दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 463, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२८ श्रीदासबोध. [ दशक हें मानेना स्वभावें । अंतःकरणासी ॥ १ ॥ देव पूजावा आणि टाकावा । हें प्रशस्त न वाटे जीवा । याचा विचार पहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव करिंजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोन याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरूनि मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें ओळखावा ॥४॥ नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुल्या अंतःकरणें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥ ब्रह्मज्ञानाचा उपाय । समजल्याविण देतां न ये । पदार्थ आहे मा घे जाय । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहतां तगेना । त्यास देव ऐसें म्हणवेना । परंतु जन राहेना । काय करावें ॥८॥ थोर लोक मरौन जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहती । तैशीच आहे ही गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राज्यसंपदा तयाचेनी । प्राप्त कैंची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पा- विजेल कैंचा ॥ ११ ॥ अज्ञानासि ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणे । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून मुळासि जावें । तरीच समाधान पावावें। ऐसें न होतां भरंगळावें । भलती- कडे ॥१३॥ माया उल्लंघायाकारणें । देवासि नाना उपाय करणें । अध्यात्म- श्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लौकिकीं । अवघीच होते चुकाचुकी । स्थिति खरी आणि लटिकी । ऐशी ओळखावी ॥ १५ ॥ खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगति धरूं नये । खोटें संग्रहीं करूं नये । कांहीं एक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्यासि तगेना तें बालटें । मन अधोमुख तें उफरटें । केलें पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती ॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसें मन उगवावें । मानत मानत घा- लावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळांचें सकळ जाहलें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥२०॥ काय तें येथेंचि पाहावें । १. तसविरी. २. मजूरकाम. ३. प्रवृत्तिमार्गात असलेले. ४. निवृत्त.