दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 464, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंकैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥ निर्गुण निर्विकार एक । तें सर्वां ठायीं व्यापक । देहामध्यें तें निष्कलंका । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकरणाचें स्वरूप । जड चेतवी चैतन्यरूप । तेंहि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समान गुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाण ते प्रणम्ये¹। तयां समस्तांसी ॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांगें दक्षिणांग² विचार । तोचि अर्धनारी नटेश्वर । पिंडीं ओळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृति पुरुष जाणिजे । शिव-श- क्ति बोलिजे । षड्गुणेश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । मीपणें तयास अहंतत्त्व । निश्चयें बुद्धितत्व । तयासीच म्हणती ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रत्यक्ष दिसे विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जाणीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राय । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहतें । शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्म- ब्रह्मनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. विमल ब्रह्म. श्रीगणेशाय नमः ॥ धरूं जातां धरितां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ २ ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे । पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशाचि भोंवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥४॥ जि- कडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे एकदेशी । दृष्टांत न घडे व- स्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थे ना- ना देशीं । कष्टत जावें पाहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं
१. प्रणाम, नमस्कार. २. डावा व उजवा भाग.