भक्ति चतुर्विधा मुक्ती । अलिप्तपण सहजास्थिती । गुण आत्म्याचे ॥ १२ ॥ द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन⁶ । श्रवण मनन वि- वरण । गुण आत्म्याचे ॥ १३ ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता ज्ञान । आत्मरूप ॥ १४ ॥ वेद शास्त्र पुराणार्थ । गुप्त चालिला परमार्थ । सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्म्याचे ॥ १५ ॥ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध । बोध आणि प्रबोध । गुण आत्म्याचे ॥ १६ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृति पुरुष मूळमाया । पिंडब्रह्मांड अष्टकाया⁷ । गुण आत्म्याचे ॥ १७ ॥ परमात्मा आणि परमेश्वरी⁸ । जगदात्मा आणि ज- गदीश्वरी । महेश आणि माहेश्वरी । गुण आत्म्याचे ॥ १८ ॥ सूक्ष्म जितुकें नाम रूप । तितुकें आत्म्याचें स्वरूप । संकेत नामाभिधानें अमूप । सीमा १. पक्ष्यादिक. २. वृक्षादिक. ३. दृश्य. ४. गुप्त. ५. धैर्य. ६. अनादि. ७. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळप्रकृति हीं आठ शरीरें. ८. मूळमाया.

४२४ श्रीदासबोध. [ दशक

नाहीं ॥ १९ ॥ आदिशक्ति शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती । नाना जिन्नस उत्पत्ति स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥ पूर्वपक्ष आणि सिद्धांत ॥ गाणें वाजविणें संगीत । नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । असद्वृत्ति सद्वृत्ति जाण । ज्ञप्तिमात्रें¹ अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥ पिंडब्रह्मांडतत्वझाडा । नाना त- त्वांचा निवाडा । विचार पाहणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥ नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें । अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयांचे ॥ २४ ॥ तेहतीस कोटी सुरवर । अष्ट्यायशीं सहस्र ऋषीश्वर । भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥ भूतावळी औट कोटी । चा- मुंडा छपन्न कोटी । कात्यायनी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें । शेष कूर्म मेघमंडळें । गुण आ- त्मयाचे ॥ २७ ॥ देव दानव मानव । नाना प्रकारांचे जीव । पाहतां स- कळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥ आत्मयाचे नाना गुण । निर्वि- कार निर्गुण । जाणणें एकदेशीं पूर्ण² । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥ आत्माराम उपासना । तेणें पावलों निरंजना । निःसंदेह अनुमाना । ठावाच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके आत्मगुणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. आत्मा. श्रीगणेशाय नमः ॥ अनिर्वाच्य समाधान झालें । तें पाहिजे बोलिलें । बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥ कांहीं सांडावें ला- गत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं । एक विचार शोधून पाहीं । म्ह- णिजे बरें ॥ २ ॥ मुख्य काशीविश्वेश्वर । सेतुबंध रामेश्वर । मल्लिकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥ जैशीं मुख्य बारालिंगें । याहीवेगळीं अनंत लिंगें । प्रचित जाणिजे जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥ भूमंडळीं अ- नंतशक्ती । नाना साक्षात्कार चमत्कार होती । नाना देवांच्या सामर्थ्य- मूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥ नाना सिद्धांचीं सामर्थ्यं । नाना मंत्रांचीं सामर्थ्यं । नाना मोहरें³ वल्लींत सामर्थ्यं । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ जितुके


१. ज्ञानस्वरूप. २. अपूर्ण किंवा पूर्ण जाणणें. ३. ओषधी मणी.

२० वा. ] आत्मा. ४२५ कांहीं उत्तम गुण । तितुके आत्मयाचें लक्षण । बरें वाईट तितुकें जाण । आत्मयाचकरितां ॥ ७ ॥ शुद्ध¹ आत्मा उत्तम गुणीं । सबळ² आत्मा अवल- क्षणीं । बरें वाईट अवघी करणी । आत्मयाची ॥ ८ ॥ नाना साभिमान धरणें । नानाकृति सृष्टि करणें । नाना शापडःशाप लक्षणें । आत्मयाचेनी ॥ ९ ॥ पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्त्वांचा पिंड शोधावा । तत्त्वें शोधितां पिंड अघवा । कळों येतो ॥ १० ॥ जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्म- याचा । निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैंचा । जेथें तेथें ॥ ११ ॥ निश्चळ चंचळ आणि जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १२॥ पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देह जड हा पडतो । देखतदेखतां ॥१३॥ जड तितुकें पडलें । चंचळ तितुकें निघोन गेलें । जडचंच- ळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १४ ॥ निश्चळ आहे सकळां ठायीं । हें तों पाहणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १५ ॥ जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । पर- ब्रह्मचि आहे ॥ १६ ॥ महाभूतांचा खंबींर³ केला । आत्मा घालून पुतळा झाला । चालिला सृष्टीचा गलबला । येणें रीती ॥ १७ ॥ आत्मा माया⁴- विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १८ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पा- हतां जड । कांहींच नाहीं ॥ १९ ॥ गगनास खंडितां न ये । गगनाचें ना- सेल काय । जरी झाला महाप्रलय । सृष्टिसंहार ॥ २० ॥ जें संहारामध्यें सांपडलें । सहजचि नाशवंत झालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २१ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां अवघें दिसे उघडें । म्हणोनि ए- कांतीं निवाडें । विचार पाहावा ॥ २२ ॥ मिळतां प्रत्ययाचे संत । एकांता- परीस एकांत । केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २३ ॥ पाहिल्या- वेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहतां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २४ ॥ गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उ- डालें । आत्म्याकरितां दृश्य झालें । उडेल तैसें ॥ २५ ॥ मुळापासून शेवट- वरी । विवेकी विवेकें विवरी । तो निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २६ ॥ १. निरुपाधिक. २. शबल, सोपाधिक आत्मा; जीव. ३. मूर्ति. ४. मायेचे विकार.

४२६श्रीदासबोध.[ दशक

वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काय वेंचे । जाणते पुरुष प्रचीतींचे । ते तों मानीतना ॥ २७ ॥ उगीच बोलणें अनुमानाचें । अनु- मानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २८ ॥ स- गट विचार तो अविचार । किती एक म्हणती एकंकार । एकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ २९ ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं एक शुद्ध घ्यावें । जाण- जाणोनि निवडावें । सारासार ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके आत्मनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. देहक्षेत्र. श्रीगणेशाय नमः ॥ विधिप्रपंचतरु¹ वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण झाला । फळें येतां विश्रांति पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥ नाना फळें रसाळें लागलीं । नानाजिन्नसें² गोडीस आलीं । गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥ निर्माण जाहले उत्तम विषय । शरीराविणें भोगितां न ये । म्हणोनि निर्मिला उपाय । नाना शरीरें ॥ ३ ॥ ज्ञानेंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं । एका शरीरास लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥ श्रोत्रेंद्रियीं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला । ऐसा उपाय निर्माण केला । इंद्रियांमध्यें ॥ ५ ॥ त्वचेंद्रियें शीतोष्ण भासे । चक्षुरिंद्रियें सकळ दिसे । इंद्रियांमध्यें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥ जिव्हेमध्यें रस चाखणें । घ्राणामध्यें परिमळ घेणें । इंद्रियांमध्यें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥ वायु- पंचकीं अंतःकरणपंचक । मिसळोन फिरे निःशंक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें सक- ळिक । सावकाश पाहे ॥ ८ ॥ कर्मेंद्रियें लागवेगें³ । जीव भोगी विषयां- लागीं । ऐसा हा उपाय जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥ विषय निर्माण झाले बरवे । शरीराविण कैसे भोगावे । नाना शरीरांचे गोवे । याच कारणें ॥ १० ॥ अस्थिमांसांचीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं । लहान थोर निर्माण झालीं । येणें प्रकारें ॥ ११ ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । निर्माण केलीं जगदीश्वरें । विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १२ ॥ अस्थिमांसांचा पुतळा । जाणे ज्ञानें सकळ कळा । शरीरभेद वेगळा । ठायीं ठायीं ॥ १३ ॥ तो भेद


तळटीपा : १. ब्रह्मदेवाचा संसार हाच कोणी एक वृक्ष. २. अनेक प्रकारें. ३. उत्कंठेनें.

२० वा. ] सूक्ष्म ब्रह्म. ४२७ कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण । सकळ तीक्ष्णबुद्धीविण । काय कळे ॥ १४ ॥ सकळ करणें ईश्वराला । म्हणोनि भेद निर्माण केला । ऊर्ध्वमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १५ ॥ सृष्टिकर्मीं अगत्य भेद । संहारें सहजचि अभेद । भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १६ ॥ मायेमध्यें अंतरात्मा । न कळे तयाचा महिमा । झाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १७॥ पीळ पेंच कडोविकर्डीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी । मनासि होय तांतडी । विवरण करितां ॥ १८ ॥ आत्मत्वीं लागलें सकळ कांहीं । निरंजनीं हें कांहींच नाहीं । एकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ १९ ॥ देह- सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदीश्वर । थोर सामर्थ्यं अवतार । बोलि- जेती ॥ २० ॥ शेष कूर्म वराह झाले । येव्हढे देह विशाल धरिले । तेणें- करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २१ ॥ ईश्वरें केव्हडें यंत्र केलें । सूर्य- बिंब धांवाया लाविलें । धुक्टाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २२ ॥ पर्वता ऐसें ढग उचलती । सूर्यबिंबास आच्छादिती । तेथें सर्वैचि वायूची गती । प्रगट होय ॥ २३ ॥ झिडझिडकूं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियांरा । ढग मारून दिनकरा । मोकळें करी ॥ २४ ॥ बैसती विजांचे तडाखे । प्राणिमात्र अवचितां धाके । गगन कडकडून तडके । स्थळांतरीं ॥ २५ ॥ एकासि एक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आलिलें । सकळ समभागें चालि- लें । सृष्टिरचनेसी ॥ २६ ॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसें कैंचे । विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २७ ॥ ऐसी माझी उपा- सना । उपासकीं आणावी मना । अगाध महिमा चतुरानना । काय कळे ॥ २८ ॥ आवाहनविसर्जन । हेंचि भजनाचें लक्षण । सकळ जाणती सजन । मी काय सांगों ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके देहक्षेत्रनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥


९. सूक्ष्मब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वैचि विसर्जावें ।


१. आत्मरूपासन्निध. २. युक्तिप्रयुक्तीनें. ३. धुराचे मेघ बनविले, असा भाव. ४. चाकर. ५. ठिकऱ्या ठिकऱ्या. ६. मायेची उभारणी आणि संहारणी.

३२८ श्रीदासबोध. [ दशक हें मानेना स्वभावें । अंतःकरणासी ॥ १ ॥ देव पूजावा आणि टाकावा । हें प्रशस्त न वाटे जीवा । याचा विचार पहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव करिंजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोन याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरूनि मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें ओळखावा ॥४॥ नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुल्या अंतःकरणें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥ ब्रह्मज्ञानाचा उपाय । समजल्याविण देतां न ये । पदार्थ आहे मा घे जाय । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहतां तगेना । त्यास देव ऐसें म्हणवेना । परंतु जन राहेना । काय करावें ॥८॥ थोर लोक मरौन जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहती । तैशीच आहे ही गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राज्यसंपदा तयाचेनी । प्राप्त कैंची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पा- विजेल कैंचा ॥ ११ ॥ अज्ञानासि ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणे । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून मुळासि जावें । तरीच समाधान पावावें। ऐसें न होतां भरंगळावें । भलती- कडे ॥१३॥ माया उल्लंघायाकारणें । देवासि नाना उपाय करणें । अध्यात्म- श्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लौकिकीं । अवघीच होते चुकाचुकी । स्थिति खरी आणि लटिकी । ऐशी ओळखावी ॥ १५ ॥ खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगति धरूं नये । खोटें संग्रहीं करूं नये । कांहीं एक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्यासि तगेना तें बालटें । मन अधोमुख तें उफरटें । केलें पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती ॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसें मन उगवावें । मानत मानत घा- लावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळांचें सकळ जाहलें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥२०॥ काय तें येथेंचि पाहावें । १. तसविरी. २. मजूरकाम. ३. प्रवृत्तिमार्गात असलेले. ४. निवृत्त.

कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥ निर्गुण निर्विकार एक । तें सर्वां ठायीं व्यापक । देहामध्यें तें निष्कलंका । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकरणाचें स्वरूप । जड चेतवी चैतन्यरूप । तेंहि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समान गुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाण ते प्रणम्ये¹। तयां समस्तांसी ॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांगें दक्षिणांग² विचार । तोचि अर्धनारी नटेश्वर । पिंडीं ओळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृति पुरुष जाणिजे । शिव-श- क्ति बोलिजे । षड्गुणेश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । मीपणें तयास अहंतत्त्व । निश्चयें बुद्धितत्व । तयासीच म्हणती ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रत्यक्ष दिसे विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जाणीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राय । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहतें । शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्म- ब्रह्मनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥


१०. विमल ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ धरूं जातां धरितां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ २ ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे । पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशाचि भोंवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥४॥ जि- कडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे एकदेशी । दृष्टांत न घडे व- स्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थे ना- ना देशीं । कष्टत जावें पाहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं


१. प्रणाम, नमस्कार. २. डावा व उजवा भाग.